Indian National Leaders Meeting : काँग्रेसच्या बेळगावमधील राष्ट्रीय अधिवेशनाला 100 वर्षे पूर्ण; देशभरातील नेते येणार एकत्र

Belgaum Congress Event : देशभरातील काँग्रेस नेते उद्या बेळगावमध्ये दाखल होणार असून गांधी भारत या उपक्रमांतर्गत नव सत्याग्रह बैठक होणार आहे.
Congress
Congress Sarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या उपस्थितीत आणि अध्यक्षतेखाली बेळगावमध्ये 26 डिसेंबर 1924 रोजी झालेल्या काँग्रेसच्या राष्ट्रीय अधिवेशनाला उद्या शंभर वर्षे पूर्ण होत आहेत. या शतकपूर्ती सोहळ्यानिमित्त काँग्रेसकडून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. देशभरातील काँग्रेस नेते उद्या बेळगावमध्ये दाखल होणार असून गांधी भारत या उपक्रमांतर्गत नव सत्याग्रह बैठक होणार आहे. त्याशिवाय महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभा निवडणुकीनंतर काँग्रेसची पुढील धोरण आणि भूमिका काय असणार? यावर चर्चा केली जाणार आहे.

26 डिसेंबर 1942 रोजी महात्मा गांधी यांच्या उपस्थितीत आणि अध्यक्षतेखाली काँग्रेसचे (Congress) राष्ट्रीय अधिवेशन पार पडले होते. या अधिवेशनाला 100 वर्षे पूर्ण होत आहेत. शिवाय काँग्रेसच्या अध्यक्षपदी महात्मा गांधी यांची निवड याच अधिवेशनात झाली होती. त्यानिमित्ताने काँग्रेसकडून 26 डिसेंबर ते 27 डिसेंबर रोजी विविध उपक्रमांचा आयोजन करण्यात आले असून देशभरातील प्रमुख नेत्यांना आमंत्रित करण्यात आले आहे. दरम्यान, या निमित्त उद्या काँग्रेसच्या कार्यकारणीची बैठक बेळगावात पार पडणार आहे. देशभरातून 200 पेक्षा अधिक नेते यासाठी दाखल होणार आहेत.

Congress
Devendra Fadnavis : काँग्रेसला CM फडणवीसांनी धू धू धुतले; म्हणाले, 'मोदी अन् शाह स्वप्नात...' पाहा VIDEO

नुकत्याच पार पडलेल्या हरियाणा आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा पराभव झाला. या पराभवाचे चिंतन, आणि काँग्रेसची पुढील दिशा ठरवण्यासाठी या कार्य करण्याची बैठक उद्या होणार आहे. त्याशिवाय केंद्रीय मंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केलेल्या आक्षेपार्ह विधानावर काँग्रेसच्या बैठकीत चर्चा होणार आहे. दरम्यान, 27 डिसेंबर रोजी काँग्रेससह कार्यकर्त्यांची बैठक होणार आहे.

Congress
Santosh Deshmukh Murder Case: बीडमधून मोठी अपडेट! अखेर मुंडेंच्या 'त्या' कार्यकर्त्याविरोधात पोलिसांनी अ‍ॅक्शन घेतलीच

या बैठकीनंतर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा मेळावा होणार आहे. या मेळाव्यात जय बापू, जय भीम, जय संविधान असे घोषवाक्य या मेळाव्यासाठी देण्यात आले आहेत. या मेळाव्यासाठी देशभरातील काँग्रेसचे सर्व खासदार, प्रत्येक राज्यातील प्रमुख नेते यांना निमंत्रित करण्यात आले आहे.

Congress
NCP Politics: राष्ट्रवादीच्या आमदाराने दिला थेट राजीनाम्याचा इशारा... काय आहे प्रकरण?

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com