Kolhapur News: कोल्हापूर उत्तरमध्ये काँग्रेसच टेन्शन वाढलं असून काँग्रेसच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी शोध मोहीम सुरू केली आहे. आज अर्ज माघारीचा शेवटचा दिवस असल्याने कोल्हापूर उत्तर मधून राजेश लाटकर यांनी उमेदवारी मागे घेण्यासाठी फिल्डिंग लावली जात आहे.
काँग्रेस नेते सतेज पाटील हे लाटकर यांची मनधरणी करण्यासाठी घरी गेले असता राजेश लाटकर हे सकाळपासूनच संपर्क क्षेत्राच्या बाहेर असल्याचे समजले. जवळपास अर्धा तास चर्चा करत सतेज पाटील घराबाहेर पडले. मात्र लाटकर यांची भेट न झाल्याने काँग्रेसच्या प्रमुख कार्यकर्त्यांकडून त्यांची शोधा शोध सुरू आहे.
बंडोखोर उमेदवार राजेश लाटकर (Rajesh latkar) नॉट रिचेबल आहेत. लाटकर यांच्याकडून कोल्हापूर उत्तर मधून निवडणूक लढवण्यावर ठाम असल्याचे संकेत आहेत. काल रात्री लाटकर यांनी कार्यकर्त्यांचा मेळावा घेत आपली भूमिका जाहीर केली होती. मात्र कार्यकर्त्यांच्या भावना तीव्र असल्याने लाटकर हे सकाळपासूनच संपर्क क्षेत्राबाहेर गेले आहेत.
राजेश लाटकर सकाळपासून अज्ञातस्थळी आहेत. काँग्रेसकडून अधिकृतरित्या दिलेली उमेदवारी काही तासात नाकारल्यानंतर राजेश लाटकर नाराज आहेत. नाराजी दूर करण्यासाठी खासदार शाहू छत्रपती यांच्यासह मधुरिमाराजे छत्रपती यांनी लाटकर यांची भेट घेत मनधरणी करण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर आज सकाळी काँग्रेस नेते सतेज पाटील (Satej Patil) हे त्यांची मनधरणी करण्यासाठी घरी गेले होते. मात्र त्यांच्याशी संपर्क झालेला नाही. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याकडून लाटकर यांना संपर्क झाल्याची माहिती आहे.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.