P N Patil Passes Away : काँग्रेस निष्ठावंत आमदाराला पोरकी झाली, करवीरवासियांचा पांडुरंग हरपला

MLA P.N Patil News: पैशाचा दूरूउपयोग करून सत्तेसाठी लाचार आणि खुर्ची मिळवण्यासाठी बेजार झालेल्या राज्यकर्त्यांच्या डोळ्यात अंजन घालणारा आमदार म्हणून पी. एन. पाटील (P N Patil) यांची ओळख.
P N Patil Passes Away
P N Patil Passes AwaySarkarnama

Kolhapur P N Patil Latest News, 23 May : पैशाचा दूरूउपयोग करून सत्तेसाठी लाचार आणि खुर्ची मिळवण्यासाठी बेजार झालेल्या राज्यकर्त्यांच्या डोळ्यात अंजन घालणारा आमदार म्हणून पी. एन. पाटील (P N Patil) यांची ओळख. पक्ष निष्ठा कशी असावी याचं मूर्तीमंत उदाहरण म्हणजे आमदार पाटील. सत्ता असो वा नसो, पद असो वा नसो. नेहमीच आपल्या वैचारिक भूमिकेला कुठेही ठेच आणि डाग न लावता राजकारण करणारा आमदार म्हणून पी. एन. पाटील यांची महाराष्ट्राच्या राजकारणात ओळख होती. अलीकडे ईडीचा वापर करून आमदारांवर दबाव टाकण्याचे प्रयत्न सुरु असताना स्वतः ईडी कार्यालयात हजर राहून आपल्या पक्षाप्रति निष्ठा ठेवणारा आमदार आज या जगातून कार्यकर्त्यांना पोरखा करून गेला. आज त्यांची मृत्यूची झुंज संपली पहाटे त्यांचं निधन झालं.

काँग्रेसमध्ये (Congress) दोन गट पडल्यानंतर 1999 साली आमदार पी एन पाटील यांना जिल्हा काँग्रेस पदाची जबाबदारी मिळाली. तेंव्हापासून ते आत्तापर्यंत पाटील यांनी कधीही खांद्यावरून तिरंगा उतरू दिला नाही. सत्तेसाठी तशी गद्दारी केली नाही. राजकारणात वैचारिक भूमिका घेऊन त्यांचा नेहमीच सहकारात ही लढा राहिला आहे. त्यांचे मूळ गाव करवीर (Karveer) तालुक्यातील सडोली खालसा होय. पूर्वीचा सांगरूळ विधानसभा मतदारसंघ आणि आताचा करवीर विधानसभा मतदारसंघात गावपातळीपर्यंत बांधलेली कार्यकर्त्यांची फळी आजही तितकीच मजबूत आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

आमदार होण्यापूर्वी दिंडनेर्लीच्या फोंड्या माळावर राजीवजी सूत गिरणीची उभारणी केली. श्रीपतरावदादा बँक स्थापन करून ती उत्तम पध्दतीने चालवून दाखवली. सुरु केलेली कोणतीच संस्था अडचणीत आली म्हणून बंद करण्याची नामुष्की त्यांच्यावर आली नाही. तीन पाटील यांचे करवीर तालुक्यातील काम पाहता करवीरच्या जनतेने त्यांना 2004 आमदार केले. 2009 आणि 2014 मध्ये त्यांना पराभव स्वीकारावा लागला. त्याला पक्षातीलच काही जबाबदार होते. पण कोणी गद्दारी केली म्हणून त्याच्यावर आमदार पी एन पाटील कधीच द्वेष दाखवत नसत. जे वाट्याला आलं ते स्वीकारावं हीच त्यांची राजकीय नैतिकता होती. पण वाट्याला आलं नाही म्हणून आपण पक्ष सोडावा. असेही नाही. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा आमदार झाले.

2004 ला पी एन पाटील पहिल्यांदा आमदार झाले. राजाची माजी मुख्यमंत्री स्व. विलासराव देशमुख (Vilasrao Deshmukh) अत्यंत जवळचे आणि विश्वासू सहकारी म्हणून पाटील यांची ओळख होते. त्यावेळी आमदार पाटील हे पहिल्यांदाच आमदार झाल्याने त्यांना मंत्रीपदाची संधी मिळाली नाही. त्यावेळी त्यांना वीज मंडळाचे संचालकपद मिळाल्याचे सांगितले जाते. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना पुन्हा आमदार केले. त्यावेळी महाविकास आघाडीचे सरकार आले. त्यांना मंत्रीपद मिळेल अशी आशा होती. मात्र कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यातील काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजीमुळे त्यांचे मंत्रिपद हुकले. त्यानंतर कार्यकर्त्यांचा मेळावा घेत त्यांनी पक्षाबाबत नाराजी व्यक्त केली. काँग्रेस पक्षाची त्यांची निष्ठा कायम राहिली.

ईडीच्या कार्यालयात हजर

आमदार पी. एन. पाटील हे कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक आहेत. त्यांना फेब्रुवारी 2023 महिन्यातच ईडीने चौकशीसाठी समन्स बोलावले होते. मात्र, त्यावेळी त्यांनी ईडीसमोर हजेरी लावली नाही. त्यानंतरईडीने पुणे, कोल्हापूरमध्ये ठिकठिकाणी छापेमारी केली. आता आज पाटील हे स्वतःहून ईडीसमोर हजर झाले होते.

P N Patil Passes Away
Jairam Ramesh News : इंडिया आघाडीचा पंतप्रधान कोण? दोन दिवसांत ठरवणार, काँग्रेस नेत्याने सांगून टाकलं

राजकीय प्रवास

आमदार पी. एन.पाटील यांनी आत्तापर्यंत सहा विधानसभा निवडणुका लढवल्या आहेत. सहा पैकी 2004 आणि 2019 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना यश मिळाले. 1995, 1999, 2009 आणि 2014 या विधानसभा निवडणुकीत त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. 1995- 1999 च्या निवडणुकीत शेकापचे संपतराव पवार यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला. तर 2004 च्या निवडणुकीत पवार यांना पाटील यांनी पराभव दिला. त्यानंतर शिवसेनेचे चंद्रदीप नरके यांनी 2009 आणि 2014 मध्ये पी एन पाटील यांचा पराभव केला. 2019 मध्ये चंद्रदीप नरके यांचा त्यांनी वचपा काढला.

P N Patil Passes Away
P N Patil Passes Away : मृत्यूशी झुंज संपली, काँग्रेसचे आमदार पी. एन. पाटील यांची प्राणज्योत मावळली

लोकसभेला प्रचारात आघाडीवर

25 वर्षानंतर कोल्हापूर लोकसभेची जागा काँग्रेसला मिळाल्यानंतर काँग्रेसमध्ये उत्साहाचे वातावरण होते. गाव खेड्यापर्यंत पोहोचलेली काँग्रेस पुन्हा उर्जित अवस्थेत आणण्याची मोठे संधी या निमित्ताने काँग्रेसकडे होते. त्यामुळे आमदार पी एन पाटील देखील यंदाच्या लोकसभा निवडणुकीत शाहू महाराज छत्रपती यांच्या प्रचारात अग्रेसर होते. आमदार पाटील हे 24 तास शाहू महाराज यांच्या प्रचारात व्यस्त होते. मात्र निवडणूक झाल्यानंतर त्यांना चुकीचा त्रास जाणवला. यावेळी शाहू महाराज छत्रपती यांनी देखील त्यांना उपचार घेण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र रविवारी म्हणजे घरी अचानक कोसळले. त्यात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com