Kolhapur Congress : काँग्रेसच्या जयश्री जाधव पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात; 'कोल्हापूर उत्तर'च्या जागेवरुन राजकारण तापणार

Kolhapur North Assembly Constituency News : कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि काँग्रेसमध्ये रस्सीखेच सुरू आहे. या मतदारसंघातून डझनभर उमेदवार आत्तापासूनच रांगेत उभे आहेत. मात्र, ही जागा कुणाला जाणार याबाबत अद्याप स्पष्टता नाही.
Kolhapur Congress Politics
Kolhapur Congress PoliticsSarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News, 10 August : कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि काँग्रेसमध्ये (Congress) रस्सीखेच सुरू आहे. या मतदारसंघातून डझनभर उमेदवार आत्तापासूनच रांगेत उभे आहेत. मात्र, ही जागा कुणाला जाणार याबाबत अद्याप स्पष्टता नाही.

मात्र, प्रत्येक इच्छुकाने मैदानात शड्डू ठोकण्याची तयारी सुरू ठेवली आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष कोल्हापूर उत्तरच्या जागेवरून आक्रमक झाले आहेत. अशातच विद्यमान आमदारांनी आणि कार्यकर्त्यांनी देखील मैदानात उतरण्याची संकेत दिले आहेत.

आमदार जयश्री जाधव (Jayashree Jadhav) यांच्या एक पोस्टने महाविकास आघाडीमधील अनेक नेत्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. 'कामगिरी दमदार जयश्री ताईच पुन्हा आमदार' अशा आशयाची पोस्ट सध्या कोल्हापूर (Kolhapur) उत्तरच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरली आहे. मागील दोन दिवसांपासून आमदार जाधव समर्थकांनी सोशल मिडियावर ‘कामगिरी दमदार, पुन्हा एकदा जयश्रीताई आमदार’ अशा पोस्ट व्हायरल करायला सुरुवात केली आहे. त्यामुळे कोल्हापूर उत्तरमधून काँग्रेस अंतर्गत उमेदवारीसाठी रस्सीखेच वाढल्याचं दिसत आहे.

या मतदारसंघात काँग्रेसचे अर्धा डझनभर उमेदवार रांगेत आहेत. पण आमदार जाधव यांच्या समर्थकांच्या नव्या पोस्टमुळे जयश्री जाधव या पुन्हा निवडणुकीसाठी इच्छुक असल्याचे संकेत दिले आहेत. चंद्रकांत जाधव यांचे नोव्हेंबर 2021 मध्ये निधन झाले. त्यानंतर विधानसभेची पोटनिवडणूक झाली. त्यावेळी महाविकास आघाडी (MVA) सत्तेत होती.

Kolhapur Congress Politics
BJP Vs Shivsena UBT : अर्धवटराव, बालिश, विनोदबुद्धी अन् थेट ठाकरेंच्या देशभक्तीवर प्रश्नचिन्ह; बावनकुळे नेमकं काय म्हणाले?

आघाडी धर्म पाळत शिवसेनेने ही जागा काँग्रेसला सोडली. काँग्रेसकडून जयश्री जाधव यांना उमेदवारी मिळाली. त्यात जाधव या विजयी झाल्या. नगरसेवक ते आमदार हा जयश्री जाधव यांचा प्रवास. दोन्ही ठिकाणी त्यांनी पहिल्यांदाच प्रतिनिधीत्व केले. आमदार म्हणून शहरवासियांच्या प्रश्ना संदर्भात सरकार दरबारी पाठपुरावा, निवेदन देणे या माध्यमातून त्या सक्रिय आहेत.

सध्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात या मतदारसंघावर दावा करण्यात येतोय. मात्र ही जागा नेमकी कोणाला द्यायची यावर अजूनही एकमत नाही. महाविकास आघाडी म्हणून जो निर्णय घेईल त्या बाजूने सर्वजण एकत्र असतील.

Kolhapur Congress Politics
Ajit Pawar : "भुजबळ प्रचाराला जातील त्या मतदारसंघातील नेता पाडा", जरांगे-पाटलांचं विधान अन् अजितदादा म्हणाले...

काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आणि काँग्रेसचे नेते आमदार सतेज पाटील यांच्यावरच या मतदारसंघातील काँग्रेस आणि राष्ट्रवादीची भवितव्य अवलंबून आहे. त्यांच्या सूचनेनुसार या मतदारसंघात उमेदवार कोण असावा? याचा निर्णय होणार आहे. तत्पूर्वी कार्यकर्त्यांनी आतापासूनच रान उठवायला सुरुवात केल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे जागावाटपावेळी 'कोल्हापूर उत्तर'च्या जागेवरुन आघाडीतील वातावरण तापण्याची शक्यता आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com