Kolhapur Lok Sabha Election 2024 Result : बावड्याचा पाटील पुरून उरला; मोदी सभेनंतरही पुरोगामीचा शिक्का कायम

Shahu Maharaj And Satej Patil Politics : कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील शाहू महाराज यांच्या विजयी मताधिक्यात काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. सतेज पाटलांच्या परफेक्ट नियोजनामुळे शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवाराचा सुफडा साफ झाला.
Shahu Maharaj  And Satej Patil
Shahu Maharaj And Satej Patil Sarkarnama

Kolhapur Lok Sabha Election : कोल्हापुरातून शाहू महाराज छत्रपती विजयाच्या जवळपास आहेत. 19 व्या फेरी अखेर शाहू महाराज छत्रपती यांना 1 लाख 6 हजार 347 इतक्या मतांचे मताधिक्य आहे. शाहू महाराज यांच्या उमेदवारी पासून ते विजयी करण्यापर्यंत सर्वात मोठा 'हात' काँग्रेसचे नेते आणि माजी पालकमंत्री सतेज पाटील यांचा आहे.

दिवंगत आमदार पी. एन. पाटील यांची ही साथ सतेज पाटील यांना लाभली. सतेज पाटलांनी गतिमान केलेली प्रचार यंत्रणा पाहून खुद्द देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कोल्हापुरात सभेसाठी यावे लागले. इतकेच नव्हे तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जवळपास तीन दौरे करून सात दिवस तळ ठोकला होता. मात्र तरीही सतेज पाटील यांच्या परफेक्ट नियोजनामुळे शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवाराचा सुफडा साफ झाला.

कोल्हापूर लोकसभा मतदार संघात महायुतीकडे डझनभर नेते असताना महाविकास आघाडीचा निभाव लागणे शक्य नसल्याचे चित्र होते. मात्र राष्ट्रवादीचे नेते शरद पवार आणि काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी शाहू महाराज यांची उमेदवारीवरून आग्रह करत महायुतीच्या नेत्यांपुढे कडवे आव्हान उभे केले. मात्र महाविकास आघाडीत ही जागा कोणाला सुटणार यावरून बरेचशी रस्सीखेच निर्माण झाली. या जागा वाटपात सतीश पाटील यांनी ही जागा काँग्रेसला घेत पहिला विजय मिळवला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Shahu Maharaj  And Satej Patil
Lok Sabha Result Live : दुसऱ्या फेरीअखेर मुश्रीफ घाटगेंनी राखले, राधानगरीतून के.पी पाटलांनी डाव पलटला? 

महायुतीकडून संजय मंडलिक यांना उमेदवारी मिळाल्यानंतर महाविकास आघाडीची मोठी अडचण दूर झाली. महायुतीतील अनेक दिग्गज नेते कोल्हापुरात असताना खासदार संजय मंडलिक यांच्या प्रचारासाठी खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री अमित शहा, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे प्रचारासाठी कोल्हापूरच्या मैदानात उतरले होते. इतकेच नव्हे तर खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीन वेळा कोल्हापूरचे दौरे करून आठ दिवस तळ ठोकला होता. महायुतीची संपूर्ण प्रचार यंत्रणा मुंबई आणि दिल्लीतून सुरु असताना महाविकास आघाडीचे प्रचार यंत्रणा ही 'अजिंक्यतारा' मधून कार्यरत होती. नियोजनबद्ध, नेटके कार्यक्रम, सातत्य, पाठपुरावा घेत काँग्रेसचे सतेज पाटील यांनी करेक्ट कार्यक्रम केला.

महायुतीतील नेत्यांनी प्रचारात राम मंदिर, मशीद आणि जातीयतेढ निर्माण करणारी वक्तव्य आल्यानंतर सतेज पाटील यांनी पुरोगामी कोल्हापूर जिल्ह्यात शाहूंच्या विचारांच्या प्रचाराला पसंती दिली. ही निवडणूक त्यांनी भाजपविरुद्ध जनता, असे केल्याने सतेज पाटील यांच्या नेतृत्वाला कोल्हापूरच्या जनतेने साथ दिली आहे. त्यामुळे कोल्हापूरचा पुरोगामी पणा जिवंत ठेवण्यासाठी महत्वाची भूमिका पाटील यांनी पार पाडल्याचे या निकालावरून दिसून येते.

Shahu Maharaj  And Satej Patil
Lok Sabha Election 2024 : मुश्रीफ-महाडिकांची अग्निपरिक्षा; एकटा 'पाटील' पडणार दोघांना भारी?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com