
Sangli News : गेल्या काही दिवसापासून अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने सांगलीकडे आपला मोर्चा वळवला आहे. येथे जिल्हाध्यक्ष निशिकांत भोसले-पाटील यांनी 'स्थानिक'साठी रणनीती आखताना नाराजांना आपल्याकडे ओढण्याचे सुत्र अवलंबले आहे. त्यांच्या या प्रयत्नांना याआधी देखील यश आले असून चार माजी आमदारांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. आता पाटील यांनी काँग्रेसच्या बंडखोर तथा मदनभाऊ पाटील गटाच्या नेत्या जयश्री पाटील यांना पक्षात घेण्यासाठी डाव टाकला आहे. यात ही त्यांना यश येण्याची शक्यता असून जयश्री पाटील अजित पवार गटात जावे की नको? याचा निर्णय लवकरच घेणार आहे. यासाठी त्या कार्यकर्त्यांशी साधणार संवाद आहेत. त्यामुळे काँग्रेससह अजित पवार गटातील नेत्यांचे लक्ष या बैठकीकडे लागले असून त्या कोणता निर्णय घेतात हे पाहावं लागणार आहे.
आगामी महापालिका, जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मदनभाऊ पाटील गटाच्या नेत्या जयश्री पाटील आपल्या पुढील वाटचालीचा निर्णय घेण्याची शक्यता आहे. त्यांनी प्रमुख कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी कळंबी येथील फार्महाऊसवर बैठकीचे आयोजन केल्याचे कळत आहे. तर राष्ट्रवादीचे अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार हे लवकरच सांगली दौऱ्यावर येत असल्याने या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
गतवर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत पाटील यांनी काँग्रेसकडून तिकिटाची मागणी केली होती. मात्र पक्षाने तिकीट नाकारल्याने त्यांनी बंडखोरी करत विधानसभा निवडणूक लढवली. त्यावेळी पक्षाने त्यांच्यावर सहा वर्षे निलंबनाची कारवाई केली. त्यामुळे गेल्या सहा महिन्यांपासून त्यांची पुढची राजकीय वाटचाल कशी असेल? याबाबत चर्चा, तर्क-वितर्क लढवले जात आहेत.
काँग्रेस पक्षाने त्यांच्यावर कारवाई केल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये देखील प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली आहे. कार्यकर्त्यांची कामे होत नाहीत. एकूणच, राजकीय प्रवाहातून बाहेर पडल्यासारखी सध्याची जयश्री यांची अवस्था झाली आहे. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीत जनतेला सामोरे जाण्यापूर्वी जयश्री पाटील यांनी पुढील राजकीय निर्णय घ्यावा अशी कार्यकर्त्यांची मागणी आहे. याबाबत कार्यकर्त्यांमध्ये देखील जोरदार चर्चा आहे.
दरम्यान, जयश्री पाटील राष्ट्रवादी अजित पवार गटात जाणार असल्याची चर्चांना उधाण आले असतानाच अजित पवार सांगलीच्या दौऱ्यावर आहेत. याच पार्श्वभूमीवर सध्या चर्चांना उत आला आहे. तर जयश्री पाटील यांनी देखील आपल्या कळंबी येथील फार्म हाऊसवर प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक बोलावल्याने आता पक्ष प्रवेशाचे संकेत मिळत आहे.
यावेळी मदनभाऊ पाटील गटाचे महापालिकेतील माजी विरोधी पक्षनेते उत्तम साखळकर यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी दिलेल्या प्रतिक्रियेतूनही जयश्री पाटील लवकरच निर्णय घेण्याच्या मनस्थितीत असल्याचे आता समोर आले आहे. यावेळी साखळकर यांनी, जयश्री पाटील यांनी कार्यकर्त्यांची बैठक बोलवली आहे. काँग्रेसने कारवाई केल्याने कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता असून कामेही रखडली आहेत. यामुळे नाराजी अधिकच वाढत असल्याची वस्तुस्थिती आहे. त्यामुळेच आता पुढील राजकीय वाटचालीचा निर्णय घ्यावा, अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे. त्या जो निर्णय घेतील, त्याच्या पाठीशी सर्व कार्यकर्ते राहतील, असाही दावा उत्तम साखळकर यांनी केला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.