Shrimant Shahu Maharaj : मराठा समाजाच्या आंदोलनात शाहू महाराजांची एन्ट्री; आरक्षणाची मागणी करत सरकारला दिला थेट इशारा

Shrimant Shahu Maharaj Warning to Maharashtra Goverment Over Maratha Reservation Agitation : गेल्या चार दिवसापासून आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांना आता राज्यभरातून पाठिंबा वाढत आहे. दरम्यान सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना जरांगे यांनी कोल्हापुरच्या छत्रपती घराण्याचा दम दिला होता.
Shrimant Shahu Maharaj Warning On Maratha Reservation Agitation
Shrimant Shahu Maharaj Warning On Maratha Reservation Agitationsarkarnama
Published on
Updated on

Summary :

  1. मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखालील आंदोलनात खासदार श्रीमंत शाहू महाराजांनी एन्ट्री घेतली आहे.

  2. शाहू महाराजांनी परिपत्रक काढत राज्य सरकारलाच थेट इशारा दिला आहे.

  3. मराठा आरक्षणाच्या लढ्यात गावागावातून पाठिंबा मिळत असून आंदोलनाला नवी ऊर्जा मिळाली आहे.

Kolhapur News : गेल्या चार दिवसांपासून मुंबईत संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा आरक्षणासंदर्भात आंदोलन सुरू आहे. राज्यभरातून अनेक मराठा बांधव मुंबईत दाखल झाले आहेत. गावागावात आता या लढ्यास पाठिंबा मिळत असताना कोल्हापूरचे खासदार श्रीमंत शाहू महाराज यांनी या लढ्यामध्ये एन्ट्री केली आहे. मराठा आरक्षणासंदर्भात मागणी करत त्यांनी राज्य सरकारलाच थेट इशारा दिला आहे. त्या संदर्भात त्यांनी परिपत्रक काढत राज्य सरकारलाच धारेवर धरले आहे.

सरकारच्या कोणत्याही आश्वासनावर विश्वास ठेवून मराठा समाज आंदोलन मागे घेण्याच्या तयारीत नाही. त्यामुळे आंदोलनाची नोंद गांभीर्याने घेण्याची जबाबदारी ही राज्य सरकारची आहे. आरक्षणाची 50% मर्यादा वाढवावी हा आम्ही पर्याय सुचवला होता. त्यासाठी घटनेमध्ये दुरुस्त करावी जेणेकरून मराठा समाजाला आरक्षण मिळेल, असेही सुचवल्याचे खासदार श्रीमंत शाहू महाराज म्हणाले.

Shrimant Shahu Maharaj Warning On Maratha Reservation Agitation
Amit Thackeray On Maratha Reservation : मनोज जरांगेंची राज ठाकरेंवर जिव्हारी लागणार टीका पण अमित ठाकरेंनी मराठ्यांचं मन जिंकलं, थेट आदेश दिला

निवडणुकीच्या काळात महायुतीने कायद्याच्या निकषावर टिकेल असे आरक्षण दिले जाईल असे आश्वासन दिले होते. त्यामुळेच राज्यातील जनतेने महायुतीला सत्ता दिली. आता मराठा समाजाला आरक्षण देण्याची जबाबदारी ही राज्य सरकारची आहे.

नोकरी आणि शैक्षणिक क्षेत्रात आरक्षण घेतल्याशिवाय मराठा समाज आता थांबणार नाही. तर सरकारने आश्वासन पूर्तता करण्याची हिच वेळ योग्य आहे. त्यामुळे सरकारने आपले आश्वासन पाळावे असेही आवाहन शाहू महाराज यांनी केले आहे.

पण महायुती मधील नेते हे आरक्षणाच्या मुद्द्यालाच बगल देण्याचा प्रयत्न करत असल्याचे आता दिसत आहे. सरकार जबाबदारी टाळू लागले तर याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील. याची सरकारने जाणीव ठेवावी, असा इशारा खासदार श्रीमंत शाहू महाराज यांनी राज्य सरकारला दिला आहे.

Shrimant Shahu Maharaj Warning On Maratha Reservation Agitation
BJP Leader On Maratha Reservation Protest: वादग्रस्त वक्तव्यांमुळे आंदोलन चिघळतंय? मराठा समाज अधिक आक्रमक होतोय?

FAQs :

प्र.१. श्रीमंत शाहू महाराजांनी आंदोलनाबाबत काय भूमिका घेतली?
उ. शाहू महाराजांनी परिपत्रक काढून राज्य सरकारला थेट इशारा दिला आहे.

प्र.२. हे आंदोलन कोणाच्या नेतृत्वाखाली सुरू आहे?
उ. मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आझाद मैदानावर आंदोलन सुरू आहे.

प्र.३. मराठा समाजाचा प्रतिसाद कसा आहे?
उ. गावोगावी मराठा समाज एकवटत असून आंदोलनाला मोठा पाठिंबा मिळत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com