jitendra Dudi
jitendra DudiSarkarnama

Satara Collector : पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर होर्डिंगजबाबत सातारच्या जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली कडक भूमिका!

Satara Collector jitendra Dudi and Satara Hordings : दबावाला बळी न पडता जिल्ह्यातील सर्व होर्डिंग्जचे पाच जूनपर्यंत स्ट्रक्चरल ऑडिट करून प्रमाणपत्र सादर करण्याचे दिले अधिकाऱ्यांना आदेश

Satara News: हवामान विभागाने सरासरीपेक्षा जास्त पाऊस होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे.त्यामुळे यंत्रणांनी सतर्क राहून जे होर्डिंग्ज नादुरुस्त आहेत, कमकुवत आहेत, खराब आहेत ते तत्काळ काढून टाकावेत. तसेच कोणत्याही दबावाला बळी न पडता जिल्ह्यातील सर्व होर्डिंग्जचे येत्या पाच जूनपर्यंत स्ट्रक्चरल ऑडिटचे प्रमाणपत्र सादर करावे,अशी स्पष्ट सूचना जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी अधिकाऱ्यांना केली आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयात मान्सून पूर्व आढावा बैठकीत जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी(jitendra Dudi) बोलत होते. या वेळी सर्व पालिकांचे मुख्याधिकारी, राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी, बांधकाम विभागांचे अधिकारी, उपस्थित होते. ( Satara Collector jitendra Dudi and Satara Hordings )

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

jitendra Dudi
Zadani Land Case : 'झाडाणी' प्रकरणात तीन ठिकाणी कमाल जमीन धारणा कायद्याचे उल्लंघन!

जे होर्डिंग्ज नादुरुस्त आहेत, कमकुवत आहेत, खराब आहेत ते तत्काळ काढून टाकावेत, अशी सूचना करुन जिल्हाधिकारी डुडी म्हणाले, जिल्ह्यातील अनधिकृत होर्डिंग्ज(Hordings ) ज्यांच्या मालकीची आहेत त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत.

येत्या पाच जून पर्यंत होर्डिंग्जच्या स्ट्रक्चरल ऑडिटचे प्रमाणपत्र सादर करावे. त्याचबरोबर अनधिकृत होर्डिंग्जबाबत केलेल्या कार्यवाहीचा अहवालही सादर करावा. मान्सून(Monsoon) कालावधीत मनुष्य व पशुहानी होणार नाही याची सर्व यंत्रणांनी खबरदारी घ्यावी. सर्व गटारे स्वच्छ करावीत. नेहमी पूर येणाऱ्या भागात अधिकची काळजी घ्यावी. स्वच्छता मोहिम राबविताना सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्यांवर कारवाई करावी, अशा सूचनाही जिल्हाधिकारी डुडी यांनी केल्या.

(Edited by - Mayur Ratnapakhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com