Praniti Shinde News : शक्तिप्रदर्शन करत प्रणिती शिंदे यांचा उमेदवारी अर्ज दाखल

Solapur Loksabha 2024 : आमदार प्रणिती शिंदे यांची लढत भाजपचे उमेदवार तथा माळशिरसचे आमदार राम सातपुते यांच्याशी होणार आहे. दोन्ही युवा आमदारांमधील लढत ही महाराष्ट्रातील प्रमुख लढतींपैकी एक महत्त्वाची निवडणूक मानली जाते.
Praniti Shinde
Praniti ShindeSarkarnama
Published on
Updated on

Solapur, 18 April : सोलापूर लोकसभेच्या महाविकास आघाडीतील काँग्रेसच्या उमेदवार, आमदार प्रणिती शिंदे यांनी आज (ता. १८ एप्रिल) शक्तिप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. शिंदे यांचा अर्ज दाखल करण्यासाठी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे स्वतः सोलापुरात आले होते. तसेच, महाविकास आघाडीचे सोलापुरात प्रमुख नेते उपस्थित होते.

काँग्रेस भवनासमोर आज सकाळी दहा वाजता जाहीर सभा झाली. त्या सभेत प्रमुख वक्त्यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. सभेनंतर काँग्रेसची रॅली जिल्हाधिकारी कार्यालयाकडे रवाना झाली. काँग्रेस भवनापासून निघालेली रॅली पानगल हायस्कूल, सिव्हिल चौक, बेडर पूल, जगदंबा चौक, सात रस्तामार्गे जिल्हाधिकारी कार्यालयाकडे आली. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयापुढे गर्दी झाली होती.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Praniti Shinde
Solapur Lok Sabha 2024 : पंढरपूर-मंगळवेढ्यातील बड्या नेत्याचा प्रणिती शिंदेंना पाठिंबा जाहीर

आमदार प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांचा अर्ज भरण्यासाठी नाना पटोले (Nana Patole) यांच्यासह माजी केंद्रीय मंत्री सुशीकुमार शिंदे (Sushilkumar Shinde), उज्ज्वला शिंदे, सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष धर्मराज काडादी, माजी आमदार नरसय्या आडम, माजी मंत्री तथा शिवसेना नेते उत्तमप्रकाश खंदारे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे, भगीरथ भालके, सुरेश हसापुरे, चेतन नरोटे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.

जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याकडे आमदार प्रणिती शिंदे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. आमदार प्रणिती शिंदे यांची लढत भाजपचे उमेदवार तथा माळशिरसचे आमदार राम सातपुते यांच्याशी होणार आहे. दोन्ही युवा आमदारांमधील लढत ही महाराष्ट्रातील प्रमुख लढतींपैकी एक महत्त्वाची निवडणूक मानली जाते.

Praniti Shinde
Solapur Lok Sabha : भाजपचे राम सातपुते अन्‌ वंचितचे राहुल गायकवाड यांच्या उमेदवारी अर्जात त्रुटी

आई-वडिलांच्या पराभवाचे उट्टे काढणार

ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांचा मागील दोन म्हणजेच २०१४ आणि २०१९ च्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार अनुक्रम शरद बनसोडे आणि डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी यांच्याकडून पराभव झाला होता. तसेच, उज्ज्वला शिंदे यांचाही पोटनिवडणुकीत पराभव झाला होता. त्यामुळे आई-वडिलांच्या पराभवाचे उट्टे काढण्यासाठी प्रणिती शिंदे मैदानात उतरल्या आहेत.

'बीआरएस'च्या भालकेंचा पाठिंबा

भारत राष्ट्र समितीचे पंढरपूर-मंगळवेढ्याचे नेते भगीरथ भालके यांनी आपला पाठिंबा काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांना जाहीर केला आहे. भगीरथ भालके यांचे वडील भारत भालके हे पंढरपूरचे आमदार होते. तसेच, त्यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत भगीरथ भालके यांनीही जवळपास एक लाखाहून अधिक मते घेतली होती. त्यामुळे पंढरपूर-मंगळवेढ्यात भालके यांना मानणाऱ्यांची संख्या मोठी आहे.

R

Praniti Shinde
Latur Lok Sabha Election 2024 : लातूरच्या देशमुखांचा 'मास्टरस्ट्रोक', लढाई मात्र सोपी नाही, कसोटी लागणार

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com