Lok Sabha Voting In Solapur : सोलापूर जिल्ह्यात 3617 मतदान केंद्रांवर होणार मतदान; सात हजार पोलिसांचा बंदोबस्त

Lok sabha Election 2024 : सोलापूर जिल्हा हा तीन लोकसभा मतदारसंघात विभागला गेला आहे. सोलापूर, माढा आणि धाराशिव या मतदारसंघांमध्ये सोलापूर जिल्ह्यातील तालुके येतात. सोलापूर जिल्ह्यातील बार्शी हा विधानसभा मतदारसंघ धाराशिव लोकसभा मतदारसंघाला जोडलेला आहे. दुसरीकडे सातारा जिल्ह्यातील माण खटाव आणि फलटण हे दोन विधानसभा मतदारसंघ माढा लोकसभा मतदारसंघाला जोडलेले आहेत.
Solapur Lok sabha Election
Solapur Lok sabha ElectionSarkarnama

Solapur, 06 May : सोलापूर, धाराशिव आणि माढा लोकसभा मतदारसंघासाठी उद्या (ता. 07 मे) सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील 3617 मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे. यात सोलापूर शहरात 798 तर, जिल्ह्याच्या ग्रामीण भागात 2819 मतदान केंद्रांचा समावेश आहे. निवडणूक शांततेत पार पडावी, यासाठी शहर आणि जिल्ह्यात सात हजार पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त असणार आहे.

सोलापूर (Solapur) जिल्हा हा तीन लोकसभा मतदारसंघात विभागला गेला आहे. सोलापूर, माढा (Madha) आणि धाराशिव (Dharashiv) या मतदारसंघांमध्ये सोलापूर जिल्ह्यातील तालुके येतात. सोलापूर जिल्ह्यातील बार्शी (Barshi) हा विधानसभा मतदारसंघ धाराशिव लोकसभा मतदारसंघाला जोडलेला आहे. दुसरीकडे सातारा जिल्ह्यातील माण खटाव आणि फलटण हे दोन विधानसभा मतदारसंघ माढा लोकसभा मतदारसंघाला जोडलेले आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Solapur Lok sabha Election
Aditya Thackeray's Sabha : मुख्यमंत्री शिंदेंचा डोळा असलेल्या कन्नड मतदारसंघात आदित्य ठाकरेंची सभा...

सोलापूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे (Praniti shinde) आणि भाजपचे आमदार राम सातपुते (Ram Satpute) यांच्यात काँटे की टक्कर आहे. माढा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून धैर्यशील मोहिते पाटील (Dhairyasheel Mohite Patil), भाजपकडून खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर (Ranjitshinh Naik Nimbalkar) हे आमनेसामने आहेत. धाराशिवमध्ये खासदार ओमराजे निंबाळकर (Omraje Nimbalkae) यांना राणाजगजितसिंह पाटील यांची पत्नी अर्चना पाटील (Archana Patil)यांनी आव्हान दिले आहे.

सोलापूर, माढा आणि धाराशिव या तीनही लोकसभा मतदारसंघासाठी उद्या मतदान होत आहे. त्यात सोलापूर शहरात एकूण 798 मतदान केंद्रे असणार आहेत. शहरात एकूण 2,800 पोलिस अधिकारी-कर्मचारी बंदोबस्तासाठी असणार आहेत. यात स्थानिक 1200 पोलिस बंदोबस्तावर असणार आहेत. त्यांच्या सोबतीला बाहेरील अधिकारी आणि कर्मचारी असे 460 जण असणार आहेत. याशिवाय बीएसएफ, एसआरपीएफ आणि आरपीएफच्या तीन तुकड्या, आणि 1050 होमगार्ड असणार आहेत.

Solapur Lok sabha Election
Yamini Jadhav : यामिनी जाधव यांची स्थावर मालमत्ता पाच वर्षांत दुपटीपेक्षा अधिक वाढली

सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात एकूण 2819 मतदान केंद्रे असणार आहेत. या मतदान केंद्रांवर 4300 पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त असणार आहे. यामध्ये 1400 स्थानिक पोलिस, एकूण 196 पोलिस अधिकारी, बीएसएफ, एसआरपीएफ, आरपीएफच्या आठ तुकड्या, तसेच 2400 होमगार्डचा बंदोबस्त असणार आहे

Solapur Lok sabha Election
Solapur Lok Sabha : प्रणिती शिंंदेंच्या प्रचारासाठी मराठा समाजाच्या समन्वयकाने वीस लाख घेतले; शिवसेना जिल्हाप्रमुखांचा आरोप

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com