Satara Shiv Sena News : जिल्हा नियोजन समितीतून मुख्यमंत्र्यांच्या समर्थकास डावलले; मंत्री देसाई, महेश शिंदे समर्थकांची वर्णी

Eknath Shinde Supporter Leader Sidelined in Satara Shiv Sena : साताऱ्यात शिवसेना शिंदे गटातला कलह उघड...
Eknath Shinde
Eknath ShindeSarkarnama
Published on
Updated on

Satara Politics News :

सातारा नियोजन समितीच्या निमंत्रित सदस्यांच्या निवडीवरून सातारा शिवसेनेत वादाची ठिणगी पडली आहे. यादीतून मुख्यमंत्री Eknath Shinde यांचे कट्टर समर्थक निलेश मोरे यांचे नाव वगळण्यात आले आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या मोरे यांनी थेट राजीनामा देण्याचा निर्णय घेत कोल्हापूरच्या पक्षाच्या अधिवेशनावर बहिष्कार टाकला आहे.

Eknath Shinde
Loksabha Election 2024 : सातारा लोकसभेसाठी अजित पवार आग्रही ; महामेळाव्यातून रणशिंग फुंकणार!

सातारा जिल्हा नियोजन समितीच्या निवडीत पालकमंत्री शंभूराज देसाई व कोरेगावचे आमदार महेश शिंदे समर्थकांची वर्णी लागली आहे. मुख्यमंत्री शिंदे यांचे कट्टर समर्थक निलेश मोरे यांचे नाव वगळल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे. या प्रकाराबाबत निलेश मोरे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. वरिष्ठांकडे याबाबत दाद मागण्याचा निर्णय मोरे यांनी घेतला आहे.

जिल्हा नियोजन समितीच्या निवडी राज्य शासनाकडून जाहीर करण्यात आल्या या निवडीवर पालकमंत्री शंभूरा देसाई व कोरेगावचे आमदार महेश शिंदे यांच्या समर्थकांसह जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम जाधव आणि चंद्रकांत जाधव यांची वर्णी लागली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

सातारा शहरातील मुख्यमंत्र्यांचे कट्टर समर्थक निलेश मोरे यांचे नाव अचानकपणे मागे पडले आहे. निलेश मोरे यांना डावलल्यामुळे त्यांनी थेट राजीनामा देण्याचा इशारा दिला आहे. निलेश मोरे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना सत्ता नाट्यात गुवाहाटी ते मुंबई मंत्रालय यादरम्यानच्या अनेक राजकीय घटनांचे साक्षीदार आहेत.

साताऱ्यामध्ये मुख्यमंत्र्यांचे एकमेव संपर्क कार्यालय उघडून त्यांच्या प्रत्येक आदेशाची अंमलबजावणी करणारे निलेश मोरे यांनी कोरोना काळात चांगली कामगिरी केली आहे. निलेश मोरे यांनी आक्रमक होत प्रसंगी पदाचा राजीनामा देण्याची तयारी केली आहे. त्यांनी कोल्हापूरला होणाऱ्या पक्षाच्या अधिवेशनात ही सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे. त्या सर्व प्रकारामुळे सातारा शिवसेना शिंदे गटांमध्ये वादाची ठिणगी पडली आहे.

Eknath Shinde
Koregaon News : कोरेगाव नगरपंचायत गैरव्यवहार : विरोधी पक्षनेते दानवेंनी दिले चौकशीचे आदेश

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com