Jadhav- kshirsagar Politics : जनतेची दिशाभूल थांबवावी ; कोल्हापूर शहर हद्दवाढीवरुन जाधव-क्षीरसागर आमनेसामने

Kolhapur Politics : कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीचा प्रश्न गेल्या काही वर्षापासून प्रलंबित आहे.
Rajesh Kshirsagar- Jayashree Jadhav
Rajesh Kshirsagar- Jayashree JadhavSarkarnama
Published on
Updated on

Kolhapur Political News: कोल्हापुरची हद्दवाढ व्हावी, असे शहरवासी यांना वाटत आहे. त्यासाठी पाठपुरावा देखील सुरू आहे. पण मुंबईत कोल्हापूर हद्दवाढ बद्दल मुख्यमंत्र्यांनी कोणतीच बैठक घेतली नसताना, काहीजण चुकीची माहिती देऊन शहरवासीयांची दिशाभूल करत आहेत. त्यांनी जनतेची दिशाभूल थांबवावी, असा टोला आमदार जयश्री जाधव यांनी नियोजन मंडळाचे कार्याध्यक्ष राजेश क्षीरसागर यांना नाव न घेता लगावला.

शहराची हद्दवाढ झालीच पाहिजे, यासाठी मीही आग्रही आहे. त्या संदर्भात पाठपुरावा सुरू आहे. हद्दवाढीबाबत प्रशासकीय पातळीवर हालचाली सुरू आहेत. राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी हद्दवाढीबाबत बुधवारी मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतल्याची माहिती दिली होती.

Rajesh Kshirsagar- Jayashree Jadhav
NCP Crisis News : अजित पवारांची बैठकीला दांडी; शरद पवार यांच्यापुढे येणे जाणीवपूर्वक टाळले ?

त्याला प्रत्युत्तर देताना आमदार जयश्री जाधव म्हणाल्या, महापालिकेच्या हद्दवाढीबाबत मुंबईत कोणतीच बैठक मुख्यमंत्र्यांनी घेतली नसताना काहीजण कोल्हापूरकरांची दिशाभूल करत आहेत. मंत्रालयातून १ सप्टेंबरपासूनचा मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयीन कामकाजाची माहिती घेतली असता, कोल्हापूर हद्दवाढीबाबत मुख्यमंत्र्यांनी कोणतेही बैठक घेतली नसल्याचे स्पष्ट होत आहे.

कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीचा प्रश्न गेल्या काही वर्षापासून प्रलंबित आहे. शहराची हद्दवाढ झालीच पाहिजे, ही जनभावना आहे. त्यामुळे कोल्हापूरची हद्दवाढ झालीच पाहिजे, यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. हद्दवाढीबाबत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना निवेदने दिली आहेत. लक्षवेधी, औचित्याच्या मुद्दा याच्या आधारे विधानसभेत हद्दवाढीचा प्रश्न उपस्थित केला होता. यावेळी मंत्री उदय सामंत यांनी महापालिका निवडणुकीनंतर हद्दवाढ करण्याचे आश्वासन दिले होते. याबाबत नाराजी व्यक्त करून, हद्दवाढीचा प्रश्न त्वरित सोडवावा यासाठी पाठपुरावा सुरू आहे.  असेही आमदार जयश्री जाधव म्हणाल्या.

Edited By- Anuradha Dhawade

Rajesh Kshirsagar- Jayashree Jadhav
BJP VS Congress News : खेळी भाजपची, फायदा अध्यक्ष जिभकाटे यांना, इच्छा नसतानाही नाना देणार पाठिंबा !

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com