Ashish Deshmukh News : काँग्रेसने नोटीस दिलेले आशिष देशमुख मुंबईहून थेट नागपूरला जाण्याऐवजी पुण्याला का गेले?

मुंबईहून नागपूरला येताना देशमुख यांनी पुण्याला वळसा घातला आहे. पुण्यात ते ज्येष्ठ नेते शरद पवार, विरोधी पक्षनेते अजित पवार आणि आमदार रोहित पवार यांना भेटणार असल्याची चर्चा रंगली आहे.
Ashish Deshmukh
Ashish DeshmukhSarkarnama
Published on
Updated on

मुंबई : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याविरोधात सातत्याने हल्लाबोल करणारे आशिष देशमुख (Ashish Deshmukh) यांना काँग्रेसच्या (Congress) शिस्तपालन समितीकडून कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. नोटीस मिळाली, त्यावेळी ते मुंबईत होते. परत नागपूरला येताना मात्र ते थेट मुंबईहून नागपूरला येण्याऐवजी पुण्यामार्गे नागपूरला आले. त्यामुळे त्यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाची एकच चर्चा राज्यात सुरू झाली आहे. मात्र, देशमुख यांनी त्यावर स्पष्टीकरणही दिले आहे. (Why did Ashish Deshmukh go to Pune instead of direct to Nagpur from Mumbai?)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाकडून पटोले यांना खोके मिळत असल्याचा आरोप करून देशमुख यांनी विदर्भात खळबळ उडवून दिली होती. त्यानंतरही देशमुख यांनी पटोले यांच्याविरोधात जोरदार बॅटिंग सुरूच ठेवली आहे. पटोले यांची संभाजीनगरमधील महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभेला अनुपस्थिती, नागपुरात वज्रमूठ सभेनंतर राहुल गांधी यांची स्वतंत्र सभा ठेवणे आणि विधानसभेचे अध्यक्षपद तडकाफडकी सोडणे याबाबत देशमुख यांनी संशय व्यक्त केला आहे.

Ashish Deshmukh
Deshmukh Vs Patole : पटोलेंनी विधानसभेचे अध्यक्षपद कोणालाही न विचारता संशयास्पदरित्या सोडले : आशिष देशमुखांना पुन्हा हल्लाबोल

दरम्यानच्या काळात ज्येष्ठ नेते शरद पवार हे विदर्भाच्या दौऱ्यावर गेले होते. त्यावेळी त्यांनी आशिष देशमुख यांच्या शेतात जाऊन ऊसपिकाची पाहणी केली होती. त्यामुळे देशमुख यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाची चर्चा सुरू झाली होती. त्याचा देशमुख यांनी थेट इन्कार केला नसला तरी आपण राष्ट्रवादीत जाणार असेही म्हटलेले नाही. त्यातच देशमुख यांना कारणे दाखवा नोटीस मिळाल्यामुळे त्यांच्यावर कारवाई होणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

Ashish Deshmukh
Karnataka Assembly Election : ‘शिवकुमारांनी माझी राजकीय कारकीर्द उद्ध्वस्त केली’: दुसरी यादी जाहीर होताच काँग्रेसमध्ये उफाळली बंडखोरी

नोटीस मिळाल्यानंतर मुंबईहून नागपूरला येताना देशमुख यांनी पुण्याला वळसा घातला आहे. पुण्यात ते ज्येष्ठ नेते शरद पवार, विरोधी पक्षनेते अजित पवार आणि आमदार रोहित पवार यांना भेटणार असल्याची चर्चा रंगली आहे. पुण्याला का गेलो आणि पवारांची भेट झाली का, याबाबत देशमुख म्हणाले की, शुक्रवार, शनिवार आणि रविवार असा लाँग वीकेंड आल्यामुळे मुंबई ते नागपूर विमान सेवेच्या तिकिटदरात एकदम मोठ्या प्रमाणत वाढ झाली, त्यामुळे मी पुण्याच्या मार्गाने नागपूरला पोहोचलो, असे उत्तर आशिष देशमुख हे पुण्यात शरद पवार, अजित पवार आणि रोहित पवार यांना भेटणार असल्याच्या बातम्या यायला लागल्या आहेत, त्यावर दिले.

Ashish Deshmukh
Solapur News : जत्रेतील ऑर्केस्ट्राचा नारळ फोडण्यासाठी लावली चक्क बोली : साठी पार केलेल्या शेतकऱ्याने मारली बाजी!

ज्येष्ठ नेते शरद पवार हे नुकतेच माझ्या शेतावर येऊन गेले आहेत. माझ्याशेतातील उसाची लागवड पाहिली, त्यामुळे एवढ्या लवकर त्यांना भेटण्याची संयुक्तता नव्हती, असेही आशिष देशमुख यांनी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com