Sangli Politics : जयश्री पाटलांच्या धक्क्यानंतर काँग्रेस नेत्यांना जाग आलीच; विश्वजित कदम, विशाल पाटील यांनी स्थानिकसाठी ठोकला शड्डू

Vishwajeet Kadam, Vishal Patil On local Body Election : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या रणधुमाळीला सुरूवात झाली आहे. राजकीय पक्ष मोर्च बांधणीला लागले आहेत. आता काँग्रेसने देखील सांगलीत स्थानिकसाठी रणशिंग फुंकले आहे.
vishwajeet kadam And vishal patil
vishwajeet kadam And vishal patilsarkarnama
Published on
Updated on

Sangli Politics News : राज्यातील रखडलेल्या जिल्हा परिषद, महापालिका, नगरपालिका निवडणूक घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहे. त्यापद्धतीने प्रशासकीय कामाला गती आली असून राजकीय पक्ष देखील आता मोर्चेबांधणीला लागले आहेत. सांगलीत भाजपसह राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) बैठका आणि मेळावे घेताना दिसत आहे. यादरम्यान आता मोठा झटका बसलेल्या काँग्रेसने देखील आगामी स्थानिकसाठी रणशिंग फुंकले असून काँग्रेस नेते विश्वजित कदम, विशाल पाटील यांनी शड्डू ठोकला आहे. या दोघांना काँग्रेसच्या आजी-माजी नगरसेवकांसह ग्रामीणच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेत निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे आदेश दिले आहेत.

जिल्ह्यात जिल्हा परिषद, महापालिका, नगरपालिका निवडणुकीसाठी महायुती आणि महाविकास आघाडीतच लढत होणार आहे. पण सध्या जिल्ह्यात भाजपसह अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने आगामी स्थानिकच्या जुळण्या लावण्यात आघाडी घेतली आहे. पण आता आगामी निवडणुकीसाठी काँग्रेसचे नेते आमदार डॉ. विश्वजित कदम, खासदार विशाल पाटील यांनी देखील शड्डू ठोकला असून जिल्हा परिषद गट, पंचायत समिती गण आणि महापालिका प्रभागनिहाय बैठका घेण्याचे नियोजन आखले आहे.

यावेळी विश्वजित कदम, खासदार विशाल पाटील यांनी महानगरपालिकेच्या निवडणुकीबाबत माजी महापौरांसह नगरसेवकांशी सविस्तर चर्चा केली. महाविकास आघाडीच्या माध्यमातून महापालिकेची निवडणूक लढवली जाईल असे संकेत दिले आहेत.

vishwajeet kadam And vishal patil
Sangli Political Battle: सांगलीचा 'वस्ताद' कोण? निशिकांत पाटलांची 'जयंत पाटलांना' टफ फाईट, जिल्हा टप्प्यात आणलाय...

तसेच याबाबत माजी नगरसेवकांना बोलावून स्वतंत्र प्रत्येकाशी बंद खोलीत संवाद साधण्यात आला. महापालिका क्षेत्रातील प्रभागातील स्थिती, निवडणुकीसाठी इच्छुकांबाबतची माहिती घेण्यात आली. कदम यांनीही माजी नगरसेवकांना निवडणुकीबाबत काही सूचना केल्या आहेत.

vishwajeet kadam And vishal patil
Sangli Politics : सांगली उत्तरमध्ये मिनी मंत्रालयाचा आखाडा तापणार? पक्षापेक्षा स्वतःचे अस्तित्व टिकवण्यावर नेत्यांचा भर

काँग्रेस नेत्यांना अखेर जाग आलीच

दरम्यान काँग्रेसच्या बंडखोर नेत्या तथा जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षा जयश्री पाटील यांनी जोरदार धक्का दिला होता. त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. या धक्क्यानंतर आता काँग्रेस नेत्यांना जाग आली असून आगामी स्थानिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक घेण्यात आली. यावेळी माजी महापौर किशोर जामदार, संजय मेंढे, मंगेश चव्हाण, विशाल कलगुटगी, काँग्रेसचे मिरज तालुकाध्यक्ष अण्णासाहेब कोरे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com