Vishal Patil News : विशाल पाटलांवर कारवाई होणार? नाना पटोलेंनी दिले संकेत

Sangli Loksabha : सांगलीतील काँग्रेस मेळाव्यात बोलताना पक्ष कार्यकर्ते नाराज असल्याची कबूली नाना पटोले यांनी दिली. मात्र, कार्यकर्त्यांची नाराजी दूर करण्यात येईल. काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटील यांच्यासोबत असेल देखील जाहीर केले.
Nana Patole Vishal Patil
Nana Patole Vishal Patil sarkarnama

Loksabha Election : सांगली लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार ठाकरे गटाचे चंद्रहार पाटील आहेत. काँग्रेस पक्षाला ही जागा मिळाली नसल्याने या जागेवर विशाल पाटील यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे या जागेवर तिरंग लढत होत आहे. बंडखोरी करणाऱ्या विशाल पाटलांवर कारवाई करण्याची मागणी शिवसेना नेते संजय राऊत Sanjay Raut यांनी केली होती.

Nana Patole Vishal Patil
Dharashiv Lok Sabha News : तुळजापूर मुक्कामी शरद पवारांचा प्लॅन ठरला; 'या' नेत्याने घेतली गुप्तभेट?

कोल्हापूरात बंडखोरी करणारे बाजीराव खाडे यांचे काँग्रेस Congress पक्षाने सहा वर्षांसाठी निलंबन केले. मात्र, विशाल पाटील Vishal Patil यांच्यावर लगेच कारवाई केली नसल्याने काँग्रेसच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. त्यामुळे काँग्रेस प्रदेशध्यक्ष नाना पटोले हे सांगलीमध्ये आज (गुरुवारी) काँग्रेसच्या मेळाव्यासाठी आले असताना त्यांनी विशाल पाटील यांच्यावरील कारवाईचा निर्णय हायकमांड घेणार असल्याचे स्पष्ट केले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

विशाल पाटील यांच्या बंडखोरीनंतर अहवाल सांगलीतून दिल्लीत हायकमांडला पाठविण्यात येणार आहे. या अहवालाच्या आधारे हायकमांड विशाल पाटील यांच्याबाबत निर्णय घेईल, असे नाना पटोल यांनी सांगितले. तसेच सांगलीतील काँग्रेस मेळाव्यात बोलताना पक्ष कार्यकर्ते नाराज असल्याची कबूली नाना पटोले यांनी दिली. मात्र, कार्यकर्त्यांची नाराजी दूर करण्यात येईल. काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटील यांच्यासोबत असेल देखील जाहीर केले.

विश्वजीत कदम आक्रमक

विश्वजीत कदम यांनी चंद्रहार पाटील यांचे नाव न घेता सांगितले की, महाविकास आघाडीच्या उमेदवाराला मिळणारी मते ही काँग्रेसची असतील. त्यामुळे विधानसभेला कुठल्याही जागा मागता येणार नाहीत. काँग्रेसच्या हातातून ही जागा जाण्यासाठी ज्यांनी कारस्थान केले त्यांना देखील धडा शिकवणार असल्याचा इशारा विश्वजित कदम यांनी दिला.

Nana Patole Vishal Patil
Raju Shetti News : मी तुमच्या शेतातील म्हसोबा, मला...; राजू शेट्टींचं शेतकऱ्यांना साकडं

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com