Kolhapur Tantamukti News: तंटामुक्तीच्या बैठकीतच मोठा राडा; दोन गटात हाणामारी अन् एकमेकांवर भिरकावल्या खुर्च्या

Vadange Grampanchayat News: करवीर तालुक्यातील वरणगे गावात तंटामुक्तीच्या बैठकीतच मोठा राडा झाल्याचा प्रकार समोर आला आहे.
Vadange Grampanchayat
Vadange GrampanchayatSarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News : करवीर तालुक्यातील वरणगे गावात तंटामुक्तीच्या बैठकीतच मोठा राडा झाल्याचा प्रकार समोर आला आहे. एवढंच नाही तर या तंटामुक्तीच्या बैठकीत दोन गटात जोरदार हाणामारी झाली. दोन्ही गटातील कार्यकर्त्यांनी एकमेकांवर खुर्च्या देखील भिरकावल्या. तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदावरून इच्छुकांमध्ये हा गोंधळ झाल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, तंटामुक्तीच्या बैठकीतच तंटा झाल्याने या प्रकाराची मोठी चर्चा रंगली आहे.

वरणगे गावातील भैरवनाथ मंदिरामध्ये आयोजित केलेल्या बैठकीत तंटामुक्तीचा अध्यक्ष निवडीवरून गावातील एकाच गटात दोन-तीन अंतर्गत गट पडले आहेत. त्यामुळे त्यांच्यात वाद निर्माण झाला असून या वादाचे रूपांतर थेट हाणामारीत झाले. दोन्ही बाजूने एकमेकांना खुर्च्या फेकून मारण्यात आल्या. तंटामुक्तीच्या बैठकीतच तंटा झाल्याने याची चर्चा जिल्ह्यात सुरू आहे.

Vadange Grampanchayat
Sharad Pawar On Ajitdada : पहाटेच्या शपथविधीनंतर पुन्हा भाजपसोबत जायचं नाही, अशी भूमिका अजितदादांनी घेतली होती; पवारांचा गौप्यस्फोट

गावातील राजकारणात देखील आता छोटे गट एकत्र आल्याने अनेकांचा दबाव गट निर्माण झाला आहे. यातून वर्चस्ववाद तयार झाला आहे. गतवर्षी विरोधकांना भक्कम पर्याय व्हावा, या दृष्टीने गावातील करवीर पंचायत समितीचे माजी सदस्य तानाजी आंग्रे, कुंभी कारखान्याचे माजी संचालक - बळवंत पाटील येथील हनुमान सेवा संस्थेचे चेअरमन-रामकृष्ण पाटील, माजी सरपंच - नामदेव पाटील, माजी सरपंच-विलासराव पाटील आदी स्थानिक नेत्यांनी एकत्र येऊन या गटाची बांधणी भक्कम पद्धतीने केली होती.

पर्यायाने गावातील सर्व सत्ता काबीज करणे या गटाला सहज शक्य झाले. मात्र, कारभारी वाढल्याने सुरुवातीपासूनच या बड्या गटात या ना त्या कारणावरून धुसफूस पाहायला मिळत होती. गावातील तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी गेली अनेक वर्षे पांडुरंग पाटील हे कार्यरत होते.

Vadange Grampanchayat
Ajit Pawar Pune Daura: अजितदादा पिंपरी-चिंचवड दौऱ्यावर; दहा सामाजिक कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात, काय आहे कारण ?

तंटामुक्त अध्यक्षपदाची निवड नव्याने घेण्यासाठी शुक्रवारी बैठक बोलावण्यात आली. या पदाबाबत गटातील दोन-तीन अंतर्गत गटाकडून तिघांची नावे चर्चेत होती. मात्र, तंटामुक्त अध्यक्ष आपल्याच गटाचा व्हायला पाहिजे, अशी मागणी अंतर्गत एका गटाकडून झाली. यावेळी अध्यक्ष आमचाच या आग्रहातून दोन गटात तंटा निर्माण झाला, या तंट्याचे रूपांतर वादात झाले आणि दोन गटात हाणामारी झाली.

Edited By- Ganesh Thombare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com