Sharad Mohol Murder: गुंड शरद मोहोळ खूनप्रकरणी दोन वकिलांना अटक, पोलिसांची माहिती...

Pune Police Performance : पोलिसांनी पकडले आठ आरोपी, अतिरिक्त पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे यांची माहिती...
 Sharad Mohol
Sharad Mohol Sarkarnama
Published on
Updated on

Pune Crime News : कुख्यात गुंड शरद मोहोळ खून प्रकरणात पुणे पोलिसांनी आठ आरोपींना ताब्यात घेतले असून यामध्ये दोन वकिलांचा समावेश आहे. पुणे पोलिसांनी पत्रकारपरिषद घेऊन ही माहिती दिली. रवींद्र पवार आणि संजय उड्डाण अशी पोलिसांनी अटक केलेल्या वकिलांची नावे आहेत. हे दोघेही शिवाजीनगर कोर्टात वकिली करतात, अशी माहिती अतिरिक्त पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे यांनी दिली.

मोहोळचा खून करून साताऱ्याच्या दिशेने पळून जाणाऱ्या आरोपींना पकडण्यात आले आहे, गुन्हे शाखेच्या पथकाने या दोघांना मोहोळ खून प्रकरणातील अन्य आरोपींसोबत शुक्रवारी रात्री अटक केली. त्यांच्याकडून पिस्तूल, काडतुसे, मोटार जप्त करण्यात आली आहे. मोहोळचा साथीदार साहिल ऊर्फ मुन्ना पोळेकर याने जमीन खरेदी प्रकरणातील आर्थिक व्यवहारातून मोहोळ याच्यावर पिस्तुलातून गोळीबार केला असल्याची माहिती पोलिसांच्या तपासात पुढे आली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

 Sharad Mohol
Sunil Kamble News: फडणवीसांचा पोलिसांवर दबाव, आता कोर्टात जाणार

मोहोळचा शुक्रवारी दुपारी एकच्या सुमारास कोथरुडमधील सुतारदरा परिसरात पिस्तुलातून गोळ्या झाडून खून करण्यात आला. याप्रकरणी कोथरुड पोलिस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला. तपासात मोहोळचा पूर्वीचा साथीदार साहिल ऊर्फ मुन्ना संतोष पोळेकर (रा. सुतारदरा, कोथरुड) आणि साथीदारांनी खून केल्याचे उघडकीस आले. हल्लेखोरांना पकडण्यासाठी पोलिसांनी तपास सुरू केला.

मोहोळ याचा खून केल्यानंतर हे आरोपी घटनास्थळावरून पळून गेले होते. यातील मुख्य आरोपी पोळेकर हा शरद मोहोळसोबत अनेक दिवसांपासून फिरायचा. गुन्हे शाखेच्या पथकाने शुक्रवारी रात्री खेड शिवापूर परिसरातून मुख्य आरोपी साहिल पोळेकरसह आठ जणांना अटक केली. याचा तपास करण्यासाठी गुन्हे शाखेकडून 8 पथके तयार करण्यात आली होती.

शहरातील सर्व रस्ते बंद करत नाकाबंदी करण्यात आली होती. आरोपी खेड शिवापूर टोलनाक्यावरुन पुढे गेले असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तातडीने पावले उचलत पाठलाग करत आरोपींना अटक केली. आरोपींमध्ये दोन वकिलांचा समावेश असून या गुन्ह्यामध्ये त्यांचा सहभाग नक्की काय आहे? याचा तपास केला जात असल्याचे पोकळे यांनी सांगितले.

(Edited By - Chaitanya Machale)

R...

 Sharad Mohol
Hate Speach : श्रीरामाच्या भक्तांचा संताप; जितेंद्र आव्हाडांविरोधात गुन्हा दाखल

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com