नगरमध्ये शिंदे-ठाकरे गटात वाद : पोलिसांच्या सतर्कतेमुळे टळला अनर्थ

गणेश विसर्जन मिरवणुकीत काल ( शुक्रवारी ) स्थानावरून शिवसेनेचा शिंदे गट व ठाकरे गट यांच्यात वाद झाला.
Ganesh Visarjan
Ganesh VisarjanSarkarnama

Shinde Vs Thackeray : अहमदनगर येथील गणेश विसर्जन मिरवणुकीत काल ( शुक्रवारी ) स्थानावरून शिवसेनेचा शिंदे गट व ठाकरे गट यांच्यात वाद झाला. मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने पुढील अनर्थ टळला. मात्र मिरवणुकीतील शिंदे गट व ठाकरे गट यांच्यात झालेल्या कुरघोड्या जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरत आहे.

अहमदनगर शहरात 12 मानाचे गणपती आहेत. गणेश विसर्जन मिरवणुकीत या 12 गणपतींनंतर कोणती मंडळे सहभागी होतील यावर पोलिस प्रशासन निर्णय घेतात. मानाच्या गणपती नंतर 14व्या स्थानावर शिवसेना सहभागी होते. मात्र राज्यातील शिवसेनेत दोन गट पडले आहेत. खरी शिवसेना कोणती यावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. या पार्श्वभूमीवर अहमदनगर मधील गणेश विसर्जन मिरवणुकीतील शिवसेनेच्या सहभागावर शिंदे व ठाकरे गट अशा दोन्ही गटांनी दावा केला होता. त्यामुळे यंदाची मिरवणूक वादात राहणार याची चर्चा होती.

Ganesh Visarjan
Ganesh Visarjan : गणेश विसर्जन मिरवणुकीत डिजिटल 'विघ्न'

काल ( शुक्रवारी ) सायंकाळी 4 वाजता रामचंद्र खुंट परिसरातून गणेश विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ झाला. पहिले मानाचे 12 गणेश मंडळे झाल्यावर 13व्या क्रमांकावर शिवसेनेतील ठाकरे गटाला सहभागी करण्यात आले. तर शिंदे गटाला नवीन सहभाग म्हणून सर्वात शेवटी स्थान देण्यात आले होते.

मिरवणूक आडते बाजार परिसरात येताच शिंदे गटाने आपला गणपती व डिजेचा ट्रॅक्टर 12 मानाच्या गणपतींनंतर घुसविला. त्यामुळे ठाकरे गटाच्या आधी शिंदे गटाचा डिजे दणदणाट करू लागला. त्यामुळे शिंदे गट व ठाकरे गटात वाद सुरू होणार तोच पोलिसांना दोन्ही गटांच्या मध्ये सुरक्षा कवच उभे करत वाद थांबविण्याचा प्रयत्न केला. आडते बाजारातून ही मिरवणूक डाळ मंडईत दाखल झाली. मात्र त्याच वेळी शिवसेनेनेही आपला डाव टाकला.

Ganesh Visarjan
Pune Police| पोलिसांच्या नियंत्रणाअभावी लांबली पुण्यातली मिरवणूक

मानाच्या गणपतीतील शेवटची तीन गणेश मंडळेंपैकी दोन गणेश मंडळे ही शिवसेना नगरसेवकांची आहेत. यात समझोता गणेश मंडळ शिवसेना शहर प्रमुख संभाजी कदम व नगरसेविका सुरेखा कदम यांचे आहे. तर निलकमल गणेश मंडळ नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांचे आहे. या मंडळांनी जागेवर थांबण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे शिंदे गटाच्या डिजे पुढे ठाकरे गटाची दोन मंडळे व मागे ठाकरे गटाचा डिजे अशी स्थिती निर्माण झाली. दोन तास ही गणेश मंडळे एकाच जागी उभी होती. अखेर शिंदे गटाने मागे जाण्याचा निर्णय घेतल्यावर समझोता व निलकमल गणेश मंडळे पुढे गेले आणि वादावर पडदा पडला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com