
Kolhapur News, 03 Jan : काँग्रेस नेते सतेज पाटील (Satej Patil) यांनी बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावर भाष्य करताना सरकारवर संशय व्यक्त केला आहे. बीड हत्या प्रकरणाची केस वेगळ्या दिशेला घेऊन जाण्याचा प्रयत्न सुरू आहे का? असा संशय येत असल्याचं पाटील यांनी म्हटलं आहे. ते कोल्हापुरात बोलत होते.
माध्यमांशी बोलताना सतेज पाटील म्हणाले, "या प्रकरणात पोलिसांनी कार्यक्षमता दाखवणे गरजेचे आहे. सत्ता कोणाची आहे. यापेक्षा सिस्टीम काय करते हे महत्त्वाचं आहे. गृह खात्याने आरोपी मिळवण्यासाठी बक्षीस जाहीर केलं आहे. मुख्य आरोपी मिळाल्याशिवाय या केसचा उलगडा होणार नाही. ही केस वेगळ्या दिशेला घेऊन जाण्याचा प्रयत्न सुरू आहे का? असा संशय येतोय.
राजकीय पक्षांच्या नेत्यांपेक्षा पोलिसांची (Police) प्रतिष्ठा पणाला लागली आहे. 20 ते 22 दिवस होऊन गेले तरी आरोपी सापडत नसेल तर देश पातळीवर आम्ही काय उत्तर देणार?" असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला. दरम्यान, राज्यातील अनेक मंत्र्यांमध्ये नारीज आहे. खाते वाटपातील नाराजी दिसू लागली आहे. एका खात्याचं अर्ध खातं करण्यात आलं आहे.
यामुळे नाराजी दिसू लागली असून अनेक मंत्री अद्याप देखील ऑफिसला गेलेले नाहीत. राज्याचे आर्थिक परिस्थितीचा आढावा अद्याप घेण्यात आलेला नाही. नेमकं कोणत्या दिशेने जावं हे मंत्र्यांना कळत नाही. अडचणी भरपूर आहेत. मात्र सरकार सुरू नाही हे वास्तव आहे. 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी या तारखेला झेंडावंदनसाठी फक्त पालकमंत्री नसतो.
जिल्ह्याचा एकूण नियोजन पालकमंत्र्यांकडे असतं. लवकरात लवकर वाद मिटवून जिल्ह्याचा पालकमंत्री मिळावा अन्यथा पालकमंत्री द्या म्हणून आम्हाला उपोषणाला बसावं लागेल, असा इशारा पाटील यांनी सरकारला दिला. दरम्यान, यावेळी त्यांनी लाडकी बहीण योजनेवरूनही (ladki Bahin Yojana) सरकारवर ताशेरे ओढले. ते म्हणाले, जेव्हा ही योजना सुरू झाली तेव्हा अर्थ खात्याने फाईलवर काय लिहिलं होतं? फाईलवर अटी व शर्ती घाला असं लिहिलं होतं का आणि लिहिलं असेल तर तेव्हा का त्या घातल्या नाहीत?
या अटी तुम्हाला आज आठवल्या का? सुरुवातीला बहिणींना दिवाळी भाऊबीज म्हणून पैसे दिले मग आता त्या बहिणींमधला दुरावा तुम्हाला दिसू लागला आहे का? ज्यांना आधी तुम्ही या योजनेचा लाभ दिला आहे त्यांना आता तुम्हाला थांबवता येणार नाही. दिवाळी चांगल्या पद्धतीने साजरी केली असं तुम्ही जाहीरपणे सांगता मग आता भावाने त्याच बहिणींना वाऱ्यावर सोडलं आहे का? असे अनेक प्रश्न पाटील यांन उपस्थित केले.
यावेळी त्यांनी एफआरपी वाढवण्याबाबत केंद्र सरकारकडे आमचा प्रयत्न सुरू असल्याचं सांगितलं. ते म्हणाले, एमएसपी वाढवल्याशिवाय शेतकऱ्याला जास्त पैसे देणे कारखान्यांना परवडणार नसल्याचंही ते यावेळी म्हणाले. साखरेचे दर वाढू द्यायचे नाहीत आणि तिकडे शेतकऱ्याला (Farmers) बिलं मिळू द्यायचे नाहीत असं सरकारचं धोरण सुरू असून नेमकं काय चाललंय कळत नाही. पण शेतकऱ्याला जास्त भाव मिळावा अशी आमची देखील भूमिका आहे, असं सतेज पाटील (Satej Patil) यांनी स्पष्ट केलं
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.