Congress Vs Jayant Patil: काँग्रेस बालेकिल्ल्यातच जयंत पाटलांना फाट्यावर मारण्याच्या तयारीत? स्वबळाची चाचपणी करणार

Ishwarpur Political News: आमदार जयंत पाटील यांनी नगराध्यक्षपदाचा उमेदवार जाहीर केल्यानंतर सोबत येऊ इच्छिणाऱ्या घटक पक्षांशी चर्चा करू, असे सूचित केले होते; मात्र अजूनही त्यांनी या लोकांशी चर्चा केलेली नाही. त्यामुळेही काँग्रेसमध्ये एक प्रकारचा नाराजीचा सूर आहे.
Jayant Patil and congress .jpg
Jayant Patil and congress .jpgSarkarnama
Published on
Updated on

धर्मवीर पाटील

Ishwarpur News: आगामी ईश्वरपूर (इस्लामपूर) नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी उचल खाल्ली आहे. आघाडीला विचारात न घेता नगराध्यक्ष पदाचा उमेदवार जाहीर करून पक्ष आणि कार्यकर्त्यांना विश्वासात न घेणाऱ्या आमदार जयंत पाटील यांना सहकार्य न करता स्वबळावर लढण्याची भूमिका स्थानिक काँग्रेसमध्ये चर्चेत आहे. या पद्धतीने जयंत पाटील (Jayant Patil) यांनी आघाडीला फाट्यावर मारले. त्याच पद्धतीने आता काँग्रेसने देखील पाटील यांना फाट्यावर मारण्याचे धोरण स्वीकारले आहे.

ईश्वरपूर येथे शासकीय विश्रामगृहावर झालेल्या बैठकीत काँग्रेसच्या वरिष्ठापर्यंत ही भावना पोहोचवण्यात आली आहे. शहरात स्वबळावर लढता येईल का? यासंदर्भात काँग्रेसचे पक्ष निरीक्षक रविवारी (ता. 2) ईश्वरपूरला (इस्लामपूर) भेट देणार असून या चाचपणीनंतर काँग्रेसचा निर्णय होण्याची शक्यता आहे.

ईश्वरपुरात (इस्लामपूर) महायुती अर्थात शहर विकास आघाडी व महाविकास आघाडी अर्थात जयंत पाटील समर्थक अशा दोन गटात आगामी नगरपालिका निवडणूक रंगणार अशी स्थिती आहे. राज्याच्या महायुतीतील घटक पक्ष शहर विकास आघाडी कडून तर महाविकास आघाडीतील घटक पक्ष आमदार जयंत पाटील समर्थकांच्या माध्यमातून लढतील अशी स्थिती आहे.

आमदार जयंत पाटील यांनी आपला उमेदवार आधीच जाहीर केला आहे. हा उमेदवार जाहीर करताना त्यांनी आपल्या समर्थक व घटक पक्षांच्या प्रतिनिधींशी कोणतीही चर्चा केली नाही. या पार्श्वभूमीवर विशेषतः काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता आहे. गुरुवारी (ता.30) रात्री येथील विश्रामगृहावर तालुकाध्यक्ष जितेंद्र पाटील, प्रदेश प्रतिनिधी नंदकुमार कुंभार यांच्यासह प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक झाली.

Jayant Patil and congress .jpg
Sikander Shaikh Arrest कुस्ती क्षेत्र हादरलं! महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखला पंजाब पोलिसांनी ठोकल्या बेड्या; धक्कादायक कारण आलं समोर

या बैठकीत बहुतांश कार्यकर्त्यांनी आमदार जयंत पाटील आपणाला विश्वासात घेणार नसतील आणि किंमत देणार नसतील तर आपण स्वबळावर लढू आणि आपले अस्तित्व दाखवून देऊ, अशी भावना अनेकांनी मांडली.

दरम्यान, काँग्रेसकडून (Congress) थेट नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी मिळावी अशी मागणी अल्पसंख्यांक विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष शाकिर तांबोळी यांनी जिल्हाध्यक्ष आमदार सावंत यांच्याकडे केली आहे. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत नंदकुमार कुंभार यांच्या माध्यमातून प्रदेश पातळीवर कार्यकर्त्यांची भावना पोहोचवण्यात आली आहे. त्यानुसार पक्षनिरीक्षक रविकिरण कोळेकर (मंगळवेढा) रविवारी ईश्वरपुरात भेट देऊन कार्यकर्त्यांशी चर्चा करणार आहेत.

Jayant Patil and congress .jpg
Congress News: धक्क्यावर धक्के सहन केलेल्या काँग्रेससाठी मोठी दिलासादायक बातमी; दोन दिग्गज नेत्यांची 'घरवापसी'

शहरातील सर्वच प्रभागात किंवा काही ठराविक प्रभागात काँग्रेसचे कार्यकर्ते उभा करता येतील का याची चाचपणी होणार आहे. त्यानुसार निर्णय घेतला जाईल, असे काहींनी स्पष्ट केले. बैठकीला रणधीर पाटील, हेमंत कुरळे, शाकिर तांबोळी, राजेंद्र शिंदे, शाकिर तांबोळी, सत्यजित जाधव आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

नाराजीचा सूर

आमदार जयंत पाटील यांनी नगराध्यक्षपदाचा उमेदवार जाहीर केल्यानंतर सोबत येऊ इच्छिणाऱ्या घटक पक्षांशी चर्चा करू, असे सूचित केले होते; मात्र अजूनही त्यांनी या लोकांशी चर्चा केलेली नाही. त्यामुळेही काँग्रेसमध्ये एक प्रकारचा नाराजीचा सूर आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com