Satara NCP News : नको असलेल्यांचा करेक्ट कार्यक्रम करणार : रामराजेंचा हा सूचक इशारा कोणाला

Ajit Pawar राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष, उपमुख्यमंत्री अजित पवार येत्या रविवारी (ता. १०) कोल्हापूरकडे जाताना साताऱ्यात थांबणार असून त्यांचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात येणार आहे.
Ramraje Naik Nimbalkar, Ranjitsinh Naik Nimbalkar
Ramraje Naik Nimbalkar, Ranjitsinh Naik Nimbalkarsarkarnama
Published on
Updated on

Satara NCP News : महायुतीच्या माध्यमातून आगामी निवडणुका लढल्या जाणार असून त्यानुसारच जागा वाटपाचा निर्णय होईल. युतीत ज्या जागा मिळतील त्यानुसार काम करावे लागणार आहे. लोकसभा व विधानसभेला तोच पॅटर्न राहणार असून जिल्ह्यातील कोण नको आहे, त्याचा करेक्ट कार्यक्रम केला जाईल, असा सूचक इशारा माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी दिला.

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष, उपमुख्यमंत्री अजित पवार Ajit Pawar येत्या रविवारी (ता. १०) कोल्हापूरकडे जाताना साताऱ्यात थांबणार असून जिल्ह्यात त्यांचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात येणार आहे, याची माहिती देण्यासाठी आज जिल्हा बॅंकेत माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर Ramraje Naik Nimbalkar यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी बॅंकेचे अध्यक्ष नितीन पाटील, सचिन बेलागडे, निवास शिंदे, काकसाहेब गायकवाड उपस्थित होते.

रामराजे म्हणाले, उपमुख्यमंत्री झाल्यानंतर अजित पवार प्रथमच जिल्ह्यात येत आहेत. त्यानिमित्ताने त्यांचे जिल्ह्याच्यावतीने शिरवळ येथे जंगी स्वागत केले जाणार आहे. त्यानंतर त्यांचे ठिकठिकाणी स्वागत होईल. कराडला यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीचे दर्शन घेऊन ते कोल्हापूरला मंत्री हसन मुश्रीफ यांनी आयोजित केलेल्या लोकांच्या बैठकीला उपस्थित राहतील.

१९९९ ते २००४ या कालावधीत अजित पवार यांनी पालकमंत्री म्हणून काम पाहिले असून त्यांच्या कामाचा झपाटा सर्वांनी पाहिला आहे. त्यामुळे त्यांचा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात सत्कार होईल. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन अनेकांनी इशारा दिलेला असला तरी कोणताही अनुचित प्रकार होणार नाही.

Ramraje Naik Nimbalkar, Ranjitsinh Naik Nimbalkar
Satara BJP News : खासदार उदयनराजे भोसले यांच्या विश्वासू समर्थकावर भाजपकडून मोठी जबाबदारी

रामराजे म्हणाले, राष्ट्रवादीची संघटना बांधणीची जबाबदारी आमदार मकरंद पाटील व माझ्यावर आहे. जिल्हाध्यक्ष नसतानाही तालुक्यातून कार्यकर्ते या सत्काराला उपस्थित राहतील. माढा, सातारा मतदारसंघात अजितदादा गटाचा दबावगट राहणार का, या प्रश्नावर रामराजे म्हणाले, महायुतीच्या माध्यमातून जागा वाटपाचा निर्णय होईल. युतीच्या मध्यमातून ज्या जागा मिळतील त्या नुसार कामकरावे लागेल.

लोकसभा व विधानसभेला तोच पॅटर्न राहिल. जिल्ह्यात कोण नको आहे, त्याचा करेक्ट कार्यक्रम केला जाईल, असा सूचक इशारा त्यांनी दिला. रामराजे काय आहे, हे निवडणुकीपूर्वी सहा महिने बघायला मिळेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

माणमध्ये वेगळी भूमिका राहणार का, या प्रश्नावर त्यांनी माण विषयी वेगळी भूमिका घ्यायला तो काय पाक व्याप्त काश्मिर आहे का, असा प्रश्न करुन तेथेही युती म्हणूनच काम करणार, असे त्यांनी सांगितले. राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या सोबत आमची तिसरी पिढी कार्यरत आहे, असे सांगून शरद पवार व अजित पवार यांच्याविषयी मला अधिक बोलायचे नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

Edited By Umesh Bambare

Ramraje Naik Nimbalkar, Ranjitsinh Naik Nimbalkar
BJP News : भाजपच्या विधी सेलच्या राज्य प्रभारीपदी अॅड. धर्मेंद्र खांडरे यांची नियुक्ती

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com