Ahmednagar Politics : नगर दक्षिणेत काँग्रेसला एकही जागा नाही; श्रीगोंद्याच्या जागेवरुन आघाडीत पेच...

Ahmednagar News : श्रीगोंदे मतदारसंघातील जागा महाविकास आघाडीमध्ये सध्या राष्ट्रवादीकडे आहे.
Congress, Ncp News
Congress, Ncp NewsSarkarnama

Shrigonda Vidhan Sabha Constituency News : श्रीगोंदे मतदारसंघातील जागा महाविकास आघाडीमध्ये सध्या राष्ट्रवादीकडे आहे. ही जागा काँग्रेसला मिळावी यासाठी पक्षाची जोरदार मोर्चेबांधणी सुरु आहे. जिल्ह्यातील दक्षिण भागात काँग्रेसला विधानसभेला एकही मतदारसंघ नाही. श्रीगोंद्यात पक्षाचे संघटन मजबूत असल्याचा दावा केला जात आहे. त्यातच पक्षाचे जिल्हाध्यक्षपद श्रीगोंद्यात असल्याने राष्ट्रवादीकडून ही जागा घेण्यासाठी प्रयत्न सुरु झाल्याची माहिती आहे.

मुंबईत याबाबत काँग्रेस नेत्यांमध्ये चर्चा झाल्याची माहिती आहे. नगर लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादीकडे (NCP) आहे. त्यासोबतच नगर शहर, शेवगाव-पाथर्डी, पारनेर, श्रीगोंदे-नगर व कर्जत-जामखेड या सगळ्या ठिकाणी महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी लढते. त्यामुळे काँग्रेसला संधी असूनही काही ठिकाणी शांत बसावे लागते. त्यामुळे पक्षाचे संघटन त्यापटीत वाढत नसल्याने कार्यकर्त्यांची नवी फळी तयार होत नसल्याचे वास्तव आहे. या सगळ्यात राष्ट्रवादीचे वर्चस्व वाढते.

Congress, Ncp News
Nagpur News : ओबीसी विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीसह विविध मागण्यासाठी नागपुरात समता परिषदेकडून साखळी उपोषण

याबाबत काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये चर्चा झाली आहे. पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांच्याकडे याबाबत पक्षाच्या स्थानिक नेत्यांनीही म्हणणे मांडले आहे. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी यापुर्वीच श्रीगोंद्यातून अनुराधा नागवडे या विधानसभा लढणार असल्याचे जाहीर करुन टाकले आहे. त्याही पक्षाच्या महिला जिल्हाध्यक्ष असल्याने नागवडे यांच्या वक्त्यव्याला कमी लेखून चालणार नाही. त्यामुळे श्रीगोंद्याच्या जागेवरुन काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये रस्सीखेच होऊ शकते.

Congress, Ncp News
Gulabrao Patil News : राऊतांच्या कृत्यावरुन त्यांची संस्कृती कळते; गुलाबराव पाटील संतापले

श्रीगोंद्यातून राष्ट्रवादीच्या वतीने राहूल जगताप व घनशाम शेलार हे दावेदार आहेत. काँग्रेसकडून (Congress) अनुराधा नागवडे यांनी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. त्यामुळे आघाडीपुढे श्रीगोंद्याच्या जागेवरुन पेच निर्माण होवू शकतो.

यापुर्वी राष्ट्रवादीलाच जास्त संधी...

१९९९ ला राष्ट्रवादीची स्थापना झाली त्यावेळी विद्यमान आमदार बबनराव पाचपुते यांच्याविरुध्द काँग्रेसने शिवाजीराव नागवडे यांना मैदानात उतरविले होते. त्यावेळी नागवडे यांनी पाचपुते यांचा पराभव केला होता. मात्र, त्यानंतर ही जागा राष्ट्रवादीकडेच राहिली. 2014 मध्ये दोन्ही काँग्रेस स्वतंत्र लढले होते. मात्र, नागवडे यांनीच राहूल जगताप यांच्यासाठी लढा दिला व यश मिळवले. आता या वेळी पुन्हा काँग्रेसने तयारी सुरु केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
sarkarnama.esakal.com