Maan Khatav News: माण-खटावमध्ये दुष्काळ जाहीर करण्यासाठी काँग्रेस आक्रमक...

Maan Khatav Congress News: शासनाने तत्काळ निर्णय घेवून दुष्काळग्रस्तांना दिलासा द्यावा. अन्यथा तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढून तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा काँग्रेसने दिला आहे.
Maan Congress statement
Maan Congress statementSarkarnama
Published on
Updated on

-रूपेश कदम

Maan News : ऑगस्ट महिना सुरु होवून एक आठवडा संपला तरी माण-खटाव मध्ये पावसाने दडी मारल्याने खरीप हंगाम पूर्णपणे वाया गेला आहे. लोकांच्या व जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाल्याने शासनाने त्वरित दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी राष्ट्रीय काँग्रेसने केली आहे.

माण, खटाव तालुक्यातील दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन घेऊन जनावरांसाठी चारा छावणी व चारा डेपो तसेच पाण्याचे टँकर सुरु करावेत. मजुरांसाठी रोजगार हमीची कामे त्वरित सुरु करावीत. उरमोडीच्या पाण्याने जलाशये भरुन घ्यावीत, या मागण्यांचे निवेदन आज सातारा जिल्हा काँग्रेसचे Satara Congress उपाध्यक्ष एम. के. भोसले, माण-खटाव Maan Politics मतदारसंघ अध्यक्ष महेश गुरव, माण तालुकाध्यक्ष बाबासाहेब माने यांनी तहसीलदार विकास अहिर यांना दिले.

ऑगस्ट महिना सुरु होवून एक आठवडा संपला आहे. अद्यापी माण-खटावमध्ये पावसाने दडी मारली आहे. खरीप हंगाम पूर्णपणे वाया गेला आहे. लोकांच्या व जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. त्यामुळे शासनाने अआता चारा छावण्या सुरू कराव्यात, अशी मागणी काँग्रेसने केली आहे.

निवेदनात म्हटले की, उरमोडीच्या पाण्यासाठीची पाणीपट्टी व विज बिल माफ करावे. शेतकर्‍यांची कर्ज वसुली थांबविण्यात यावी. विना अनुदानित शाळेत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची फी माफी करावी. अशा मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहेत.

Maan Congress statement
Maan News : खटाव,माणला दुष्काळ जाहीर करा; महाविकास आघाडीचा रास्ता रोको

शासनाने या मागण्यांची पुर्तता करण्यासाठी तत्काळ निर्णय घेवून दुष्काळग्रस्तांना दिलासा द्यावा. अन्यथा, तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढून तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा काँग्रेसने दिला आहे. यावेळी प्रवक्ते शिवाजीराव यादव, महिलाध्यक्षा नकुसा जाधव, प्रदीप जाधव, रवि शिंदे, इम्रान बागवान, प्रविण अवघडे, बाळकृष्ण गोसावी, दत्तात्रय काळोखे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Edited by : Umesh Bambare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com