Padalkar Vs Jayant Patil : सांगलीचं राजकीय वातावरण तापलं, पडळकर आणि जयंत पाटील यांच्यातील वादाची किनार इंजिनिअरचा मृत्यू?

BJP vs NCP SP MLA's clash in Sangli : भाजप आमदार गोपिचंद पडळकर यांनी जयंत पाटलांवर खालच्या पातळीवर जावून टीका केली आहे. यामुळे सांगलीसह राज्यातील राजकीय वातावरण का तापलंय आहे?
Jayant Patil Vs Gopichand Padalkar
Jayant Patil Vs Gopichand PadalkarSarkarnama
Published on
Updated on
Summary
  1. भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटलांवर खालच्या पातळीवर टीका केली असून सांगलीचे राजकारण तापले आहे.

  2. या वादाच्या मागे जत पंचायत समितीतील कनिष्ठ अभियंत्याच्या मृत्यूचा धागा जोडला जात आहे.

  3. भाजप-राष्ट्रवादी संघर्षामुळे सांगलीतील राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे.

Sangli News : गेल्या काही दिवसांपासून सांगलीतील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांच्यावर भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी खालच्या पातळीवर टीका केली आहे. त्याचे पडसाद राज्यभर उमटले असून सांगलीत वातावरण तंग झाले आहे. यादरम्यान पडळकर आणि जयंत पाटील यांच्यातील वादाची किनार ही इंजिनिअरचा मृत्यू असल्याचे आता समोर येत आहे. पडळकरांच्या चौकशीची मागणी देखील राष्ट्रवादीचे माजी आमदार विलासराव जगताप करताना दिसत आहेत. यामुळे हे प्रकरण आणखी तापण्याची शक्यता आहे.

भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटील यांच्याबद्दल केलेल्या आक्षेपार्ह विधानानंतर सांगलीसह राज्यभर संताप व्यक्त केला जात आहे. पडळकर यांनी, जयंत पाटील हा बिनडोक माणूस असून त्याला काही अक्कल नाही. जयंत पाटील हे राजारामबापू पाटील यांची औलाद आहेत, असे वाटत नाही असं म्हणत शेलक्या शब्दात जयंत पाटलांवर पातळी सोडून टीका केली होती. या वक्तव्यानंतर राज्यभरात संताप व्यक्त केला जात असून राष्ट्रवादीही चांगलीच आक्रमक झाली असून पडळकरांचा निषेध व्यक्त केला जात आहे.

राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी पडळकर यांच्याविरोधात आंदोलन करताना दिसत आहेत. एकीकडे पडळकरांच्या पोस्टरला काळं फासण्यासह चप्पलांचा मारा आणि जीवंत कुत्रे देखील फिरवले जात आहे. ज्याच्या गळ्यात मी पडळकर आणि मी मंगळसूत्र चोर अशी पाटी लटकवली गेली आहे. तर दुसरीकडे पंढरपूरमध्ये पडळकरांच्या पोस्टरला दुग्धाभिषेक घालून त्यांच्यासाठी कार्यकर्त्यांकडून प्रतिआंदोलन केलं जात आहे. अशा पद्धतीने सांगलीसह राज्यातील वातावरण तापलं आहे.

Jayant Patil Vs Gopichand Padalkar
Padalkar vs Jayant Patil : जयंत पाटलांच्या मदतीला आख्खी राष्ट्रवादी सांगलीत उतरणार; पडळकर यांच्याभोवतीचा फास आवळणार?

यादरम्यान या वादाचे नेमकं कारण हे एका इंजिनिअरच्या मृत्यू असल्याचे संशय व्यक्त केलं जात आहे. सांगली जिल्ह्यातील जत पंचायत समितीतील एका कनिष्ठ अभियंत्याने काहीच दिवसांपूर्वी आत्महत्या केली होती. त्याचा मृतदेह कृष्णा नदीच्या नव्या पुलाजवळ सापडला होता. यामुळे खळबळ उडाली होती. त्यावेळी प्रथमदर्शनी पोलिसांनी आत्महत्या अशी नोंद केली होती. त्या अभियंत्याचे नाव अवधूत वडार असे होते.

मात्र वडार यांनी आत्महत्या केली नसून त्यांचा घातपात झाल्याचा आरोप केला नातेवाईकांकडून करण्यात आला होता. तसेच वडार यांच्यावर एका राजकीय नेत्याचा पीए आणि अधिकाऱ्यांचा दबाव होता, असाही दावा केला होता. तर जोपर्यंत संबंधितांवर कारवाई होणार नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पवित्रा घेतला होता. पण पोलिसांनी समजूत काढळ्यानंतर हे प्रकरण शांत झाले होते.

अवधूत वडार यांची बहीण रवीना वडार यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात जाऊन विद्यमान आमदार आणि त्यांचे स्वीय सहाय्यक, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य आणि पचंयात समितीती अधिकाऱ्यांच्या नावाने आरोप केले होते. अवधूत यांना टेंडरची बिल काढण्यासाठी पीए आणि जिप सदस्यांनी वारंवार त्रास दिला होता. विद्यमान आमदार यांनी अवधूतला त्यांच्या कार्यालयात नेऊन दमदाटी देखील केल्याचा दावाही बहीण रवीना वडार यांनी केला होता. तर याच मानसिक छळाला कंटाळुन अवधुत यांनी आत्महत्या केल्याचा आरोप केला होचा. तसेच या सर्वांविरोधात गुन्हा दाखल न झाल्यास वडार कुटुंबानं आत्मदहनाचा इशारा दिला होता.

याच आरोपांच्या मागे जयंत पाटील यांचा हात असून तेच वडार कुटुंबाला फूस लावत आहेत, असा संशय पडळकरांना आहे. कारण वडार पडळकर यांच्या मतदार संघात काम करत होते. तर ते मूळचे इस्लामपूर मतदारसंघातले होत. यातूनच आता राष्ट्रवादीचे माजी आमदार विलासराव जगताप यांनीही पडळकरांच्या चौकशीची मागणी केलीय. तसेच काँग्रेसचे माजी आमदार विक्रम सावंत यांनी देखील आजच्या मोर्चात पडळकरांना घेरण्याचा प्रयत्न केला. यामुळे सांगलीतील राजकीय वातावरण ढवळून निघालं असून हा संघर्ष इंजिनिअरच्या मृत्यूवरूनच उफाळल्याची चर्चा सुरू झाली आहे.

Jayant Patil Vs Gopichand Padalkar
Jayant Patil Vs Gopichand Padalkar : जयंत पाटलांना नडले, पवारांना भिडले... मातब्बर नेत्यांविरोधात गोपीचंद पडळकरांचं राजकारण कसं उभं राहिलं?

FAQs :

1. जयंत पाटलांवर टीका कोणी केली आहे?
भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी.

2. कोणत्या जिल्ह्यात हा वाद पेटला आहे?
सांगली जिल्ह्यात.

3. या वादाच्या मागे कोणते कारण जोडले जात आहे?
जत पंचायत समितीतील कनिष्ठ अभियंत्याच्या मृत्यूशी.

4. पडळकरांच्या वक्तव्यावर कोण संतप्त झाले आहेत?
राष्ट्रवादीचे नेते व कार्यकर्ते.

5. या प्रकरणामुळे काय परिणाम झाला आहे?
सांगलीचे राजकीय वातावरण तणावपूर्ण झाले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com