Solapur Strong Room : सोलापूरच्या स्ट्राँग रुमला काँग्रेस-राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचा खडा पहारा; भाजप निर्धास्त!

Lok Sabha Election 2024 : सोलापूर आणि माढा लोकसभा मतदारसंघासाठी 7मे रोजी मतदान झाले. त्यानंतर या दोन्ही मतदारसंघातील मतदान यंत्रे ही सोलापूर शहरातील रामवाडीच्या शासकीय गोदामाच्या स्ट्राँग रुममध्ये ठेवण्यात आलेल्या आहेत. जिल्हा प्रशासनाकडून पोलिस आणि लष्करी जवानाचा त्या रुमभोवती कडेकोट बंदोबस्त तैनात आहे.
Voting Machine file Photo
Voting Machine file PhotoSarkarnama

Solapur, 26 May : सोलापूर आणि माढा लोकसभा मतदारसंघातील मतदान यंत्रे शहरातील रामवाडी येथील शासकीय गोदामात ठेवण्यात आली आहेत. बारामती आणि शिरूर लोकसभा मतदारसंघात सीसीटीव्ही बंद होण्याच्या घटना घडल्यामुळे या दोन्ही मतदारसंघातील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे कार्यकर्ते डोळ्यात तेल घालून २४ तास स्ट्राँग रूमला पहारा देत आहेत. भाजपचे कार्यकर्ते मात्र निर्धास्त असूनही ते अधून मधून पाहणी करून जात आहेत.

सोलापूर (solapur) आणि माढा (Madha) लोकसभा मतदारसंघासाठी 7 मे रोजी मतदान झाले. त्यानंतर या दोन्ही मतदारसंघातील मतदान यंत्रे (Voting Machine) ही सोलापूर शहरातील रामवाडीच्या शासकीय गोदामाच्या स्ट्राँग रुममध्ये ठेवण्यात आलेल्या आहेत. जिल्हा प्रशासनाकडून पोलिस आणि लष्करी जवानाचा त्या रुमभोवती कडेकोट बंदोबस्त तैनात आहे. याशिवाय काँग्रेस (Congress) व राष्ट्रवादीच्या (NCP) कार्यकर्त्यांचा या स्ट्राँग रुमच्या मुख्य प्रवेशद्वारावरच खडा पहारा आहे. हे कार्यकर्ते पोलिसांसमवेत 24 तास डोळ्यात तेल घालून खडा पहारा देत आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Voting Machine file Photo
Drought Fund Corruption : दुष्काळनिधी घोटाळ्याप्रकरणी पडळकर आक्रमक; ‘सांगली जिल्हा बॅंकेचे संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासक नेमा’

राजकीय कार्यकर्ते आणि पहाऱ्यावरील पोलिस कर्मचाऱ्यांना बसण्याची व विश्रांतीची व्यवस्था मुख्य प्रवेशद्वारालगतच करण्यात आली आहे. त्यासाठी पत्र्याचे शेड उभारण्यात आले आहे. तसेच मांडवही घालून स्टेज तयार करण्यात आला आहे. या ठिकाणी पिण्याची पाण्यासाठी कुलरची व्यवस्था करण्यात आली आहे.

रामवाडी शासकीय गोदामाच्या ठिकाणी एकूण 16 सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. स्टाँग रुमपर्यंतचे सर्व चित्रण सीसीटीव्ही कॅमेऱ्याद्वारे होत आहे. आतमध्ये सील करण्यात आलेल्या स्ट्राँग रुमचेही या कॅमेऱ्याद्वारे चित्रण होत आहे. याशिवाय राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांचीही त्यावर नजर आहे.

माढ्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे, तर सोलापूरमधील काँग्रेसचे कार्यकर्ते २४ तास स्ट्राँग रुमवर लक्ष ठेवून आहेत. त्या तुलनेत भाजपचे कार्यकर्ते निर्धास्त आहेत. ते अधूनमधून या ठिकाणी फेरी मारत आहेत. महसुल विभागाच्या अधिकाऱ्यांशिवाय इतर कुणालाही मुख्य प्रवेशद्वारातून आतमध्ये प्रवेश दिला जात नाही.

Voting Machine file Photo
Madha Lok Sabha : भाजपने निंबाळकरांच्या उमेदवारीची घाई केली अन्‌ माढ्याची सोपी लढाई अवघड झाली....!

काँग्रेस-राष्ट्रवादीचे हे कार्यकर्ते देतात खडा पहारा

स्ट्राँग रूमवर ज्या उमेदवारांना लक्ष ठेवायचे आहे, त्यांच्यासाठी पासची सोय करण्यात आली आहे. एका उमेदवाराला चार पास देण्यात आले आहेत. भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादी उमेदवारांच्या प्रतिनिधींना पास देण्यात आलेले आहेत. राष्ट्रवादीकडून कादीर अरब, अमोल घुले, संदेश जंवझाळ, सूरज शिंदे हे पहारा देत आहेत, तर धीरज खंदारे, तिरुपती परकीपंडला, सुभाष वाघमारे, शिवशंकर अजनाळकर, संजय गायकवाड हे काँग्रेसकडून लक्ष ठेवून आहेत. माढा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार धनाजी मस्के यांच्या वतीने सुभाष अडसूळ, लक्ष्मण मोहिते, रूपेश साठे आदी कार्यकर्ते पहारा देत आहेत.

Edited By : Vijay Dudhale

Voting Machine file Photo
Barshi News : कलेक्टरचा सरपंच, उपसरपंचांसह पाच सदस्यांना दणका; अतिक्रमणप्रकरणी अपात्रतेची कारवाई

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com