Shahu Maharaj : 'कोल्हापूर उत्तर'मध्ये पुन्हा राजकारण पेटलं; 'तो' उमेदवार म्हणतो, 'शाहू महाराजांनी माझी फसगत केली...'

Kolhapur North Constituency : 'सर्व जातीपातीच्या धर्मांना आणि संस्थांना एकत्र करून सामाजिक सलोखा निर्माण करणारा रस्त्यावरील चळवळ उभा करणारा मी सामान्य कार्यकर्ता आहे. कोणत्याही राजकीय अभिलाषा नव्हती. आमदारकीची स्वप्नंही पाहिली नव्हती. फक्त...'
Satej Patil, Madhurima Raje, Shahu Maharaj
Satej Patil, Madhurima Raje, Shahu Maharaj Sarakarnama
Published on
Updated on

Kolhapur News : कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघांमधील तिढा अद्याप सुटण्याचे नाव घेत नाही. खासदार शाहू महाराज छत्रपती (Shahu Maharaj) यांचे निकटवर्तीय असलेले मराठा महासंघाचे अध्यक्ष वसंतराव मुळीक यांनी आता थेट त्यांनाच टार्गेट केले आहे. उमेदवारी अर्ज माघार घेण्याच्या शेवटच्या दिवशी वसंत मुळीक यांनी माघार घेतल्यानंतर त्यांनी आज पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली.

सध्या कोल्हापूर उत्तर मतदारसंघाची चर्चा राज्यभरात सुरू आहे. आधी राजेश लाटकर यांना उमेदवारी जाहीर केली. त्यानंतर अंतर्गत विरोधामुळे त्यांना डावलून मधुरिमाराजे छत्रपती यांना उमेदवारी देण्यात आली.अशातच मधुरिमाराजे यांनी ऐनवेळी माघार घेतली,पुन्हा लाटकर यांना महाविकास आघाडी पुरस्कृत उमेदवार म्हणून पुढे आणले आहे. अशा अनेक नाट्यमय घडामोडी या मतदारसंघात घडल्या.

शाहू महाराज यांच्या शब्दाचा मान ठेवून मी मधुरिमाराजे छत्रपती यांच्यासाठी माघार घेतली. महाराजांनी शब्द दिला म्हणून माघार घेतली. तातडीने गेलो आणि सही करून अर्ज मागे घेतला. मात्र, मधुरिमाराजे छत्रपती यांनी माघार घेतल्याची कळताच आम्हाला धक्का बसला. मी माघार घेतल्यानंतर लोकांनी माझ्या भूमिकेवर अनेक प्रश्न उपस्थित केले.

मुळीक म्हणाले, माझी फसगत शाहू महाराज, मधुरिमाराजे आणि मालोजीराजे यांनी केली आहे. याचे उत्तर मला द्यावेच लागेल. कारण मला समाजासमोर जायचे आहे. माझ्याकडे काही नाही म्हणून तुम्ही मला काही देणार नाही,याचे उत्तर मला द्या, अन्यथा माझ्याकडे पुढचे मार्ग आहेत. असा इशारा वसंतराव मुळीक यांनी दिला आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

Satej Patil, Madhurima Raje, Shahu Maharaj
Ajit Pawar : 'जयंत पाटलांना वाटलं असेल कशाला मी 'तुतारी'चा..' ; अजित पवारांनी लगावला टोला!

उमेदवारी निवडीनंतर नाट्यमय घडामोडी होऊन मधुरीमाराजे यांनी कोल्हापूर उत्तर (Kolhapur) मधून माघार घेतली. माघार घेण्याच्या आदल्यादिवशी राजवाड्यावर जाऊन मी शब्द दिला होता. मधुरिमाराजे यांच्या श्रद्धेपोटीच्या आवाहनाला प्रतिसाद देत मी माघार घेतली.

मात्र, नंतर 'कोल्हापूर उत्तर'मध्ये घडलेल्या घडामोडीनंतर मला मोठा धक्का बसला. मला व माझ्या कुटुंबाला आणि कार्यकर्त्यांना प्रचंड मनस्ताप झाला. माझी फसगत झाल्याची भावना अनावर झाल्याने कार्यकर्त्यांचा राग मला शांत करावा लागला.

Satej Patil, Madhurima Raje, Shahu Maharaj
Supreme Court On NCP Dispute : सुप्रीम कोर्टाचा निवडणुकीच्या तोंडावर अजितदादांच्या राष्ट्रवादीला दणका; पुढील 36 तासांत 'ती' जाहिरात द्या!

सर्व जातीपातीच्या धर्मांना आणि संस्थांना एकत्र करून सामाजिक सलोखा निर्माण करणारा रस्त्यावरील चळवळ उभा करणारा मी सामान्य कार्यकर्ता आहे. कोणत्याही राजकीय अभिलाषा नव्हती. आमदारकीची स्वप्नंही पाहिली नव्हती. फक्त जनसेवेचं व्रत घेऊन मी निवडणुकीला सामोरे जात असताना छत्रपती घराण्याच्या श्रद्धेपोटी मी माघार घेतली. मात्र, या घडलेल्या घटना मुळे माझी फसगत झाली आहे. या प्रश्नाचे उत्तर कोण देणार असा सवाल ही मराठा महासंघाचे वसंतराव मुळीक यांनी पत्रकार परिषदेत केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com