
Sangli News : सांगली जिल्ह्यात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसह शरद पवार यांची राष्ट्रवादीमधून ऑऊटगोईंग सुरू आहे. आता काँग्रेसला देखील गळती लागण्याची शक्यता आहे. काँग्रेसच्या बंडखोर नेत्या तथा जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षा, श्रीमती जयश्रीताई पाटील अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. आगामी स्थानिकच्या पार्श्वभूमिवर होणाऱ्या अजित पवार यांच्या जिल्हा दौऱ्यात त्या हाती घड्याळ बांधतील अशा चर्चा सुरू आहेत. अशातच आता भाजपने देखील त्यांना ऑफर दिल्याचे समोर आले आहे. यामुळे एका बंडखोर नेत्यासाठी राष्ट्रवादी अन् भाजपने पायघड्या घातल्याची चर्चा सध्या जिल्ह्यात जोर धरताना दिसत आहे.
विधानसभेची निवडणूक लढवत बंडखोरी केल्या प्रकरणी काँग्रेसने जयश्री पाटील यांच्यावर कारवाई केली होती. तेव्हापासून त्या पक्ष बदलणार अशा चर्चा सुरू झाल्या होत्या. पण मध्यंतरी त्यांनी सर्व विसवरून विश्वजीत कदम यांनी बोलावलेल्या काँग्रेसच्या बैठकीला हजेरी लावली होती. पण काँग्रेस जिल्हाध्यक्षाने अक्षेप घेतल्यानंतर आता त्यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला आहे. तर त्या राष्ट्रवादीत प्रवेश करतील असाही तर्क लावला जातोय.
यादरम्यान जिह्याचे माजी पालकमंत्री, भाजपचे ज्येष्ठ नेते आमदार सुरेश खाडे यांनी एका जाहीर कार्यक्रमात त्यांना थाट भाजपमध्ये येण्याची ऑफर दिली. सध्या याचीच जिल्ह्यात चर्चा सुरू आहे. खाडे यांनी, जयश्रीताईंना भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी (अजित पवार) मध्ये मानसन्मान आहे. पण त्यांच्याच काँग्रेसमध्ये त्यांचा मानसन्मान नसल्याचा आरोप केला. यावेळी जयश्री पाटील यांच्यासह राष्ट्रवादीचे विधान परिषदेचे आमदार इद्रीस नायकवडीही उपस्थित असल्याने अनेकांच्या भूवया उंचावल्या होत्या.
याच कार्यक्रमात जयश्री यांच्या पाठपूराव्याला पक्षात नसतानाही यश मिळत असल्याने कौतूक करण्यात आला. हाच धागा पकडून आमदार खाडे यांनी जयश्रीताईंना भाजपात येण्याचे निमंत्रणच दिले. श्रीमती जयश्रीताई पाटील या जिह्यातील मात्तब्बर नेते असलेल्या कै. मदनभाऊ पाटील यांच्या पत्नी आहेत. राजकारणात प्रवेश केल्यापासून मदनभाऊंच्या विचारानेच त्यांची राजकीय वाटचाल सुरू आहे. त्यामुळे राज्यात शासन भाजपचे किंवा अन्य कोणाचेही असो जयश्रीताईंना मानसन्मान दिला जातोच. पण त्यांच्याच काँग्रेसमध्ये मात्र हा सन्मान त्यांना दिला गेला नाही. त्यामुळेच आम्ही जयश्रीताईंची प्रतिक्षा करतोय. त्या अभ्यासू आणि सुज्ञ नेत्या आहेत. आपल्या कार्यकर्त्यांचे भले कशात आहे, याची पूर्ण जाणीव त्यांना आहे. त्यामुळे त्या आमच्या निमंत्रणाचा निश्चित विचार करतील, असा दावाही आमदार खाडे यांनी केला.
जयश्री पाटील सध्या काँग्रेसवर नाराज असून सांगली विधानसभेची त्यांनी निवडणुकीला दंड थोपाटले होते. त्यांनी काँग्रेसकडे मागणीकरूनही त्यांना तिकीट देण्यात आले नव्हते. यामुळे त्यांनी बंडखोरी केली होती. त्यावरूनच काँग्रेसने त्यांच्यावर कारवाई केली होती. याच कारवाईवरून त्यांच्यासह गटातील कार्यकर्ते नाराज झाले आहेत. तर काहीच दिवसांपूर्वी त्यांनी भविष्यातील राजकीय वाटचाल निश्चित करण्यासाठी समर्थकांची बैठक आयोजित केली होती. यामध्ये जबाबदार कार्यकर्त्यांचा कल हा राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटाकडे असल्याचे समोर आले आहे. तर त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार) जिल्हाध्यक्षांची भेट घेतली होती. यावरूनच त्या राष्ट्रवादीत प्रवेश करतील अशा चर्चा सुरू आहेत. सध्या या चर्चांवर राजकीय खलबत्ते सुरू असतानाच आमदार खाडे यांनी जाहीर कार्यक्रमात भाजपत येण्याचे निमंत्रण दिले. त्यामुळे भविष्यात जयश्रीताई कोणती भूमिका घेणार? याकडे जिल्ह्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.