Amravati Vidhan Parishad : अमरावतीसाठी राष्ट्रवादीही प्रचंड आग्रही : महाआघाडीत जागावाटपावरून पेच

अमरावती पदवीधर आणि नागपूर शिक्षक मतदार संघाचे उमेदवार अद्याप जाहीर झालेले नाहीत.
Congress-NCP
Congress-NCPSarkarnama
Published on
Updated on

मुंबई : विधान परिषदेच्या पाच जागांसाठी येत्या ३० जानेवारी रोजी निवडणूक पार पडणार आहे. यामध्ये नाशिक, अमरावती पदवीधर मतदारसंघ तर औरंगाबाद, नागपूर आणि कोकण शिक्षक मतदार संघाची निवडणूक असणार आहे. यातील तीन मतदारसंघातील उमेदवार महाविकास आघाडीकडून (Mahavikas Aghadi) जाहीर करण्यात आले आहेत. मात्र, अमरावती पदवीधर मतदारसंघावर काँग्रेसबरोबर (congress) राष्ट्रवादीने (NCP) दावा केला आहे, त्यामुळे पेच निर्माण झाला आहे. (Amravati Vidhan Parishad Constituency claimed by Congress-NCP)

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची आज बैठक होणार आहे. त्यात अमरावती मतदारसंघाबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. त्यानंतर हा मतदारसंघ कोण लढवणार, हे ठरणार आहे. दुसरीकडे, काँग्रेसही अमरावतीसाठी आग्रही आहे. त्यासाठी काँग्रेसचे सुधीर ढोणे, सुनील देशमुख आणि अनिरुद्ध देशमुख यांची नावे चर्चेत आहेत.

Congress-NCP
Bhandara News: काकूला चीत करून पुतण्या झाला उपाध्यक्ष, राष्ट्रवादीतील बंडखोरी वाढीवर !

या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचे उमेदवार काही दिवसांपूर्वीच अजित पवार यांनी पत्रकार परिषदेमध्ये घोषित केले आहेत. यामध्ये औरंगाबाद शिक्षक मतदार संघासाठी विक्रम काळे, कोकण शिक्षक मतदार संघासाठी बाळाराम पाटील, तर नाशिक पदवीधर मतदारसंघासाठी सुधीर तांबे उमेदवार असतील अशा पद्धतीची घोषणा केली होती. मात्र, अमरावती पदवीधर आणि नागपूर शिक्षक मतदार संघाचे उमेदवार अद्याप जाहीर झालेले नाहीत.

Congress-NCP
Baramati Politics : 'पडळकर म्हणजे भाजपच्या दावणीला बांधलेला भुंकणारा कुत्रा'

अमरावती पदवीधर मतदार संघासाठी सध्या काँग्रेसचे सुधीर ढोणे, सुनील देशमुख आणि अनिरुद्ध देशमुख यांची नावे चर्चेत आहेत, तर नागपूर शिक्षक मतदार संघासाठी अद्याप उमेदवार ठरलेला नाही. अमरावती पदवीधर मतदार संघासाठी राष्ट्रवादी काँग्रेसदेखील आग्रही असल्याची विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे. त्यामुळे अमरावती आणि नागपूरला उमेदवार कोण असणार, हे लवकरच जाहीर होणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची आज होणाऱ्या बैठकीत याबाबत देखील चर्चा होईल, अशा पद्धतीची माहिती विश्वसनीय सूत्रांची आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com