Congress Leader Prithviraj Chavan
Congress Leader Prithviraj Chavansarkarnama

karnataka Election : कॉंग्रेसचा विजय निश्चित; पण, ऑपरेशन कमळाचीही भिती : पृथ्वीराज चव्हाण

Prithviraj Chavan कर्नाटक निवडणुकीच्या परिस्थितीसंदर्भात आमदार चव्हाण यांनी माध्यमांशी संवाद साधला.

-हेमंत पवार

Prithviraj Chavan News : कर्नाटक निवडणुकीत Karnataka Election कॉंग्रेसचा congress हमखास विजय होईल. मात्र, विजयातील विरोधी पक्षांपेक्षा आमच्या पक्षाच्या आमदारांच्या जागांचे अंतर किती राहील हे महत्वाचे आहे. आमच्या पक्षाकडे १० ते १२ आमदार जादा पाहिजे आहेत. अन्यथा, आम्हाला ऑपरेशन कमळाची Operation Lotus भिती आहे, असे मत कर्नाटक निवडणुकीत कॉंग्रेसच स्टार प्रचारक आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण Prithviraj Chavan यांनी व्यक्त केले.

कर्नाटक निवडणुकीची धामधुम सध्या सुरु आहे. त्यासाठी महाराष्ट्रातील विविध पक्षांच्या नेत्यांच्या तेथील मराठी भाषिक परिसरात सभा होत आहेत. कॉंग्रेसकडुन आमदार चव्हाण यांनी स्टार प्रचारक म्हणुन कर्नाटकसाठी karnataka पाचारण करण्यात आले आहे. तेथील एकुणच निवडणुकीच्या परिस्थितीसंदर्भात आमदार चव्हाण यांनी माध्यमांशी संवाद साधला.

कर्नाटक निवडणुकीत कॉंग्रेसचा हमखास विजय होईल. मात्र विजयातील विरोधी पक्षांपेक्षा आमच्या पक्षाच्या आमदारांच्या जागांचे अंतर किती राहील हे महत्वाचे आहे. कर्नाटकमध्ये भाजप bjp आणि जनता दल या दोन विरोधी पक्षाच्या जागांपेक्षा जास्त जागा आमच्या कॉंग्रेसकडे असल्या पाहिजेत. तेथे आम्हाला स्पष्ट बहुमत मिळाले पाहिजे.

Congress Leader Prithviraj Chavan
Karnatak Electionमध्ये का गाजतोय हा मुद्दा ? | BJP | Congress | Politics | Sarkarnama

कोणी कोणाशीही युती करो, त्यांना सरकार स्थापन करता येत नाही. मात्र कॉंग्रेसकडे बहुमतासाठी १० ते १२ अधिकचे आमदार पाहिजेत. अन्यथा ऑपरेशन कमळाची भिती आहे. निवडुन आलेल्या कॉंग्रेसच्या आमदारांना काहीतरी आमिष दाखवुन राजीनामा द्यायला लावायचा, तेथील कॉंग्रेसच्या आमदारांची संख्या कमी करायची आणि आपले बहुमत सिध्द करायचे, असा हा प्रकार आहे.

Congress Leader Prithviraj Chavan
Karnataka Assembly Election News : कर्नाटक निवडणुकीच्या प्रचाराचा धुरळा महाराष्ट्रात...

पूर्वी असा प्रकार कर्नाटक आणि मध्य प्रदेशमध्येही झाला आहे. त्या ऑपरेशन कमलाची आम्हाला भिती आहे. त्यामुळे आमचा भर हा कॉंग्रेसचे बहुमत होईल यावरच असुन त्यासाठी आमचे प्रयत्न सुरु आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी पक्ष हा वाढत असुन आमच्या पक्षाचाच पुढचा मुख्यमंत्री होईल असे म्हटले होते. त्या प्रश्नावर आमदार चव्हाण यांना विचारले असता त्यांनी आम्ही सध्या महाविकास आघाडीत आहोत.

Congress Leader Prithviraj Chavan
Satara BJP : उदयनराजेंना लवकरच मोठी जबाबदारी देणार... अजयकुमार मिश्रा

आघाडीत ज्या पक्षाचे बहुमत असेल त्या पक्षाचा मुख्यमंत्री होईल. बाजार समितीचा ट्रेंड बघितला तर लोकांच्या मनात काय हे लक्षात येते. त्यामुळे भविष्यात जर वंचितचे बहुमत असेल तर त्यांचा पुढचा मुख्यमंत्री होईल अशी टिप्पणी करत त्यांनी राष्ट्रवादीला टोला लगावला.

Congress Leader Prithviraj Chavan
NCP News : BJP मध्ये जाण्याचा विचार करणारे NCP मध्ये असू शकतात..; जयंत पाटलांचा रोख नेमका कुणाकडे ?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com