Congress News : लाडक्या नेत्याला करवीरनगरीचा अखेरचा निरोप!

PN Patil Passes Away : समविचारी आणि निष्कलंक म्हणून आमदार पाटील यांची राज्यभरात ओळख, शिवायकाँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्या अत्यंत जवळचे असणारे म्हणून देखील आमदार पाटील यांना ओळखले जात होते.
Kolhapur News
Kolhapur News Sarkarnama

kolhapur News : काँग्रेसपक्षाशी अपार निष्ठा असणाऱ्या आमदार पांडुरंग निवृत्ती पाटील यांचं गुरुवारी निधन झाले. कर्तबगार, रोखठोक, निष्ठावंत आणि सर्वपक्षीय मैत्रीपूर्वक राजकारण करणाऱ्या आमदार पी. एन. पाटील यांचे काँग्रेसने एक स्वप्न राखून ठेवले. दोनवेळा आमदार झाल्यानंतर मंत्रिपद मिळेल, अशी आशा असलेल्या आमदार पी. एन. पाटील यांना हुलकावणी दिली.

समविचारी आणि निष्कलंक म्हणून आमदार पाटील यांची राज्यभरात ओळख, शिवाय काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्या अत्यंत जवळचे असणारे म्हणून देखील आमदार पाटील यांना ओळखले जात होते. राजकारणाच्या पलीकडे जाऊन मैत्री सांभाळणाऱ्या आमदार पाटील (PN Patil) यांच्या अंत्यसंस्कारवेळी करवीरवासियांनी मोठी गर्दी केली.

Kolhapur News
Ajit Pawar Latest News : लोकसभेच्या निकालापूर्वी दादांनी बोलावली आमदारांची महत्त्वाची बैठक

आजी- माजी पालकमंत्री, खासदार परदेश दौऱ्यावर

कोल्हापुरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) हे लोकसभा निवडणूक झाल्यानंतर कोल्हापूर जिल्हा बँकेतील संचालकांना घेऊन परदेश दौऱ्यावर गेले आहेत. त्यांनी व्हेनीस इटलीमधून आमदार पाटील यांना श्रद्धांजली वाहून कुटुंबियांचे सांत्वन केले. तर खासदार संजय मंडलिक हे देखील परदेश दौऱ्यावर आहेत. तर माजी पालकमंत्री सतेज पाटील हे कौटुंबिक कामानिमित्त परदेश दौऱ्यावर आहेत. या घटनेचे वृत्त कळताच त्यांनी तात्काळ कोल्हापूरकडे निघाले आहेत. आज मध्यरात्री ते मुंबईत येतील. सकाळी ते आमदार पाटील यांच्या कुटुंबियांची भेट घेतील.

पक्षाशी अपार एकनिष्ठा असणाऱ्या आमदार पी. एन. पाटील यांचे 71 व्या वर्षी निधन झाले. रविवारी घरात पाय घसरून पडल्याने त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन मेंदूमध्ये रक्तस्त्राव झाला होता. आज त्यांचे पहाटेच्या सुमारास निधन झाले. करवीर तालुक्यातील सडोली खालसा या मुळगावी त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

देशमुख कुटुंबाने स्नेह जपला, राजेश, राहुलला धीर दिला

आमदार पाटील आणि माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे कौटुंबिक आणि घनिष्ठ संबंध होते. ही घटना समजल्यानंतर माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे चिरंजीव धीरज देशमुख यांनी उपस्थिती लावली. ज्या पद्धतीने पाटील कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. तोच डोंगर पुन्हा एकदा देशमुख कुटुंबियांवर कोसळला आहे. निष्ठा काय असावी हे आम्ही आमदार पाटील यांच्याकडून शिकलो. त्यांच्या कुटुंबियांना या दुःखातून सावरण्याचे बळ मिळावे, असे धीरज देशमुख यांनी सांगितले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

या लोकप्रतिनिधींनी केली कुटुंबियांचे सांत्वन

आमदार पाटील यांचे निधन झाल्याचे कळताच कोल्हापूर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी यांनी आमदार पाटील यांचे अंतिम दर्शन घेत त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले. श्रीमंत शाहू महाराज, जयंवंतराव आवळे, आमदार ऋतुराज पाटील, धीरज देशमुख, आमदार जयश्री जाधव, माजी आमदार महादेवराव महाडिक, मंत्री चंद्रकांत पाटील, सांगली काँग्रेस नेते विशाल पाटील, खासदार धनंजय महाडिक, माजी खासदार संभाजीराजें छत्रपती, माजी आमदार चंद्रदीप नरके, माजी आमदार युवराज मालोजीराजे छत्रपती , माजी अध्यक्ष विश्वास पाटील, माजी आमदार संजय घाटगे, माजी मंत्री भरमूआण्णा पाटील, कराडचे आमदार आनंदराव पाटील, आमदार प्रकाश आबिटकर, माजी आमदार संपत बापू पाटील, शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजीत घाटगे ही नेतेमंडळी उपस्थित होते.

मुख्यमंत्र्यांकडून श्रद्धांजली

मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून आमदार पाटील यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. शिवाय जिल्हा प्रशासनाला आमदार पाटील यांच्यावर शासकीय इतमामत अंत्यसंस्कार करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

(Edited By : Sachin Waghmare)

Kolhapur News
P N Patil Passes Away : काँग्रेस निष्ठावंत आमदाराला पोरकी झाली, करवीरवासियांचा पांडुरंग हरपला

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com