Ajit Pawar : भाजपची धास्ती! अजितदादांचे पदाधिकारी म्हणतात, 'यासाठी साहेब सोबत पाहिजेत...'

Ajit Pawar officials statement News : पुणे शहर भाजपचा गड बनला आहे. आणि हा गड भेदायचा असेल तर दादांसोबत साहेब देखील असले पाहिजेत, असा सूर काहीसा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पक्षातील काही पदाधिकाऱ्यांनी आवळला असल्याचे पाहायला मिळत आहे.
Ajit Pawar Shard Pawar
Ajit Pawar Shard PawarSarkarnama
Published on
Updated on

Pune News : एकेकाळी पुणे शहर आणि पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला होता. सध्य परिस्थितीला जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादीचे चांगले प्राबल्य असले तरी पुणे शहरामध्ये मात्र भाजपचाच बोलबाला असल्याचे पाहायला मिळत आहे. पुणे शहर भाजपचा गड बनला आहे. आणि हा गड भेदायचा असेल तर दादांसोबत साहेब देखील असले पाहिजेत, असा सूर काहीसा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पक्षातील काही पदाधिकाऱ्यांनी आवळला असल्याचे पाहायला मिळत आहे.

भाजपने 2017 ची महापालिका निवडणूक स्वबळावरती लढवली. त्यावेळी भाजपला मोठे बहुमत मिळाले. भाजपचे तब्बल 100 नगरसेवक पुणे महापालिकेत होते. दुसऱ्या नंबर वर 40 नगरसेवकांसह राष्ट्रवादी काँग्रेस राहिली तर शिवसेना आणि काँग्रेसला मात्र प्रत्येकी 10 जागांवर समाधान मानावे लागले होते. एवढं प्रचंड असे यश मिळवत भाजपने राष्ट्रवादी काँग्रेसच्या हातात असलेली सत्ता खेचून घेतली होती.

Ajit Pawar Shard Pawar
Eknath Shinde Ministers Upset: महायुतीमध्ये पुन्हा नाराजीनाट्य! अजिदादांवर एकनाथ शिंदेंचे मंत्री नाराज; नेमकं कारण काय?

यंदा भाजपकडून पुणे महापालिकेचे सत्ता आपल्याकडे खेचून आणण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस प्रयत्नशील आहे, असे असले तरी सध्या परिस्थितीला भाजपची पुण्यातील ताकद प्रचंड अशी वाढली आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपने पुण्यात मोठा विजय साकारला. त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये देखील भाजपचे सहाच्या सहा आमदार निवडणूक जिंकले. त्यामुळे भाजपच्या नेत्यांचा आणि पदाधिकाऱ्यांचा मोठ्या प्रमाणात कॉन्फिडन्स वाढला आहे.

Ajit Pawar Shard Pawar
Dhas, Damaniya allegations : धस, दमानियांनी फोडला आरोपांचा बॉम्ब! सुपेकरांच्या अडचणीत भर

त्यामुळेच वरिष्ठ पातळीपासून खालच्या पदाधिकाऱ्यांपर्यंत पुणे महापालिकेची निवडणूक ही स्वबळावर लढवावी, याबाबत एकमत असल्याचे पाहायला मिळत आहे. महायुतीतील सगळेच पक्ष पुण्यामध्ये महायुती होण्याची शक्यता कमीच असल्याचे मानून स्वबळावर निवडणुकीच्या तयारीला लागल्या असल्याचे पाहायला मिळत आहे.

Ajit Pawar Shard Pawar
Shivsena UBT MNS Alliance : मनसेसोबत युतीसाठी मोठं पाऊल, 'मातोश्री'वरून आदित्य ठाकरेंचा स्पष्ट संदेश; म्हणाले, 'लोकांच्या मनात...'

अशा परिस्थितीत जर भाजपच्या वाढलेल्या ताकदीबरोबर दोन हात करायची वेळ पडल्यास दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याची गरज असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील काही पदाधिकाऱ्यांना वाटत आहे. काही पदाधिकारी उघड उघड आपले मत व्यक्त करत आहेत. तर काही पदाधिकारी खासगीत आपले म्हणणे अजित पवार आणि वरिष्ठ पदाधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवताना पाहायला मिळत आहेत.

Ajit Pawar Shard Pawar
Sanjay Raut Politics: संजय राऊत यांचा त्रागा... निकटवर्तीय सुधाकर बडगुजर यांच्यावर बोलणे टाळले!

पुण्यामध्ये याच कारणामुळे पोस्टर लागले असल्याचे बोलले जात आहे. मुख्यमंत्री अजित पवार यांच्या पक्षाचे राष्ट्रवादी युवक उपाध्यक्ष असलेल्या करण गायकवाड यांनी पुणे शहरांमध्ये फ्लेक्स लावले आहेत. फ्लेक्समध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचा एकत्रित फोटो लावण्यात आला आहे. तसेच पुणे महानगरपालिका आपल्याकडे पाहिजे असेल तर, हे एकत्र हवेत, असे लिहिण्यात आले आहे.

Ajit Pawar Shard Pawar
Sudhakar Badgujar Politics: शिवसेना ठाकरे पक्षातील उपनेते सुधाकर बडगुजर यांना भाजप नेते म्हणतात, नो एंट्री!

राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना आपल्या विजयाची हमी हवी आहे. त्यामुळे पुण्यामध्ये भाजपसारख्या बलाढ्य प्रतिस्पर्ध्याबरोबर ती दोन हात करण्यासाठी जास्तीत जास्त ताकद आपल्या सोबत हवी या दृष्टिकोनातून दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र यावे, यासाठी काही पदाधिकारी दादांना गळ घालताना पाहायला मिळत आहेत.

Ajit Pawar Shard Pawar
Gopichand Padalkar Vs Ajit Pawar : लक्ष्मण हाकेंच्या समर्थनासाठी गोपीचंद पडळकर मैदानात! थेट अजित पवारांना दिला सल्ला, 'बैठक घ्या अन्...'

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com