Ahmednagar News : पत्नी, मुलगा आणि मुलीला विषारी द्रव्य पाजून जिवे मारण्याचा प्रयत्न फसल्यानंतर, पत्नीचा गळा आवळून आणि मुलाला पाण्यात बुडवून मारले. यानंतर स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार पारनेर तालुक्यात घडला असून मृत हे पुण्याच्या जुन्नर तालुक्यातील उदापूर येथील आहेत. गजानन भाऊ रोकडे (वय ३५), त्याची पत्नी पौर्णिमा (वय ३२) आणि मुलगा दुर्वेश (वय ६), अशी तिघा मृतांची नावे असून, मुलगी चैत्राली (वय ९) ही घटनास्थळावरून पसार झाल्याने तिचा जीव वाचला. परंतु तिलाही गजानन याने विषारी द्रव्य सुरुवातीला पाजले असल्याने तिच्यावर नगरमधील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. (Latest Marathi News)
गजानन आणि त्याची पत्नी पौर्णिमा ही एकाच पतसंस्थेत काम करतात. हे पती-पत्नी मुलांसह श्रीरामपूर येथे दुचाकीवरून निघाले होते. प्रवासात पती-पत्नींमध्ये दुचाकीवरच कडाक्याचा वाद झाला. यानंतर गजानन याने हे वाद डोक्यात ठेवून दुचाकी पारनेरमधील वारणवाडी या जंगल परिसरात नेली. तिथे पती-पत्नी दोघांमध्ये आणखी वाद झाले. (Latest Crime News)
यानंतर गजानन याने पत्नी पौर्णिमा, मुलगी चैत्राली आणि मुलगा दुर्वेश यांना विषारी द्रव्य पाजले. विषारी द्रव्य पाजल्यानंतर गजानन याने पौर्णिमा हिचा गळा आवळला. मुलगी चैत्राली हिला तिथे उलटी झाली. त्यानंतर ती पळून गेली. दुर्वेश याला गजानन याने तिथे परिसरात असलेल्या एका पाण्याच्या डबक्यात बुडवून मारले. गजानन याने यानंतर स्वतः गळफास घेतला.
पारनेर पोलिस ठाण्याचे निरीक्षक संभाजी गायकवाड आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. विजय रोकडे याच्या फिर्यादीवरून गजानन याच्याविरुद्ध पारनेर पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली आहे. पत्नी, मुलाची हत्या केल्याप्रकरणी आणि मुलगी चैत्राली हिच्या हत्येचा प्रयत्न केला, म्हणून गजानन याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला. मुलगी चैत्राली हिच्यावर नगरच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
गजानन याने हा प्रकार नेमका कशातून केला, हे मात्र कळू शकले नाही. मुलगी चैत्राली ही संपूर्ण घटनाक्रमाची साक्षीदार असल्याने तिच्याकडून हा गुंता उलगडेल, असे पोलिस निरीक्षक गायकवाड यांनी सांगितले. परंतु तिलादेखील विषारी द्रव्य पाजल्याने तिची प्रकृती चिंताजनक आहे. तिच्यावर नगरच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ती स्थिर झाल्यानंतर हा गुंता उलगडणार आहे.
R...
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.