Satara BJP News : 'मेरी माटी मेरा देश' उपक्रमात सातारचे दोन्ही राजे आले एकत्र

Udayanraje Bhosale, Shivendra Singh Raje Bhosale News : भाजपच्या उपक्रमात दोन्ही राजे हास्यविनोदात रमलेले दिसले.
Udayanraje Bhosale, Shivendra Singh Raje Bhosale News
Udayanraje Bhosale, Shivendra Singh Raje Bhosale NewsSarkarnama

Satara News : छत्रपती खासदार उदयनराजे भोसले आणि भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यात नियमित आरोप-प्रत्यारोप होताना दिसतात. त्यांच्या या शाब्दिक चकमकीमुळे साताऱ्याचे राजकारण तापलेले असते. मात्र, भाजपच्या उपक्रमात दोन्ही राजे हास्यविनोदात रमलेले दिसले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या संकल्पनेतून 'मेरी माटी मेरा देश' या उपक्रमास रविवारी सातारा शहरात पोवई नाका येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करून सुरुवात करण्यात आली. शिवतीर्थावरील माती कलशात जमा करून ती दिल्लीला पाठविण्यात आली आहे.

Udayanraje Bhosale, Shivendra Singh Raje Bhosale News
Uddhav Thackeray On INDIA : आम्ही भारताला इंडिया म्हणू किंवा 'हिंदुस्थान ; ठाकरेंनी मोदींना जोरदार ठणकावलं !

या उपक्रमाच्या निमित्ताने दोन्ही राजे एकत्र आले. भाजपच्या (BJP) वतीने 'मेरी माटी मेरा देश' उपक्रमास साताऱ्यातून सुरुवात करण्यात झाली. या वेळी उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale), शिवेंद्रसिंहराजे भोसले, जयकुमार गोरे, जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, अतुल भोसले, भरत पाटील तसेच पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Udayanraje Bhosale, Shivendra Singh Raje Bhosale News
Bhor MLA Issue : 'अजितदादा, तुमचा आमदार होऊ न देण्याचा डायलॉग ‘भोर’मध्ये खरा करून दाखवा'; राष्ट्रवादी कार्यकर्त्यांची प्रेमळ मागणी

कार्यक्रमाच्या सुरुवातीला नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी शपथ घेतली. त्यानंतर शिवतीर्थाला प्रदक्षिणा घालून छत्रपती स्मारकाजवळील माती कलशात जमा करण्यात आली. ती रथात ठेवण्यात आली. या कार्यक्रमादरम्यान उदयनराजे, शिवेंद्रसिंहराजे (Shivendra Singh Raje Bhosale) आणि भाजपचे सातारा लोकसभा मतदारसंघाचे संयोजक सुनील काटकर यांच्यात हास्यविनोद रंगला होता.

Edited by : Amol Jaybhaye

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com