Padalkar vs Jayant Patil : जयंत पाटलांच्या मदतीला आख्खी राष्ट्रवादी सांगलीत उतरणार; पडळकर यांच्याभोवतीचा फास आवळणार?

Political News : शुक्रवारी राज्यभरात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्यांनी रस्त्यावर उतरून आंदोलन करीत निषेध व्यक्त केला.
Jayant Patil steps down from NCP Sharad Pawar faction; Shashikant Shinde likely to take charge as new Maharashtra state president.
Jayant Patil steps down from NCP Sharad Pawar faction; Shashikant Shinde likely to take charge as new Maharashtra state president.Sarkarnama
Published on
Updated on

Sangali News : भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी माजी मंत्री जयंत पाटील यांच्या विरोधात केलेल्या वक्तव्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष चांगलाच आक्रमक झाला आहे. सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे राज्यातील वरिष्ठ नेते सांगलीत उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे येत्या काळात गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर राज्यातील वातावरण चांगलेच तापणार असे दिसत आहे. शुक्रवारी राज्यभरात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्यांनी रस्त्यावर उतरून आंदोलन करीत निषेध व्यक्त केला.

माजी मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटलांवर भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी पातळी सोडून टीका केली आहे. यामुळे राज्यभरात त्यांच्या वक्तव्याचा निषेध व्यक्त केला जात आहे. जयंत पाटलांच्या वडिलांचा उल्लेख करत पडळकरांनी अत्यंत खालच्या भाषेत टीका केली. टीका करताना पडळकरांनी जयंत पाटलांचा एकेरी उल्लेख केला. तसेच त्यांच्यावर गंभीर आरोपही केले आहेत.

Jayant Patil steps down from NCP Sharad Pawar faction; Shashikant Shinde likely to take charge as new Maharashtra state president.
Bjp News : महाराष्ट्र भाजपवर चंद्रशेखर बावनकुळेंची जादू कायम; प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण 15 दिवसांत घेणार मोठा निर्णय

या प्रकरणाचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार (Sharad Pawar) पक्षाचे राज्यातील वरिष्ठ नेते उपथित राहणार आहेत. त्यासोबतच यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्यासह पक्षाचे वरिष्ठ नेते राजारामबापू पाटील यांच्या सांगलीतील पुतळ्यासमोर नतमस्तक होणार आहेत. त्यासोबतच ही नेतेमंडळी रस्त्यावर उतरून आंदोलन करणार आहेत.

Jayant Patil steps down from NCP Sharad Pawar faction; Shashikant Shinde likely to take charge as new Maharashtra state president.
BJP News : भाजपचे इच्छुक बारमध्ये झिंगले, 'मंत्र्यांबद्दल' नको ते बरळले... मुंबईत तिकीट मागायला गेलेले नेते आता उमेदवारीच नको म्हणतायत!

आमदार पडळकर यांचा निषेध करण्यासाठी व महायुती सरकारला इशारा देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी पक्षाच्या प्रमुख नेते पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांना सोमवारी सांगलीत उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. यावेळी खासदार सुप्रिया सुळे देखील उपस्थित राहणार आहेत.

Jayant Patil steps down from NCP Sharad Pawar faction; Shashikant Shinde likely to take charge as new Maharashtra state president.
Thackeray brothers meeting : ठाकरे बंधूंच्या आणखी एका भेटीचा मुहूर्त ठरला; घटस्थापनेदिवशी शिवाजी पार्कवर युतीचे 'घट' बसणार?

भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी माजी मंत्री जयंत पाटील यांच्यावर केलेल्या टीकेमुळे राज्याच्या राजकारणात एक नवीन वाद निर्माण झाला आहे. विशेषतः या वादानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रसार माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. आमदार पडळकरांच्या या वक्तव्याचा सर्वस्तरातून निषेध व्यक्त केला जात आहे.

Jayant Patil steps down from NCP Sharad Pawar faction; Shashikant Shinde likely to take charge as new Maharashtra state president.
NCP Ajit Pawar: अजित पवारांचं ठरलं! महापालिका निवडणुका राष्ट्रवादी स्वबळावर लढणार? प्रफुल्ल पटेलांनी स्पष्टच सांगितलं

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com