Kolhapur Lokasabha : कोल्हापूर लोकसभेसाठी काँग्रेस पदाधिकाऱ्यांची सतेज पाटील आणि पी. एन. पाटील यांना पसंती

Kolhapur Politics : कोल्हापूरचे विद्यमान खासदार संजय मंडलिक यांच्याबद्दल लोकांमध्ये नाराजी आहे.
Satej Patil| P.N.Patil
Satej Patil| P.N.PatilSarkarnama

Kolhapur News : माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी बैठकांचा सपाटाच लावला आहे. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी त्यांच्याकडे दिल्यानंतर त्यांनी ठिकठिकाणी आढावा बैठका घेतल्या, यावेळी, कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून माजी मंत्री सतेज पाटील किंवा आमदार पी. एन. पाटील यांना उमेदवार द्यावी, अशी मागणी पदाधिकाऱ्यांनी पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे केली.

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यासाठी पृथ्वीराज चव्हाण यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली. यावेळी सतेज पाटील, पी. एन. पाटील यांच्यासह जिल्ह्यातील कॉग्रेस पदाधिकारी उपस्थित होते.

Satej Patil| P.N.Patil
Prithviraj Chavan News: नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान झाले तर देशातील लोकशाही धोक्यात येईल ; पृथ्वीराज चव्हाण असं का म्हणाले...

कोल्हापूरचे विद्यमान खासदार संजय मंडलिक यांच्याबद्दल लोकांमध्ये नाराजी आहे. त्यांचा लोकांमध्ये संपर्क नसल्याने आणि जिल्ह्यातील विकास कामांचा पाठपुरावा करत नसल्याने त्यांची प्रतिमा बिघडली आहे. यामुळे काँग्रेसला कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात संधी आहे. सतेज पाटील, पी. एन. पाटील असे मातब्बर नेते या मतदारसंघात आहेत, त्यामुळे हा मतदारसंघ काँग्रेसला सोडावा आणि सतेज पाटील किंवा पी. एन. पाटील यांना उमेदवारी द्यावी, अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली.

यावेळी माजी नगरसेविका भारती पवार, तौफिक मुलाणी, सचिन चव्हाण यांनी मनोगत व्यक्त केले. बाजीराव खाडे यांनी आता पर्यंत दुसऱ्या उमेदवारासाठीच काँग्रेस कार्यकर्त्यांची ताकद वाया गेली. आता आम्हाला आमचा उमेदवार पाहिजे, अशी मागणी केली.

Satej Patil| P.N.Patil
Ghodganga Sakhar Karkhana : घोडगंगा कारखान्याच्या कामगारांचे दीड महिन्यापासून आंदोलन; मदतीसाठी सरसावला शिरूर तालुका

यावेळी बोलताना पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, आता पीएम मोदींची जादू चालत नसल्याने, त्यांनी माझ्यावर अवलंबून राहू नका, असं सांगितलं आहे. आता लोक त्यांना प्रश्न विचारू लागले आहेत. त्यांचे फोटो घेऊन गेले तर लोक प्रश्न विचारणारच. इतकेच नव्हे तर, आता निवडणुका ग्राह्य धरून चालणार नाही. सोयीप्रमाणे निवडणुका घेणे सुरू आहे. निवडणुका जिंकण्यासाठी देशात धार्मिक ध्रुवीकरणाचे प्रकार सुरू आहेत. मत मिळवण्यासाठी राजकारणी धार्मिक राजकारण करत आहेत, असही चव्हाणा यांनी म्हटलं आहे.

Edited By- Anuradha Dhawade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
sarkarnama.esakal.com