Congress News : विधानसभेला निराशाजनक कामगिरी,काँग्रेस फिरवणार गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत भाकरी,मोठ्या बदलाचे संकेत

belgaon Congress Adhiveshan 2024 : काँग्रेसच्या या बैठकीसाठी देशभरातून 130 पेक्षा अधिक प्रमुख नेत्यांनी उपस्थिती लावली होती. या बैठकीत काँग्रेसच्या नऊ संजीवनीसाठी पाच महत्त्वपूर्ण बैठका घेण्यात आल्या.
Congress News
Congress NewsSarkarnama
Published on
Updated on

Belgaon News : राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या बेळगाव येथे झालेल्या नव सत्याग्रह बैठकीत काँग्रेसला नवचैतन्य देण्यासाठी काँग्रेस नेत्यांचे एकमतच झाले आहे. येत्या वर्षभरात काँग्रेसची (Congress) गल्लीपासून दिल्लीपर्यंत संघटनात्मक पुनर्बांधणी केली जाणार आहे. देशभरात काँग्रेसकडून ‘जय बापू, जय भीम, जय संविधान’ हे अभियान राबवले जाणार आहे, अशी माहिती काँग्रेस पक्षाच्या कार्यकारिणीचे सदस्य के. सी. वेणुगोपाल यांनी दिली.

दरम्यान, काँग्रेसच्या या बैठकीसाठी देशभरातून 130 पेक्षा अधिक प्रमुख नेत्यांनी उपस्थिती लावली होती. या बैठकीत काँग्रेसच्या नऊ संजीवनीसाठी पाच महत्त्वपूर्ण बैठका घेण्यात आल्या. दरम्यान, भारताची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग (Manmohan Singh) यांचे निधन झाल्यानंतर आज होणारे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.

बेळगाव येथे राष्ट्रपिता महात्मा गांधीजींच्या अध्यक्षतेखाली झालेल्या काँग्रेस अधिवेशनाची शतकपूर्ती होत आहे. याचे औचित्य साधून काँग्रेसने बेळगाव येथे विविध कार्यक्रमांचा आयोजन करत प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत नव सत्याग्रह बैठक आयोजित केली होती. यावेळी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, खासदार राहुल गांधी यांच्या उपस्थितीत काँग्रेसच्या कार्यकारिणीची महत्त्वाची बैठक गुरुवारी झाली.

Congress News
UBT Shivsena vs BJP : दहा वर्षे खासदार कोणामुळे, हे विसरलात का ? ठाकरेंच्या खासदारांचा भाजपच्या महिला नेत्याने घेतला समाचार

या बैठकीत 2025 पर्यंत काँग्रेसला नव संजीवनी देण्यासाठी झालेल्या चर्चेत अनेक नेत्यांनी आपली मनोगते मांडली. येत्या 2025 या वर्षात संघटनेची पुनर्बांधणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी संघटनात्मक कार्यक्रम आयोजित करून त्यावर भर दिला जाणार आहे. या ऐतिहासिक अधिवेशनाच्या माध्यमातून ‘जय बापू, जय भीम, जय संविधान’ हे अभियान वर्षभर राबवले जाणार आहे.

देशभरात सार्वजनिक सभा घेत देशातील वाढती महागाई आणि विविध प्रश्न हे मांडले जाणार आहेत. यासाठी जिल्ह्यातील नेते या सेमिनार घेत जनतेसमोर जाणार आहेत. येत्या एप्रिल महिन्यात गुजरात येथे काँग्रेसचे महत्त्वाचे अधिवेशन घेतले जाणार आहे. या अधिवेशनामध्ये 2000 हून अधिकजण सहभागी होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Congress News
Sonia Gandhi : मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर सोनिया गांधींचे 'ते' वक्तव्य पुन्हा चर्चेत; म्हणाल्या, 'मला कमीपणा...'

‘एक देश एक निवडणुकी’ला विरोध

काँग्रेसकडून केंद्रातील भाजप सरकारच्या ‘एक देश एक निवडणूक’ या प्रस्तावाला तीव्र विरोध दर्शवला आहे. मल्लिकार्जुन खर्गे यांनी पत्र लिहून विरोध असल्याचे कळविले आहे. या निर्णयामुळे देशाच्या एकात्मतेला धोका आहे. घटनेतील तरतुदींच्या विरोधात हा निर्णय आहे. त्यामुळे याला साफ विरोध असल्याचे वेणुगोपाल यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com