Solapur Congress Dispute : सोलापूर काँग्रेसमध्ये वादावर वाद; जिल्हाध्यक्षपदाबाबतच वाद मिटत नाही तोच शहर कार्याध्यक्षपदाची प्रदेशकडे तक्रार

Congress Working President Issue : काँग्रेसच्या घटनेत कार्याध्यक्ष हे पद नाही, त्यामुळे बंदपट्टे यांची नियुक्ती बेकायदा आहे. तसेच, सोलापूर शहर कार्याध्यक्षपदाची नियुक्ती ही प्रदेश काँग्रेसच्या संमतीशिवाय करण्यात आली आहे, अशी तक्रार प्रदेशच्या नेत्यांकडे केली आहे.
Solapur Congress
Solapur CongressSarkarnama
Published on
Updated on

Solapur, 28 July : जिल्हाध्यक्षाच्या नियुक्तीबाबत सोलापूर काँग्रेसमध्ये मोठे महाभारत घडलेले असतानाच आता सोलापूर शहर कार्याध्यक्ष पदावरूनही नवा वाद निर्माण झाला आहे. कार्याध्यक्षपदावरून थेट प्रदेश पातळीवरील नेत्यांपर्यंत तक्रारी झाल्याचे पुढे आले आहे, त्यामुळे सोलापूर काँग्रेसमध्ये नेमकं काय सुरू आहे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहराध्यक्ष चेतन नरोटे (Chetan Narote) हे विभागानुसार बैठका घेत आहेत. पालिका निवडणुकीच्या दृष्टीने ते मोर्चेबांधणी करत आहेत. त्यांच्या जोडीला शहर कार्याध्यक्ष म्हणून सुशील बंदपट्टे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र, बंदपट्टे यांच्या नियुक्तीला हकरत घेण्यात आली आहे. त्याबाबतची तक्रार थेट प्रदेश पातळीवरील नेत्यांपर्यंत करण्यात आली आहे.

काँग्रेसच्या घटनेत कार्याध्यक्ष हे पद नाही, त्यामुळे बंदपट्टे यांची नियुक्ती बेकायदा आहे. तसेच, सोलापूर (Solapur) शहर कार्याध्यक्षपदाची नियुक्ती ही प्रदेश काँग्रेसच्या संमतीशिवाय करण्यात आली आहे, अशी तक्रार प्रदेशच्या नेत्यांकडे केली आहे. त्याबाबत मुंबईत प्रदेशच्या नेत्यांची चर्चा झाल्याची माहिती असून यापुढे प्रदेश पातळीवरील नेत्यांच्या संमतीशिवाय कोणतीही नियुक्ती करण्यात येऊ नये, अशी सूचना केल्याचे सांगितले जात आहे.

एकीकडे, सोलापूरच्या जिल्हाध्यक्षपदाबाबत काँग्रेसमध्ये जोरदार शाब्दीक चकमक सुरू असतानाच शहर कार्याध्यक्षपदावरून वाद निर्माण झाल्याने निवडणुकीच्या तोंडावर पक्षात नेमकं काय सुरू आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. अगोदरच विधानसभा निवडणुकीत पक्षाने सपाटून मार खालेला असतानाच येणाऱ्या सर्व निवडणुकांना एकत्रितपणे सामोरे जाण्याऐवजी पक्षात निर्माण झालेला वाद काँग्रेससाठी नुकसानीचा ठरण्याची शक्यता आहे.

Solapur Congress
Ashok Uike Reply to Sharad Sonawane : मूर्ख मंत्री, चोर साला म्हणणाऱ्या आमदार शरद सोनवणेंना आदिवासी विकास मंत्री उईके यांचे प्रत्युत्तर; ‘बोलावून घेतो अन्‌...’

जिल्हाध्यक्ष नियुक्तीसाठी बोलावलेल्या बैठकीत काही कार्यकर्त्यांनी ‘खासदार प्रणिती शिंदे यांच्या विचाराला विरोध केला. मात्र, ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदेंच्या उपस्थितीत ‘जनवात्सला’वरील बैठकीत तो वाद मिटला होता. त्यानंतर जिल्हा कार्याध्यक्ष नंदकुमार पवार यांनी काँग्रेस भवनात एक बैठक घेतली.

त्या बैठकीत प्रणिती शिंदेंना जिल्हाध्यक्ष नेमण्याबाबत काय अधिकार आहेत, अशी भाषा वापरली गेली. त्या बैठकीला उपस्थित असलेले नंदकुमार पवार आणि सातलिंग शटगार यांची पक्षातून हकालपट्टी करण्याची मागणी पक्षाचे शहर उपाध्यक्ष सुनील रसाळ यांनी केली हेाती. तसेच मारहाणीबाबतही इशारा दिला होता.

Solapur Congress
Bhandara Bank Election : जिल्हा बँक निवडणुकीत पटोलेंच्या पॅनेलची धूळधाण, खासदारही पराभूत : पटेल, फुके, भोंडेकरांचा एकत्रित दणका

सातलिंग शटगार यांनी त्याबाबत काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे यांच्याकडे खुलासा केला आहे. काँग्रेस भवनातील मेळाव्यात झालेल्या त्या भाषणाचा आणि माझा काहीही संबंध नाही, असे शटगार यांनी म्हटले. त्यामुळे शटगार यांनी केलेल्या खुलाशामुळे जिल्हाध्यक्षपदावरून उठलेले वादंग शांत होत नाही तोच सोलापूर शहर कार्याध्यक्षपदावरून नाव वाद उभा राहिला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com