Sharad Pawar Politic's मुसळधार पावसामुळे पवारांच्या राष्ट्रवादीचा मोठा निर्णय; पदाधिकाऱ्यांना केली ही सूचना, राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाची चर्चाही लांबली

NCP SP Meeting Cancelled : या बैठकांमध्ये दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या एकत्रिकरणाबाबतही चर्चा होणार होती. मात्र, आता या बैठकाच रद्द करण्यात आल्याने त्याबाबतचा निर्णय होणार की या विषयाची नुसतीच चर्चा राहणार आहे, याची उत्सुकता कायम आहे.
Sharad Pawar
Sharad PawarSarkarnama
Published on
Updated on

Mumbai, 26 May : राज्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे, त्यामुळे आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने उद्यापासून (ता. 27 मे आणि ता. 28 मे) दोन दिवसीय होणाऱ्या पक्ष पदाधिकाऱ्यांच्या बैठका रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. या आपत्कालीन परिस्थितीत रस्त्यावर उतरून नागरिकांना मदत करण्याचे आवाहन पक्षातर्फे करण्यात आले आहे.

या बैठकांमध्ये दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (NCP) एकत्रिकरणाबाबतही चर्चा होणार होती. मात्र, आता या बैठकाच रद्द करण्यात आल्याने त्याबाबतचा निर्णय होणार की या विषयाची नुसतीच चर्चा राहणार आहे, याची उत्सुकता कायम आहे.

सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका चार महिन्यांत घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यानंतर सर्वच राजकीय नेते निवडणुकीच्या कामाला लागले आहेत. काही पक्ष बैठका घेत आहेत, तर काही पक्षांकडून संघटनात्मक बदलावर भर दिला जात आहे. त्या पार्श्वभूमीवर शरद पवार (Sharad Pawar) यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून मुंबईमध्ये मॅरेथॉन बैठकांचे आयोजन करण्यात आले होते.

मुंबईत पक्षाच्या २७ आणि २८ मे रोजी दोन दिवस महत्वाच्या बैठकांचे आयोजन करण्यात आले होते. आगामी महापालिका निवडणुकांसाठी, तसेच पक्षातील वरिष्ठ नेत्यांच्या सल्लामसलतीसाठी या बैठका होणार होत्या. या बैठकीत मुंबईसह पुणे, नाशिक, ठाणे आणि इतर प्रमुख शहरांतील महापालिका निवडणुकांमध्ये पक्षाची भूमिका ठरविण्यात येणार होती.

Sharad Pawar
Ashok Chavan News : महाराष्ट्र भाजपमय झालायं, आता नांदेडमध्ये शतप्रतिशतचा प्रयत्न करू! अशोक चव्हाण यांचा शहा-फडणवीसांना शब्द

बुधवारी (ता. २८ मे ) होणाऱ्या बैठकीला पक्षप्रमुख शरद पवार स्वतः उपस्थित राहून मार्गदर्शन करणार होते, त्यामुळे या दिवशी होणाऱ्या चर्चेला विशेष महत्व होते. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकत्रिकरणाची सुरू असलेली चर्चेवरही त्या बैठकीत मंथन होणार होते. मात्र, ही बैठक रद्द झाल्याने पक्षातील इतर पुढाऱ्यांच्या मनात नेमके काय आहे, हे उघड होऊ शकलेले नाही.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्र येऊन लढावाव्यात, असं काही नेत्यांना वाटतंय, तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीबरोबर जाणं योग्य नसल्याचं काही नेत्यांचे मत आहे, त्यामुळे या दोन्ही बाजू शरद पवार ऐकून घेणार होते. मात्र, बैठका रद्द झाल्याने दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाचा प्रक्रियाही थंड बस्त्यात राहण्याची शक्यता आहे.

Sharad Pawar
Akkalkot Politic's : म्हेत्रेंनी काँग्रेस सोडताच प्रणिती शिंदे उतरल्या मैदानात; अक्कलकोटचे पालकत्व स्वीकारत म्हणाल्या ‘तुम्ही एकटे नाही, मी तुमच्यासोबत..’

दरम्यान, मुसळधार पावसामुळे राज्यात आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली आहे. या परिस्थितीत रस्त्यावर उतरून नागरिकांना मदत करण्याची सूचना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने आपले पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना दिल्या आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com