सोलापूर : भारतीय जनता पक्षाचे (BJP) आमदार सुभाष देशमुख (Subhash Deshmukh) यांचे सुपुत्र रोहन देशमुख (Rohan Deshmukh) यांच्या विरोधात सोलापूरचे (Solapur) प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी डी. आर. भोला यांनी ‘प्रोसेस इश्यू’चे निर्देश दिले आहेत. त्यामुळे देशमुख यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. (Court Order on Process Issue Against Rohan Deshmukh)
यासंदर्भातील फिर्याद रविराज सूर्यकांत कदम यांनी दिली होती. त्यानुसार लोकमंगल मल्टीस्टेटचे अध्यक्ष रोहन देशमुख यांच्या विरोधात प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी भोला यांनी प्रोसेस इश्यूचे आदेश दिले आहेत.
फिर्यादीनुसार, जेसीबी मालक रविराज सूर्यकांत कदम यांनी ५ जून २०१८ रोजीच्या वर्क ऑर्डरनुसार त्यांच्या मालकीचा जेसीबी रोहन देशमुख यांना दिला होता. तो जेसीबी अवैध उत्खन्न कामात वापरल्याचे पत्र उत्तर सोलापूर तालुका तहसील कार्यालयाने दिले. जेसीबी हा कायदेशीर कामांसाठी दिलेला असताना बेकायदा कामात वापरल्याचा जाब कदम यांनी देशमुख यांना विचारला, तेव्हा त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर मात्र रोहन देशमुख यांनी जेसीबी सोडवून दुरुस्ती करून देण्याचे कबूल केले होते.
वास्तविक रोहन देशमुख यांनी तो जेसीबी सरकारच्या ताब्यातून सोडवून घेतला. मात्र, तो खासगी गॅरेजमध्ये दुरुस्ती केला. त्यामुळे आपला विश्वासघात करण्यात आला, अशी फिर्याद कदम यांनी ॲड. प्रशांत नवगिरे यांच्या मार्फत दिली. त्या फिर्यादीनसुसार सोलापूर प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी भोला यांनी मनीष देशमुख यांच्या विरोधात प्रोसेस इश्यूचा आदेश दिला आहे. फिर्यादीतर्फे ॲड. प्रशांत नवगिरे, ॲड . श्रीपाद देशकर, ॲड. सागर मंद्रूपकर यांनी काम पाहिले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.