Karad News : पावसकरांना अडकवण्याचे षडयंत्र; जशास तसे उत्तर देणार : हिंदुत्ववादी संघटनांचा इशारा

Pusesavali Dangal पुसेसावळीच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर कराडला हिंदूत्ववादी संघटनांची आज बैठक झाली.
Pusesavali Villege
Pusesavali Villegesarkarnama
Published on
Updated on

Karad Hindutvavadi Sanghtna News : पुसेसावळीच्या दंगलीशी विक्रम पावसकर यांचा काडीमात्र संबध नसताना त्यांना विनाकारण त्यात अडकविण्याचे षडयंत्र होत आहे. ते त्वरीत थांबवावे, अन्यथा जशास तसे उत्तर दिले जाईल, अशी भूमिका हिंदुत्ववादी संघटनांच्या प्रतिनिधींनी आज कराड येथे झालेल्या बैठकीत घेतली. बैठकीस हिंदु एकता, विश्व हिंदु परिषद, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान आदींसह वेगवेगळ्या हिंदुत्ववादी संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

पुसेसावळीच्या Pusesavali घटनेच्या पार्श्वभूमीवर कराडला Karad हिंदूत्ववादी संघटनांची बैठक आज झाली. याबाबत माजी नगरसेवक विनायक पावसकर यांनी याची माहिती दिली. ते म्हणाले, विक्रम पावसकर यांचे नाव दंगलीशी विनाकारण जोडले जात आहे. त्यांचा आरोप निराधार आहे.

वादग्रस्त पोस्टबाबतची तक्रार देण्यासाठी विक्रम पावसकर तेथे गेले होते. त्यानंतर ते तिकडे फिरकलेले नाहीत. तरिही विनाकारण विक्रम यांचे नाव गोवण्याचा प्रयत्न सुरू आहेत. त्यामागे मोठे षडयंत्र सुरू आहे. विक्रमचे नाव यावे, यासाठी प्रयत्न करणारी प्रवृत्ती घातक आहे. त्यांनी आत्तापर्यंत जातीवाद पोसण्याचे काम केले आहे.

गायींची अवैध वाहतूकीच्या प्रकरणातही ते वारंवार आडवे येत आहेत. त्याशिवाय अन्य प्रकरणातही त्यांनी एकतर्फी प्रयत्न केले आहेत. त्या सगळ्याचे पुरावे आम्ही मिळवले आहेत. त्याबाबत रितसर प्रशासनाला निवेदन देणार आहोत. विक्रम पावसकर यांच्यावर होणारे आरोप निराधार आहेत. त्यांची मागणीही चुकीचीच आहे.

पुसेसावळीच्या प्रकरणात शासकीय रूग्णालयाबाहेर निर्माण झालेली स्थिती कशाचे द्योतक आहे. याचाही विचार होण्याची गरज आहे. त्यामुळे दंगलीशी काहीही संबंध नसताना निराधारपणे विक्रम पावसकर यांना त्या प्रकरणात गोवण्याचे उद्योग बंद करावेत, अशी आमची मागणी आहे.

अन्यथा, त्याला जशास तसे उत्तर दिले जाईल. केवळ व्देषातून विक्रम यांचे नाव गोवण्याचा होणारा प्रयत्न न थांबल्यास त्याला जशास तसे उत्तर दिले जाईल. त्याबाबतची सविस्तर भूमिका उद्या मांडणार आहोत, असे त्यांनी स्पष्ट केले.

Edited By Umesh Bambare

Pusesavali Villege
Satara BJP News : 'मेरी माटी मेरा देश' उपक्रमात सातारचे दोन्ही राजे आले एकत्र

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com