Damaji Sakhar Karkhana : 'दामाजी'तून दोनशे कोटी कर्जाच्या आरोपांचा धूरच धूर! काय आहे प्रकरण?

Samadhan Avtade Vs Shivanand Patil : माजी संचालक सुरेश भाकरेंनी केलेल्या आरोपांनी सभा ठरणार वादळी
Suresh Bhakare, Damaji Sugar Factory
Suresh Bhakare, Damaji Sugar FactorySarkarnama
Published on
Updated on

Solapur Political News : दामाजी कारखान्यावर १९८ कोटींचे कर्ज आहे. कर्जामुळे डबघाईला आलेला कारखाना वाचवण्यासाठी समविचारी आघाडीला निवडून द्या, असा खोटा प्रचार करून समविचार आघाडीने कारखाना आपल्या ताब्यात घेतला. आता मात्र कारखान्याच्या अहवालात त्या कर्जाचा कुठेही उल्लेख नाही. त्यामुळे सत्ताधाऱ्यांनी केलेले आरोप हे खोटे होते, असा घणाघात माजी संचालक सुरेश भाकरे यांनी केला आहे. यामुळे कारखान्याचे अध्यक्ष शिवानंद पाटील यांना घेरण्याची तयारी विरोधकांनी केली आहे. त्यामुळे दमाजी कारखान्याची रविवारी होणारी सभा वादळी ठरणार आहे. (Latest Political News)

दामाजी सहकारी साखर कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या पूर्वसंध्येला माजी संचालक सुरेश भाकरे यांनी केलेले आरोप खळबळजनक ठरले आहेत. भाकरे म्हणाले, 'समविचारी आघाडीने खोटे आरोप करून सत्ता पदरात पाडून घेतली. आता त्यांनी केलेले सर्व आरोप खोटेच असल्याचे वार्षिक अहवालातून उघड झाले आहे. अध्यक्ष शिवानंद पाटलांनी कारखान्यावर तब्बल १९८ कोटींचे कर्ज आहे. ते यापुढे कारखाना चालवू शकणार नाहीत, असा अपप्रचार केला होता. मात्र, आवताडेंनी कारखान्यावरील १४५ कोटींच्या कर्जातील ७० कोटी नील केल्याचेही सांगितले होते. आम्ही जिल्ह्यात दोन नंबरवर रिकव्हरी ठेवली. फक्त साखरेच्या उत्पादनावर सहा वर्षे कारखाना चालविला,' असा दावा भाकरेंनी केला. (Maharashtra Political News)

Suresh Bhakare, Damaji Sugar Factory
Pankaja Munde News : पंकजाला माहेरी आणून महादेव जानकर भाजपला देणार धक्का?

सत्ताधाऱ्यांचा समाचार घेताना भाकरे म्हणाले, 'या संचालक मंडळाला अद्यापही थकीत पगार देता आला नाही. दहा रुपयांनेच साखर देणार, असे म्हणत कारखान्याचे सभासद वाढ केली. स्वस्तात साखर मिळतेय, या आशेने सभासदांनी दहा हजार रुपयांनी शेअर्स भरले. यातून कारखान्याला दहा कोटी रक्कम मिळाली. यानंतर दहा रुपये किलोची साखर वीस रुपये किलो केली. त्यातच दहा किलो साखरही कमी करत सभासदांचा विश्वासघात केला. सभासदांचा अपघाती विमाही बंद केला आहे. यावरून या संचालक मंडळाचे निर्णय सभासद विरोधी असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.'

'आमच्या संचालक मंडळाने प्रतिदिन दोन लाख लिटर क्षमता असलेल्या डिस्टलरी प्रकल्पाच्या सर्व परवानगी घेतल्या होत्या. मात्र, विद्यमान संचालक मंडळाला पुढे काहीच करता आले नाही. प्रचारात कामगार पतसंस्थेचं देणं दिलं नाही, म्हणून सांगणाऱ्यांनी आता किती देणी दिली? कामगारांच्या ब्रेकचा कालावधी वाढवून संचालकांच्या मर्जीतील कामगारांना कामावर घेतले, तर प्रामाणिक, गरजू कामगारांवर उपासमारीची वेळ आणली. आम्ही मशिनरी मेंटेनन्ससाठी सहा वर्षांत १० ते १२ कोटी खर्च केले, तर या संचालक मंडळाने एका वर्षातच १२ ते १४ कोटी खर्च केल्या'चा आरोपही भाकरेंनी केला. (Samadhan Awtade)

Suresh Bhakare, Damaji Sugar Factory
Beed Politics : धनूभाऊंच्या परळीतील 'शासन आपल्या दारी'ला भाजपचा खोडा ?

अहवालाचा दाखला देत भाकरे म्हणाले, आमदार आवताडेंचे काळातील संचालक मंडळाने वैयक्तिक मालमत्तेवर कर्ज काढून कारखाना व्यवस्थित चालविला. सध्याच्या संचालक मंडळाच्या काळात कुणाचा-कुणाला मेळ नसल्याचे दिसत येते. सताधारी संचालक मंडळाने कर्ज कमी करण्यापेक्षा वाढवल्याचेच अहवालातून दिसून येते. त्यामुळे आहवालात दाखवलेला नफा कितपत खरा आहे, यावर प्रश्न उपस्थित होतो. सभासदांनी निवडून दिलेले कारभारी नीट कारभार करतात का? हे अहवाल वाचून सभासदांनी ठरवीक वेळच्या वेळी जाब विचारणे गरजेचे आहे, अशीही टीका भाकरेंनी विद्यमान संचालक मंडळावर केली आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Suresh Bhakare, Damaji Sugar Factory
Mahadev Jankar In Shirdi : लोकसभेसाठी महादेव जानकर 'अॅक्शनमोड'वर; शिर्डीतून शक्तिप्रदर्शनाला सुरुवात

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com