Kolhapur News : सहकार मंत्री बाबासाहेब पाटील आज कोल्हापूर दौऱ्यावर येत त्यांनी सपत्निक श्री अंबाबाईचं दर्शन घेतलं. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना, आता जेवढ्या निवडणुका लागल्या आहेत.
त्यापैकी सरकारने ठरवलं आहे की, कोणत्याही सहकारी संस्थेला मुदतवाढ द्यायची नाही. सहकारी कारखाना, बँक, सोसायटी यांना डेडलाईन दिली आहे. त्या निवडणुका घ्यायचं सरकारने ठरवलं असल्याचे मंत्री पाटील यांनी सांगितले.
पुढे बोलताना, "माझे शिक्षण कोल्हापुरात झाल्याने माझे आणि कोल्हापुरचे (Kolhapur) नाते वेगळे आहे. कोल्हापुरातली सहकार चळवळ मी जवळून पाहिली आहे. त्यामुळेच गावाकडे गेल्यावर मी सहकारी संस्थां, बँका आपल्या भागात सुरू केल्या. त्याचाच अनुभव म्हणून उपमुख्यमंत्री अजितदादांनी सहकार खात्याची जबाबदारी माझ्यावर दिली". देशाचे सहकार मंत्री अमित शहा यांचेही नेतृत्व सहकारी चळवळीतून तयार झाले आहे. तेही गुजरातमधील जिल्हा बँकेचे चेअरमन होते. महाराष्ट्राची देशात नव्हे, तर जगात सहकार चळवळीचे केंद्र म्हणून ओळख असल्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी स्पष्ट केले.
नोकर निर्मितीत सहकार आघाडीवर आहे. याचं श्रेय विठ्ठलराव विखे पाटील, यशवंतराव चव्हाण, विलासराव देशमुख, शंकरराव चव्हाण, शंकरराव मेथे यांना जाते. सहकाराची (Cooperative) 30 कोटीपर्यंत लोकं जोडली गेली आहेत. प्रत्येक घटक सहकार चळवळीशी जोडला गेला पाहिजे.दूध संस्था सहकारी संस्था सहकारी गृहनिर्माण संस्था अडचणीत असताना त्यांना प्रोत्साहन देणं हे आमचं काम आहे. मी अध्यक्ष म्हणून काम केलं असल्याने पक्षाच्या कार्यालयाला भेट देण्यासाठी आलो आहे, असे पाटील यांनी सांगितले.
शिवभोजन थाळी बंद करण्यासंदर्भात अजूनही विचार झालेला नाही. सोयाबीन अजूनही मोठ्या प्रमाणात शिल्लक राहिला आहे. सरकारला सांगून सोयाबीन खरेदीमध्ये मुदतवाढ देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले.
राज्यातील महायुती सरकार गाय, दूध अनुदानाच्या निर्णयासाठी सकारात्मक आहे. असं सांगत कर्जमाफीबाबत बोलताना, सर्वात जास्त कर्जबाजारी शेतकरी पंजाबमध्ये आहे. पंजाबमध्ये कर्ज जास्त दिलं जातं. शेतकऱ्यांना ओटीएसबाबत परवानगी दिली आहे. शेतकऱ्यांना कर्जातून बाहेर काढण्याचा सरकार प्रयत्न करत आहे. प्रामाणिकपणे कर्ज परतफेड करणाऱ्यांमध्ये कोल्हापूर, लातूर, पुणे, सांगली जिल्हे आहेत. सहकार खात्याकडे पैसे आहेत. प्रामाणिकपणे कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना लवकरच 50 टक्के अनुदान देण्यात येणार असल्याची ग्वाही मंत्री पाटील यांनी दिली.

सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.