Kolhapur Congress : टोल आंदोलन काँग्रेसच्या अंगलट; 22 जणांवर गुन्हा

Pune - Kolhapur Toll : या कार्यकत्यांवर राष्ट्रीय महामार्ग क्र. ४८ बेकायदेशीर रोखून धरणे, वरिष्ठ पोलिस अधिकारी यांचा आदेश डावलल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.
Congress toll protest
Congress toll protestSarkarnama
Published on
Updated on

Kolhapur Political News : पुणे - बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर किणी टोलनाका येथे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी टोल वसुली बंद करण्यासाठी आंदोलन केले. आंदोलन केल्यानंतर कार्यकर्त्यांच्या अंगलट आले आहे.

किणी टोलनाका आंदोलन प्रकरणी काँग्रेस पक्षाच्या 22 कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आला आहे. या कार्यकर्त्यांवर महामार्ग बेकायदेशीर रोखून धरणे व आदेश डावलणे आदी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

सध्या राज्यातील अनेक रस्ते खराब झाले आहेत. हीच स्थिती कोल्हापूर Kolhapur, सांगली, सातारा आणि पुणे जिल्ह्यांतील रस्त्यांची आहे. त्यामुळे टोल वसुली बंद करण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले होते. जवळपास चार ते पाच तास या महामार्गावरील वाहतूक ठप्प होती.

या प्रकरणी संजय विष्णु पोवार-वाईकर, प्रशांत कांबळे, विक्रम खवरे, शशिकांत खवरे, सनी शिंदे, उत्तम पाटील, बाजीराव सातपुते, कपिल पाटील, विश्‍वनाथ पाटील, मोहन सालपे, अजित धामेडकर, रमेश उर्फ नाना उलपे, उत्तम सावंत, तानाजी सावंत, राहुल खंजिरे, सुभाष उर्फ बापू जाधव, दुर्वांश उर्फ पप्पु कदम, बबन रानगे, शहाजी सिद, विलास आनंदा जाधव, सुरेंद्र विष्णू धोगडे, संपत भोसले यांच्याविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

जिल्हा काँग्रेसच्यावतीने कोल्हापूर ते पुणे रस्त्यांची दूरवस्था व नागरीकांना होणाऱ्या त्रासाबद्दल शनिवारी (ता. ३) आंदोलन पुकारले होते. या दिवशी किणी टोलनाका येथे काँग्रेस पक्षाचे लोकप्रतिनिधी यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकारी, कार्यकर्ते यांचे आंदोलन सुरू होते. यामध्ये आमदार सतेज पाटील Satej Patil, आमदार राजुबाबा आवळे, आमदार ऋतुराज पाटील या आंदोलनाचे नेतृत्व करीत होते.

काँग्रेसच्या रस्त्याच्या बाजुला ते आंदोलन करीत होते. यावेळी २० ते २५ कार्यकर्त्यांनी महामार्गावर बसून महामार्ग बंद केला. दरम्यान पोलिसांनी वाहनधारकांना नाहक त्रास होत आहे, असे सांगून बाजुला होण्यास सांगितले. परंतु त्यांनी उठण्यास नकार दिला आणि आंदोलन सुरूच ठेवले.

Congress toll protest
Shivsena UBT : मातोश्रीवरील 'चौकडी' ठाकरेंना भेटू देईना ! ऐन विधानसभेच्या तोंडावर ठाकरे गटात खटके

या आंदोनामुळे कोल्हापूर, पुण्याकडे जाणऱ्या मार्गावर वाहनांच्या तीन ते चार किलोमीटर रांगा लागल्या. यामुळे वाहतूक ठप्प झाल्याने प्रवाशांना त्रास सहन करावा लागला. या कार्यकत्यांवर राष्ट्रीय महामार्ग क्र. ४८ बेकायदेशीर रोखून धरणे, वरिष्ठ पोलिस अधिकारी यांचा आदेश डावलल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. याबाबत पोलिस कॉन्स्टेबल योगेश राक्षे यांनी फिर्याद दिली आहे. याप्रकरणी अधिक तपास पोलिस निरीक्षक विलास भोसले करीत आहेत.

Congress toll protest
Jitendra Awhad Attack Case : जितेंद्र आव्हाडांवर हल्ला करणाऱ्या 'स्वराज्य'च्या दोघांना जामीन

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com