Congress Toll Agitation : ‘खर्डा-भाकरी घेऊन आलोय, टोल बंद केल्याशिवाय मागे हटणार नाही’; खराब रस्त्यावरून काँग्रेस आक्रमक

Bad Roads Issue : कोल्हापूर जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांचे आंदोलन हातकणंगले तालुक्यातील किणी टोल नाका येथे सुरू झाले आहे. आंदोलनादरम्यान जोपर्यंत निर्णय होत नाही, तोपर्यंत आंदोलन स्थळावरून मागे हटणार नाही, अशी भूमिका घेत काँग्रेस कार्यकर्त्यांनी खर्डा भाकरी आणत रस्त्यावर ठिय्या मांडला आहे.
Congress Toll Agitation
Congress Toll AgitationSarkarnama
Published on
Updated on

Kolhapur, 03 August : कोल्हापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील खराब रस्त्यांवरून काँग्रेस आक्रमक झाली आहे. काँग्रेसकडून आज पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि बेळगाव जिल्ह्यांतून या महामार्गावर ठिकठिकाणी ठिय्या आंदोलन सुरू झाले आहे.

सध्या या महामार्गाचे काम सुरू असले तरी सेवा रस्ते (सर्व्हिस रोड) अत्यंत खराब आहेत. तरीही टोल वसुली चालू असल्याने काँग्रेस आता रस्त्यावर उतरली आहे. जोपर्यंत रस्ते चांगले होत नाहीत; तोपर्यंत टोल देऊ नका, असं आवाहन करत कोल्हापुरात किनी टोल नाका येथे काँग्रेस कार्यकर्त्यांसह नेत्यांनी ठिय्या मारला आहे.

दरम्यान, कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांचे आंदोलन हातकणंगले तालुक्यातील किणी टोल नाका येथे सुरू झाले आहे. आंदोलनादरम्यान जोपर्यंत निर्णय होत नाही, तोपर्यंत आंदोलन स्थळावरून मागे हटणार नाही, अशी भूमिका घेत काँग्रेस (Congress) कार्यकर्त्यांनी खर्डा भाकरी आणत रस्त्यावर ठिय्या मांडला आहे.

काँग्रेसचे आमदार सतेज पाटील (Satej Patil), आमदार ऋतुराज पाटील, आमदार राजुबाबा आवळे, आमदार जयश्री जाधव, आमदार जयंत आसगावकर, राहुल (पी. एन.) पाटील, शहराध्यक्ष सचिन पाटील यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांनीही रस्त्यावर ठिय्या मारला आहे.

Congress Toll Agitation
Sharad pawar Politics : शरद पवार इंदापूरमध्ये मानेंच्या खांद्यावर बंदूक ठेवून हर्षवर्धन पाटील अन् भरणेमामांचा 'करेक्ट कार्यक्रम' करणार?

आमदार सतेज पाटील म्हणाले, रस्त्यावर सर्वत्र खड्डे आहेत, त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. आज पुण्यातून कोल्हापूरला येण्यासाठी सात ते आठ तास लागतात. त्याचा प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. उद्या रुग्णाला जरी न्यायचे झाल्यास त्याला देखील त्याचा फटका बसतो.

सध्या रस्त्याचे काम सुरू असले, तरी सेवा रस्त्याचे (सर्व्हिस रोड) काम चांगले करायला हवे. जोपर्यंत रस्ते चांगले होत नाहीत, तोपर्यंत एक रुपयाही टोल घेऊ नका. पुणे, सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांत हे आंदोलन सुरू आहे. आज भाकरी घेऊन आलो आहे. निर्णय घ्या आंदोलन मागे घेतो. पण, टोल बंद झाल्याशिवाय मागे हटणार नाही, असा इशाराही आमदार सतेज पाटील यांनी दिला.

Congress Toll Agitation
Abhijeet Patil : अभिजीत पाटलांचे भालके अन्‌ बबनदादांना चॅलेंज; म्हणाले, ‘अभिजीतची त्यांना भीती वाटू लागलीय’

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com