Prithviraj Chavan-Hasan Mushrif
Prithviraj Chavan-Hasan MushrifSarkarnama

Chavan Vs Mushrif : पृथ्वीराज चव्हाणांमुळे काँग्रेस आघाडीची सत्ता गेली; हसन मुश्रीफांनी डागली तोफ

NCP Leader Attack Prithviraj Chavan : पृथ्वीराज चव्हाण यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संपवण्यासाठीच राज्यात पाठवलं होतं.
Published on

Kolhapur News : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, खासदार सुनील तटकरे यांच्यानंतर वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनीही माजी मुख्यमंत्री व आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर टीकास्त्र सोडले.

पृथ्वीराज चव्हाण यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संपवण्यासाठीच राज्यात पाठवलं होतं. पृथ्वीराज चव्हाण यांच्यामुळेच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता गेली, अशा शब्दांत मुश्रीफ यांनी चव्हाण यांच्यावर हल्लाबोल केला. (Congress alliance lost power due to Prithviraj Chavan : Hasan Mushrif)

कोल्हापूर येथील विमानतळावर आज (ता. 1 डिसेंबर) पत्रकारांशी संवाद साधताना मंत्री हसन मुश्रीफ बोलत होते. मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बाल चहल यांच्यासंदर्भात कोविड गैरव्यवहाराबाबत विचारलेल्या प्रश्नावर राज्य सरकार त्यांची चौकशी करेल, असे सांगितले.

आमदार बच्चू कडू यांनी मंत्री छगन भुजबळ हे मुख्यमंत्री पदाचे दावेदार असल्याचे म्हणत असतील, तर 146 आमदार ज्यांचे निवडून येतील त्यालाच मुख्यमंत्रिपदावर बसता येईल, असा टोला मुश्रीफ यांनी लगावला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Prithviraj Chavan-Hasan Mushrif
Pimpri Chinchwad Politics : अजित पवार गटाच्या ऑफिसजवळच शरद पवार गटाने थाटले नवे कार्यालय; जयंत पाटलांची एन्ट्री चर्चेत

कोल्हापुरात अद्ययावत शासकीय वैद्यकीय इमारतीला मंजुरी मिळाली आहे. केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या हस्ते भूमिपूजन होणार आहे. कोल्हापुरातील शेंडा पार्क येथे 30 एकर जागेत इमारत उभारणार असून, 1100 बेडचे सुसज्ज हॉस्पिटल असणार आहे. त्यामुळे कोल्हापुरात एक नवे मेडिकल हब उभे राहणार असल्याचा मला आनंद आहे, असे मुश्रीफ यांनी सांगितले.

राजकीय भूमिका बदलली, त्याचा मी पहिल्यापासून साक्षीदार आहे. भाजपसोबत जाण्याची चर्चा एका मोठ्या नेत्यांसोबत झाली होती. त्यावर वारंवार आम्ही भूमिका स्पष्ट केलेली आहे. प्रफुल्ल पटेल यांनी यापूर्वीच सांगितले आहे. भाजपसोबत जाण्याबाबत आमची फार पूर्वीपासून चर्चा सुरू होती, असे स्पष्टीकरण मंत्री मुश्रीफ यांनी दिले.

Prithviraj Chavan-Hasan Mushrif
Rajasthan Exit Polls 2023 : राजस्थानमध्ये पाच संस्थांच्या सर्व्हेनुसार भाजपची सत्ता, तर तीन संस्थांची काँग्रेसला पसंती

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com