Solapur Congress : काँग्रेसचे विमानसेवेबाबत पालकमंत्र्यांच्या विरोधात आंदोलन; मात्र खासदार प्रणिती शिंदेंची अनुपस्थिती!

Solapur Air Services : होटगी रोड विमानतळावरून विमानसेवा सुरू होण्यासाठी सुमारे दोन वर्षांपूर्वी सिद्धेश्वर साखर कारखान्याची चिमणी पाडण्यात आली. त्या वेळी भाजपचे शहातील नेते अवघ्या काही दिवसांत होटगी रोड विमानतळावरून विमान उडेल, असे छातीठोकपणे सांगत होते.
Solapur Air Services
Solapur Air ServicesSarkarnama
Published on
Updated on

Solapur, 26 May : सोलापूर शहरातील होटगी रोड विमानतळावरून लवकर विमानसेवा सुरू होईल, असे सांगणारे सत्ताधारी भाजपचे नेते दोन वर्षांनंतरही होटगी रोड विमानतळावरून विमानसेवा सुरू करू शकलेले नाहीत. पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी २६ मे रोजी सोलापूर-गोवा विमानसेवा सुरू होईल, असे सांगितले होते. मात्र, होटगी रोड विमातळावरून दोन वर्षांत अद्याप एकही प्रवासी विमान उडू शकलेले नाही. त्याच्या निषेधार्थ आज काँग्रेसने विमानतळाच्या गेटसमोर आंदोलन केले. मात्र, खुद्द खासदार प्रणिती शिंदे ह्याच आंदोलनाला अनुपस्थित होत्या, तसेच, गर्दी जमविण्यासाठी नेत्यांना धावपळ करावी लागली.

होटगी रोड विमानतळावरून विमानसेवा (Air Services) सुरू होण्यासाठी सुमारे दोन वर्षांपूर्वी सिद्धेश्वर साखर कारखान्याची चिमणी पाडण्यात आली. त्या वेळी भाजपचे (BJP) शहातील नेते अवघ्या काही दिवसांत होटगी रोड विमानतळावरून विमान उडेल, असे छातीठोकपणे सांगत होते. मात्र, होटगी रोड विमानतळावरून ते अद्याप विमानाचे टेक ऑफ करू शकलेले नाहीत. मात्र, त्यामुळे भाजप नेत्यांचे पितळ उघडे पडले आहे.

भाजपच्या स्थानिक नेत्यांकडून तसेच प्रशासनाकडून विमानसेवेबाबत कायम तारीख देण्यात आलेली आहे. मात्र, विमानसेवा सुरू करण्यासाठी त्यांना अद्याप मुहूर्त मिळालेला नाही. त्याच्या विरोधात काँग्रेस पक्षाकडून (Congress) वेळोवेळी आंदोलने करून त्यातील फोलपणा उघड करण्यात आला आहे. दुसरीकडे, सत्ताधारी भाजप मात्र घोषणाबाजी करण्यात धन्यता मानत असल्याचे दिसून येत आहे.

पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सांगूनही २६ मे रोजी सोलापुरातून विमान उडू शकलेले नाही. त्यामुळे आज काँग्रेस पक्षाकडून आंदोलन करून गोरे यांचा निषेध करण्यात आला. सोलापूरहून विमानसेवा सुरू होण्याबाबत अद्याप कोणत्याही हालचाली शासकीय पातळीवरून होताना दिसत नाहीत, त्यामुळे पालकमंत्र्यांनी सोलापूकरांना खोटी आश्वासने दिल्याचा आरोप काँग्रेस पक्षाकडून करण्यात आला.

Solapur Air Services
Sharad Pawar Politic's मुसळधार पावसामुळे पवारांच्या राष्ट्रवादीचा मोठा निर्णय; पदाधिकाऱ्यांना केली ही सूचना, राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाची चर्चाही लांबली

सोलापूरच्या विमानसेवेच्या तारखा म्हणजे सांग सांग भोलेनाथासारखी परिस्थिती झाली आहे. सत्ताधारी भाजपकडून विमानसेवेचे केवळ गाजर दाखविले जात आहे. त्याचा निषेध म्हणून होटगी रोड विमानतळासमोर काँग्रेस पक्षाकडून आंदोलन करण्यात आले.

Solapur Air Services
Akkalkot Politic's : म्हेत्रेंनी काँग्रेस सोडताच प्रणिती शिंदे उतरल्या मैदानात; अक्कलकोटचे पालकत्व स्वीकारत म्हणाल्या ‘तुम्ही एकटे नाही, मी तुमच्यासोबत..’

या आंदोलनासाठी शहराध्यक्ष चेतन नरोटे, सेवा दलाचे अध्यक्ष भीमाशंकर टेकाळे, प्रमिला तुपलवंडे, विनोद भोसले, गणेश डोंगरे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. मात्र, सोलापूरकरांचा जिव्हाळ्याच्या विमानसेवेचा विषय असतानाही या आंदोलनात खासदार प्रणिती शिंदे या सहभागी झाल्या नाहीत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com