Kolhapur Gokul Sabha News : 'गोकुळ'च्या सभेपूर्वीच गोंधळ; बॅरिकेड्स तुटले, घोषणाबाजी करत महाडिक गट आक्रमक..

Mahadik Group Vs Satej Patil : पोलिसांची सुरक्षा आणि बॅरिगेट्स तोडून महाडिक समर्थक सभेत घुसले.
Mahadik Group Vs Satej Patil :
Mahadik Group Vs Satej Patil :Sarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News : कोल्हापुरातील गोकुळ दूध संघाच्या सभेपूर्वीच सभादांचा गोंधळ सुरू झाला आहे. राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या 'गोकुळ'च्या सभेत महाडिक समर्थक घुसले. सभेच्या ठिकाणी अचानक जमाव आल्याने यावेळी बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या पोलिसांचीही तारांबळ उडाली. यावेळी महाडिक गट समर्थकांनी प्रचंड घोषणाबाजी केली. पोलिसांची सुरक्षा आणि बॅरिगेट्स तोडून महाडिक समर्थक सभेत घुसले. ठराव आणि ओळखपत्र पाहून पोलिस प्रवेश देत होते. मात्र काही ठरावावर आक्षेप घेतल्याने महाडिक समर्थक गट आक्रमक झाला. यामुळे सभेपूर्वीच मोठा गोंधळ उडाला आहे. (Latest Marathi News)

Mahadik Group Vs Satej Patil :
Jadhav- kshirsagar Politics : जनतेची दिशाभूल थांबवावी ; कोल्हापूर शहर हद्दवाढीवरुन जाधव-क्षीरसागर आमनेसामने

गोकुळमध्ये सत्तांतर झाल्यानंतर पहिल्या वार्षिक सभेत विरोधकांचा माईक बंद करण्यात आला होता. त्यामुळे विरोधकांना प्रश्न विचारता आले नाहीत, असा आरोपही विरोधकांनी यापूर्वी केला होता. यामुळे या सभेमध्ये गोंधळ होण्याची दाट शक्यता होती. त्यानुसार आता गोकुळच्या सर्वसाधरण सभेत गोंधळ घडून आला.

Mahadik Group Vs Satej Patil :
महाडिकांचा दुसरा घाव 'गोकूळ'वर; पाटलांकडून एक-एक किल्ला पुन्हा ताब्यात घेण्याचा चंग

सभेपूर्वी मार्गावर पोस्टरबाजी -

सत्ताधाऱ्यांना सुरुवातीपासूनच आपल्या चक्रव्यूहात अडकवण्याचा प्रयत्न संचालिका शौमिका महाडिक यांनी केला होता. सभा स्थळांच्या प्रवेशापासूनच 'उत्तर द्या'! अशा आशयाचे फलक जागोजागी झळकवले आहेत. (Latest Marathi News)

रिजेक्ट केलेल्या दुधाचे पैसे कोणाच्या खिशात जातात? दोन वर्षात किती लीटर वासाचे दूध परत केले? कर्मचाऱ्यांवर म्हशी घेण्याचा दबाव का? कर्मचाऱ्यांची पिळवणूक थांबवणार का? भविष्य निर्वाह निधी देणार का? दोन वर्षात संघांच्या ठेवीमध्ये 73 कोटींची गट का झाली? सत्ताधाऱ्यांनो उत्तर द्या, अशा आशयाचे फलक लावून लक्ष वेधण्याचा प्रयत्न विरोधकांनी केला आहे.

(Edited By - Chetan Zadpe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com