Satej Patil : 'गोकुळवर ज्यांनी घरे भरली त्यांना घरी बसवलं, पण आता.....', सतेज पाटलांचा महाडिक गटावर हल्लाबोल अन् थेट आरोप

Satej Patil On Hasan Mushrif vs Mahadik Group Clash : गोकुळ दूध संघाची वार्षिक सभा नुकतीच पार पडली असून यावेळी सतेज पाटील विरूद्ध महाडिक गट संघर्ष पाहायला मिळेल अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र झाले उलटेच आणि या सभेत थेट मंत्री हसन मुश्रीफ विरुद्ध महाडिक गटात संघर्ष पाहायला मिळाला.
shoumika mahadik And Satej Patil
shoumika mahadik And Satej Patilsarkarnama
Published on
Updated on

Summary :

  1. गोकुळ दूध संघाच्या वार्षिक सभेत हसन मुश्रीफ व महाडिक गटात संघर्ष झाला.

  2. काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी महाडिक गटावर निशाणा साधला.

  3. त्यांनी आरोप केला की पाच वर्षांपूर्वी स्वतःची घरे भरून सत्ता आमच्याकडे सोपवली.

  4. अध्यक्ष नवीद मुश्रीफ यांनी विरोधकांच्या प्रश्नांची उत्तरे दिली.

  5. शौमिका महाडिक यांना अप्रत्यक्ष लक्ष्य करत सतेज पाटील यांनी टीका केली.

Kolhapur News : गोकुळ दूध संघाची वार्षिक सभा नुकतीच पार पडली. पण या सभेत मंत्री हसन मुश्रीफ विरुद्ध महाडिक गट संघर्ष पाहायला मिळाला. त्यावर काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील यांनी निशाणा साधला आहे. पाच वर्षांपूर्वी ज्यांनी स्वत:ची घरे भरली, त्यांना घरी बसवत आमच्याकडे सत्ता दिली. पाच वर्षांत आम्ही चांगला कारभार करत दूध उत्पादकांना न्याय दिला. तसेच अध्यक्ष नविद मुश्रीफ यांनी विरोधकांसोबत चर्चा करून त्यांच्या प्रश्‍नांची उत्तरे दिली आहेत. त्यामुळे विरोधकांनी थोडी परिपक्वता दाखवायला पाहिजे होती’, नवीद मुश्रीफ यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न विरोधी महाडिक गटाकडून करण्यात आल्याची टीका अशी टीका आमदार सतेज पाटील यांनी संचालिका शौमिका महाडिक यांचे नाव न घेता केली.

आमदार पाटील म्हणाले, ‘यावर्षीची सभा अध्यक्ष नविद मुश्रीफ यांनी अगदी संयमाने चालविली. विरोधकांशी पहिल्यापासून चर्चा केली. त्यांचे सर्व प्रश्‍न समजून घेतले. 49 प्रश्‍नांपैकी 25 प्रश्‍न विरोधकांचे होते. संचालकांनी प्रश्‍न विचारायचे नसतात. सभासदांना अभिप्रेत होते. त्या सर्व प्रश्‍नांची उत्तरे दिली आहेत. जे प्रश्‍न होते त्‍या प्रश्‍नांची आधी उत्तरे दिली आहेत.

shoumika mahadik And Satej Patil
Satej Patil: 'दादागिरी' प्रकरणात सतेज पाटलांकडून मुख्यमंत्र्यांची पाठराखण

अध्यक्ष नविद मुश्रीफ यांनी गेल्या पाच वर्षांतील घेतलेला आढावा विरोधकांनीही ऐकून घेतला. सभासदांनी विचारलेल्या सर्व प्रश्‍नांची मुद्देसूद उत्तरे कार्यकारी संचालकांनी दिली. विरोधकांनी लेखी विचारलेल्या प्रश्‍नांचीही उत्तरे दिली आहेत. त्यामुळे संघात राजकारण होऊ नये यासाठीच सर्व प्रश्‍नांची उत्तरे दिली आहेत.

गोकुळ संघ हा पाच लाख शेतकऱ्यांशी निगडीत आहे. सत्तेत आलो त्यावेळी दूध उत्पादकांना प्रतिलिटर दोन रुपये दरवाढ देण्याची घोषणा केली होती. तर आम्ही प्रतिलिटर 15 रुपये दरवाढ दिली आहे. सौरऊर्जा प्रकल्पातून वीज दर बचत, दूध दरवाढीसह उत्पादकांना फायदा देणारे निणर्य घेतले आहेत.

shoumika mahadik And Satej Patil
Satej Patil : सतेज पाटील यांना सत्तेत नसतानाही मिळणार लाल दिवा?

FAQs :

प्र.1: गोकुळ दूध संघाच्या सभेत काय घडले?
उ. सभेत हसन मुश्रीफ व महाडिक गटात संघर्ष झाला.

प्र.2: सतेज पाटील यांनी कोणावर टीका केली?
उ. त्यांनी महाडिक गटावर आणि अप्रत्यक्षपणे शौमिका महाडिक यांच्यावर टीका केली.

प्र.3: नवीद मुश्रीफ यांची भूमिका काय होती?
उ. त्यांनी विरोधकांचे प्रश्न ऐकून उत्तरे दिली.

प्र.4: संघर्षाचे कारण काय होते?
उ. गोकुळ दूध संघातील सत्ता संघर्ष आणि व्यवस्थापनावर टीका.

प्र.5: या सभेचा राजकीय संदर्भ काय आहे?
उ. कोल्हापूरच्या सहकारी राजकारणातील वर्चस्वासाठीची स्पर्धा.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com