पुलाचा श्रेयवाद रंगला : सुनील गडाख म्हणाले, हा तर विरोधकांनी आणलेला बनाव

नदीवरील पुलाचे उदघाटन करीता माजी मंत्री शंकरराव गडाख ( Shankarrao Gadakh ) गटाचे कार्यकर्ते जमले.
Balasaheb Murkute & Shankarrao Gadakh
Balasaheb Murkute & Shankarrao Gadakh Sarkarnama
Published on
Updated on

विनायक दरंदले

Gadakh Vs Murkute : नेवासे तालुक्यातील सात कोटी रुपये खर्चाच्या पाचेगाव-इमामपूर नदीवरील पुलाचे उदघाटन करीता माजी मंत्री शंकरराव गडाख ( Shankarrao Gadakh ) गटाचे कार्यकर्ते जमले. असे असताना माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे ( Balasaheb Murkute ) व कार्यकर्त्यांनी पुलाजवळ श्रीफळ वाढवून उदघाटन केले. येथे दोन्ही गटातील कार्यकर्त्यांनी केलेली घोषणाबाजी व एकमेकांना केलेल्या लोटालोटीमुळे काही वेळ वातावरण तंग झाले होते.

दोन दिवसांपूर्वी जाहीर केल्याप्रमाणे आज माजी अर्थ व पशुसंवर्धन सभापती सुनील गडाख यांनी कोनशिला अनावरण करुन सहा कोटी 95 लाख रुपये खर्चाच्या प्रवरा नदीवरील पुलाचे उदघाटन केले. यावेळी मुळा कारखान्याचे अध्यक्ष नानासाहेब तुवर, अशोक कारखान्याचे माजी संचालक भागवत पवार, संतोष वाकचौरे, पुनतगाव सेवा संस्थेचे अध्यक्ष नामदेव पवार, माजी पंचायत समिती सदस्य विक्रम चौधरी उपस्थित होते.

Balasaheb Murkute & Shankarrao Gadakh
भाजपचे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न?

कोनशिला अनावरण तयारी सुरु असतानाच 60, 70 कार्यकर्त्यांसह माजी आमदार मुरकुटे पुलाजवळ श्रीफळ घेवून आले. भारतीय जनता पक्षाचा विजय असोच्या घोषणा सुरु होताच शंकरराव गडाखांचा विजय असोच्या घोषणा सुरु झाल्या. घोषणायुध्द सुरू असताना मुरकुटे यांनी संधी मिळताच श्रीफळ वाढवून ते समर्थकांसह निघून गेले. पाचेगाव बाजारतळ येथे त्यांच्या गटाची सभा झाली.

Balasaheb Murkute & Shankarrao Gadakh
Shivsena News : बबनराव घोलप म्हणाले, शंकरराव गडाख अपक्ष, त्यांचा शिवसेनेला पाठिंबा...

मुख्य कार्यक्रमाचे प्रास्तविक शरद जाधव यांनी केले. अनेक वर्षांपासून निधी अभावी हे काम रखडले होते परंतु माजी मंत्री गडाख यांनी तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्याकडे पाठपुरावा करुन काम पूर्ण केल्याचे सांगून सुनील गडाख यांनी विरोधकांनी आणलेला आव बनाव असुन या भागातील प्रश्नासाठी आम्ही सदैव तुमच्या पाठीशी असल्याचे सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com