Corona : धक्कादायक! आरोग्य मंत्र्यांच्या जिल्ह्यातच कोरोनाबाधित महिलेचा बळी; पीपीई किट नसल्याने अंत्यसंस्कारही रखडला

Corona infected woman dies in Kolhapur : देशात पुन्हा एकदा देशात कोरोनाने डोकं वर काढलं आहे. केंद्रीय आरोग्य विभागाच्या वेबसाइटनुसार 1 जून 2025 पर्यंत 3758 बाधित रूग्ण आहेत. ज्यापैकी 1818 बरे झाले असून 383 रूग्णांना घरी सोडण्यात आले आहे. तर देशभरात दोन दिवसांत 21 रूग्णांचा मृत्यू झाला आहे.
Corona in Kolhapur Public Health Minister Prakash Abitkar and Medical Education Minister Hasan Mushrif
Corona in Kolhapur Public Health Minister Prakash Abitkar and Medical Education Minister Hasan Mushrifsarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News : राज्यासह देशात पुन्हा एकदा कोरोनाने डोकं वर काढलं असून गेल्या दोन दिवसात बाधितांच्या मृत्यूचा आकडा झपाट्याने वाढत आहे. गेल्या दोन दिवसात देशभरात 21 21 रूग्णांचा मृत्यू झाल्याने सध्या चिंतेचे मळभ वाढत आहेत. अशातच कोल्हापुरमध्ये देखील कोरोना बाधित महिलेचा मृत्यू झाल्याचे घटना उघडकीस आली आहे. तर पीपीई किट नसल्याने त्या महिलेचा अंत्यसंस्कारही रखडल्याचे आता समोर आले आहे. पीपी किट नसल्याने पालिका कर्मचाऱ्यांनी अंत्यसंस्कार करण्यास नकार दिला आहे. यामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ हे दोघेही कोल्हापूरचे आहेत. एकीकडे दोन दोन मंत्री जिल्ह्यात असताना जिल्ह्यातच कोरोनाबाधित महिलेचा मृत्यू झाल्याने जिल्ह्यात सध्या भीतीचे वातावरण आहे. एकीकडे राज्यात कोरोनाचे रूग्ण वाढत असतानाच जिल्ह्यातही कोरोना रूग्ण आढळता. पाचगाव येथील एका 75 वर्षीय महिलेला कोरोनीची बाधा झाली. तिला उपचारासाठी सीपीआय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तर गेल्या चार दिवसापासून तिच्यावर उपचार सुरू होते. मात्र, आज (1 जून) उपचारादरम्यान या महिलेचा मृत्यू झाला.

यानंतर तिच्यावर अंत्यसंस्कार करण्याची तयारी केली जात असतानाच पालिका कर्मचाऱ्यांनी पीपी किट नसल्याने अंत्यसंस्कार करण्यास नकार दिला. यामुळे आता जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. तसेच पालमंत्र्यांसह वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांवर जिल्ह्याकडे दुर्लक्ष केल्यावरून नाराजी व्यक्त केली जातेय.

Corona in Kolhapur Public Health Minister Prakash Abitkar and Medical Education Minister Hasan Mushrif
PCMC Corona Scam : कोरोना घोटाळ्यात ठेकेदार अडकले, मात्र अजित पवार सुटले

देशात कोरोना बाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून ती 3783 वर पोहोचली आहे. आरोग्य विभागाच्या वेबसाइटनुसार, केरळमध्ये सर्वाधिक 1400 रुग्ण आढळले असून महाराष्ट्रात 485 आणि दिल्लीत 436 कोरोना बाधित रुग्ण आहेत. गेल्या 48 तासांतच 1000 रूग्ण वाढले आहेत. दरम्यान जानेवारीपासून कोरोनामुळे आतापर्यंत 28 जाणांना मृत्यू झाला असून यात गेल्या दोन दिवसात 21 जणांचा मृत्यू झाला आहे. जो धक्कादायक असून तर महाराष्ट्र आणि केरळमध्ये सर्वाधिक 7 जणांचा मृत्यू झाला आहे.

Corona in Kolhapur Public Health Minister Prakash Abitkar and Medical Education Minister Hasan Mushrif
ED Raids in Bmc Corona Scam : 'ईडी'च्या हाती मोठं घबाड; दीडशे कोटींच्या मालमत्तेची कागदपत्रं, 15 कोटींची एफडी आणि बरंच काही...

दरम्यान राज्यात महाराष्ट्रात शनिवारी कोरोनाचे एकाच दिवशी नव्या 68 रूग्णांची भर पडली असून महाराष्ट्रात 485 बाधित रूग्णांचा आकडा झाला आहे. जानेवारीपासून आतापर्यंत राज्यात तब्बत 9592 कोरोनाच्या चाचण्या घेण्यात आल्या असून जानेवारी 2025 पासून मुंबईत एकूण 749 रुग्ण आढळले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com